आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
विमान प्रवास ही पहायला गेलं तर अनेकांच्या आयुष्यातील सामान्य बाब झालेली आहे. कधी ना कधी तरी विमानातून प्रवास करण्याचा योग आपल्या आयुष्यात आलेलाच असतो.
ज्यांनी विमानामधून प्रवास केला असेल त्यांना ही गोष्ट माहित असेल, की प्रवासामध्ये अडथळा उत्पन्न होईल अशा सर्वच गोष्टी विमानात प्रतिबंधित असतात.
अगदी शस्त्र म्हणून वापरली जाऊ शकतील अशी उपकरणं किंवा प्यायचं पाणी सुद्धा विमानात नेण्याची परवानगी नसणं, ही अत्यंत सहजपणे ठाऊक असलेली बाब आहे.
त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुम्रपान अर्थात सिगारेट ओढण्यास परवानगी नसणे! विमानात धूम्रपान करण्याची परवानगी देण्यात येत नाही.
जर तुम्ही विमानामधून प्रवास केला असेल तर तुमचं लक्ष ऍश ट्रेकडे नक्कीच गेलं असेल.
तर तुमच्या मनातही असा विचार आलाय का, की जर विमानात सिगारेट ओढण्यास बंदीच आहे, तर ऍश ट्रे तेथे ठेवण्याचा उपयोग तो काय? चला तर आज या बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
विमानात सिगारेट ओढण्यास केवळ प्रवाश्यांना मनाई असते असे नाही, तर विमानच्या वैमानिकांना देखील सिगारेट पिण्यास मनाई असते. विमानात प्रत्येक ठिकाणी धुम्रपान निषिद्धच्या सूचना आढळून येतात. पण तेथेच ऍश ट्रे देखील पाहायला मिळतो.
नेमकी हीच बाब अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर, अनेकजण त्याविषयी आश्चर्य व्यक्त करतात.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की, जर एखादा ऍश ट्रे खराब झाला किंवा तुटला, तर पुढच्या ७२ तासांमध्ये नवीन ऍश ट्रे तेथे ठेवला जातो. यावरून लक्षात येते की नक्कीच या ऍश ट्रेचा काहीतरी उपयोग नक्कीच असला पाहिजे.
खरं तर पूर्वी विमानामध्ये सिगारेट पिण्यास मनाई नव्हती. म्हणजे पूर्वी तुम्ही ३५,००० फुट उंचावर उडत असलेल्या विमानामध्ये सिगारेट ओढण्याची परवानगी दिली जात होती. काय? ऐकून दचकलात ना? पण हे अगदी सत्य आहे.
म्हणजेच सिगारेटचे शौकिन किंवा ‘चेन स्मोकर’ या प्रकारांत मोडणारी मंडळी सर्रासपणे विमानात सुद्धा धूम्रपान करत असत.
मात्र नंतरच्या काळात त्यातला धोका लक्षात आला. त्यामुळे धुम्रपानावर पूर्णत: बंदी घालण्यात आली. पूर्वी ज्या नियमानुसार प्रवाशांना विमानात सिगारेट पिण्याची परवानगी होती, तो नियम मात्र अजूनही तसाच आहे.
Code of Federal Regulations (14) च्या अंतर्गत प्रवासी विमानात कोठेही सिगारेट ओढू शकतो. जसे की सीटवर किंवा प्लेनच्या वॉशरूममध्ये! म्हणजेच हा नियम प्रवाशांना सिगारेट ओढण्याची पूर्ण मुभा सुद्धा देतो.
याच नियमाची पूर्तता करण्यासाठी एयरलाइन्स कंपन्या प्लेन वॉशरूममध्ये ऍश ट्रे ठेवतात.
या मागे हे देखील कारण सांगितले जाते की, समजा एखाद्या व्यक्तीने चोरून प्लेनच्या वॉशरूममध्ये सिगारेट ओढली आणि त्याने ती तिथेच झटकली तर त्या एका ठिणगीने देखील प्रवासात धोका निर्माण होऊ शकतो.
म्हणून त्या व्यक्तीने इतरत्र कोठेही सिगारेटची राख न झटकता ती ऍश ट्रे मध्येच झटकावी या उद्देशाने ऍश ट्रे ठेवला जातो.
म्हणजेच हा ऍश ट्रे ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब ठरू शकते. विमान प्रवासात कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये यासाठी करण्यात आलेली ती एक सोय आहे, असं सुद्धा म्हणता येईल.
मात्र, बहुतांश विमानतळांवर सिगारेट विमानात नेण्याची परवानगी देण्यात येत नाही.
–
हे ही वाचा – एक लीटरमध्ये विमान नेमकं किती मायलेज देते? हे रंजक उत्तर नक्की वाचा
–
याचाच अर्थ काय तर, ऍश ट्रे ही विमानातील एक शोभेची वस्तू म्हणूनच तिथे असते असेच म्हणावे लागेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.