आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःला इतरांपासून वेगळे दाखवण्यासाठी कोण काय करेल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. अनेक लोक प्रकाशझोतात येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत असतात.
सामान्य व्यक्ती तर अशा गोष्टीमध्ये पुढे असतातच परंतु याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी पण भलतेच ट्रेंड सेट करून ठेवले होते. असेच एक नेते म्हणजे अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती लिंडन बी. जॉनसन.
अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष ,लिंडन बी. जॉन्सन, कोणतेही कार्य जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध होते. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी व्हाईट हाऊसमधील संपूर्ण फोन सिस्टीमचा विस्तार करण्याचे आदेश दिले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
जेणेकरून त्यांना व्हाईट हाऊसमधील कुठल्या ही कोपऱ्यातून कॉल करता येईल आणि विशेष म्हणजे त्यांनी शौचालय आणि स्नानगृहामध्ये देखील टेलीफोन लावायला सांगितले होते.
आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, लिंडन यांनी त्यांच्या जीवनातील अनेक मुलाखती शौचालयामध्ये बसून दिल्या आहेत, जेथे ते एकाच वेळी दोन्ही काम उरकून घ्यायचे.
जॉन्सन अनेकदा गुप्तांग उघडे ठेवतांना, लघवी करतांना आणि शौचालयात बसतांना मुलाखत दिल्याचे सांगितले जाते, परंतु अनेकांच्या मते, हे असे वागतांना जॉनसन यांना कधीही लाज वाटली नाही.
अनेक लोकांचे असे मानणे आहे की, जॉनसन या कृती जाणून-बुजून करत असे, जेणेकरून तो मुलाखत घेणाऱ्यांना गोंधळून टाकत असे आणि या कारणामुळे संपूर्ण मुलाखतीवर त्यांचे नियंत्रण राहायचे.
लिंडन जॉनसन यांच्या विषयी अजुन जाणून घेऊया
बालपण :
लिंडन बेन्स जॉनसन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ रोजी स्टोनवॉल, टेक्सास, यूएसए येथे सॅम्युअल एलियम जॉन्सन जूनियर आणि रिबेका बेन्स यांच्या घरी झाला होता. ते त्याच्या भावंडांपैकी सर्वात मोठे होते, आणि त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ होता. त्यांचे वडील रँकर आणि राजकारणी होते.
लहानपणी लिंडन एक आत्मविश्वासू आणि बोलका मुलगा होता जे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद आणि बेसबॉलमध्ये सक्रियपणे भाग घेत असे. १९२४ मध्ये त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ‘जॉन्सन सिटी हायस्कूल’मधून पदवी प्राप्त केली. तर १९३० मध्ये त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले.
—
- सत्तरीतही फिट असणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य तुम्ही वाचलंच पाहिजे
- अमेरिकन राष्ट्रपतींच्या विमानाची ‘सुरक्षा वैशिष्टे’ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
—
राजकीय वाटचाल :
लिंडन बेन्स जॉन्सन हे युनायटेड स्टेट्सचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी १९८३ ते १९६९ पर्यंत सेवा बजावली. १९६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते, जिथे ते जॉन एफ. केनेडींचे सहकारी म्हणून काम केले.
नोव्हेंबर १९६३ मध्ये राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्येनंतर अखेरीस त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर, त्यांनी १९६४ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. यानंतर १९६५ मध्ये ते पूर्ण कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक समाजसेवेचे कार्यक्रम राबवले आणि ‘ग्रेट अमेरिके’च्या निर्मितीचे आवाहन केले, जो त्यांच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक होता.
त्यांनी ‘गरिबीविरुद्ध युद्ध’ घोषित केले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लाखो गरीब अमेरिकन लोकांना मदत केली. लिंडन जॉन्सनला नागरी हक्क, बंदूक नियंत्रण आणि सामाजिक सुरक्षिततेबद्दलच्या त्यांच्या भूमिकांमुळे इतिहासकारांनी अनुकूल स्थान दिले आहे.
पण तुम्हाला काय वाटते सुपरपावर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी असे टॉयलेटमध्ये बसून मुद्दाम मुळखती देणे कितपत योग्य असू शकते ?? आपले उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.