' मालकाच्या निष्ठेखातर थेट मुघलांना भिडणाऱ्या इमानदार कुत्र्याची शौर्यगाथा… – InMarathi

मालकाच्या निष्ठेखातर थेट मुघलांना भिडणाऱ्या इमानदार कुत्र्याची शौर्यगाथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी तुम्हाला माहीतच आहे की कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी असतो. जो आपल्या मालकाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाशी देखील खेळतो.

 

dog running inmarathi

 

कुत्र्याच्या निष्ठेचे असे कित्येक किस्से आपल्याला बातम्यांद्वारे पहायला मिळतात. त्यांच्या ह्याच निष्ठेमुळे थेट सैन्यात देखील त्यांना स्थान मिळाले आहे.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही, पण हे खरे आहे की, कुत्र्यांचा आपल्या मालकाप्रती असलेला हा निष्ठेचा गुण भारतीय इतिहासामध्ये देखील आढळतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारताच्या इतिहासामध्ये एक असा कुत्रा होता ज्याने आपल्या मालकासोबत मिळून मुघलांविरुद्ध युद्धभूमीवर लढा दिला होता. आज आपण त्याच इमानदार कुत्र्याची गोष्ट जाणून घेऊ.

 

dog-marathipizza01

 

जवळपास ३५० वर्षांपूर्वी जेव्हा औरंगजेब मुघल साम्राज्याचा बादशहा होता, तेव्हा हिंदू द्वेषासाठी तो बराच कुप्रसिद्ध होता. औरंगजेबाने अनेक छोट्या-छोट्या हिंदू राज्यांवर आक्रमण करून त्यांना आपल्या राज्यात सामील करून घेतले होते.

त्यापैकी काही राज्यांनी मुघल बादशाहच्या क्रूरतेसमोर हार मानली, कारण ते विशाल मुघल सैन्याशी लढण्यास सक्षम नव्हते.

परंतु काही राजे असेही होते ज्यांनी शेवटपर्यंत मुघलांसमोर मान तुकवली नाही.

याच शूर राजांमध्ये ठाकूर मदन सिंह याचे नाव सुद्धा घेतले जाते. ते लोहारू राज्याचे पालक होते. ठाकूर मदन सिंह हे आपल्या उत्तम राज्यकारभारासाठी प्रसिद्ध होते, प्रजेसाठी केलेल्या चांगल्या कामांसाठी प्रजा त्यांना नेहमीच आशीर्वाद देत असे.

ठाकूर मदन सिंह यांना दोन पुत्र होते त्यामधील एकाचे नाव महासिंह आणि दुसऱ्याचे नाव नौराबाजी होते. ठाकूर मदन सिंहचा बख्तावर सिंह नामक एक निष्ठावंत सेवक होता.

ज्याने आपल्या इमानदारीने प्रत्येकवेळी महाराजांचे मन जिंकले होते. त्या सेवकाकडे एक कुत्रा होता, ज्यावर त्याचे खूप प्रेम होते आणि कुत्रा सुद्धा आपल्या मालकाशी इमानदार होता.

इसवी सन १६७१ची गोष्ट आहे. ठाकूर साहेबांनी औरंगजेबाला आपले राज्य देण्यास नकार दिला होता.

जेव्हा औरंगजेबाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने हिसारमध्ये नियुक्त केलेला त्याचा गवर्नर अलफु खान याला आदेश दिला की त्याने लोहारूवर आक्रमण करून त्यांचे राज्य काबीज करावे.

अलफु खान आपल्या सैन्याला घेऊन लोहारूला पोहचला, जिथे ठाकूर आपले सैन्य घेऊन लढण्यासाठी तयार होते. दोन्ही सैन्यामध्ये भीषण युद्ध झाले, त्यामध्ये दोन्ही सैन्याची खूप वित्तहानी आणि जीवितहानी झाली.

या भीषण युद्धात ठाकूर साहेबांच्या दोन्ही मुलांना वीरगती प्राप्त झाली. ठाकूर साहेबांच्या सैन्यामध्ये आता केवळ त्यांचा निष्ठावंत सेवक बख्तावर सिंह पूर्ण ताकदीने लढत होता. बख्तावर सिंहच्या बरोबर त्यांचा इमानदार कुत्रा सुद्धा रणभूमी मध्ये लढत होता.

हा कुत्रा एवढा इमानदार होता की, आपल्या मालकाला जखमी करणाऱ्या मुघल सैनिकांना चावे घेऊन बेजार करत होता. तो कुत्रा फक्त आपल्या मालकाचेच नाही तर आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठीही लढत होता.

त्याने मुघलांच्या २८ सैनिकांचा फडशा पाडला.

dog-marathipizza02

 

जेव्हा मुघल सैनिकांनी त्या कुत्र्याला सैनिकांवर हल्ला करताना बघितले तेव्हा ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. आता त्यांच्या समोर अश्या कुत्र्याचे मोठे आव्हान होते, ज्याला कोणीही एकटा मुघल सैनिक सांभाळू शकत नव्हता.

त्यामुळे सर्व मुघल सैनिकांनी एकत्र येऊन त्या कुत्र्यावर हल्ला चढवला. सैनिकांशी शूरपणे लढताना त्या कुत्र्याला वीरमरण आले. त्या कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्याचा मालक बख्तावर सुद्धा जास्त वेळ मुघलांसमोर तग धरून राहू शकला नाही आणि त्याला सुद्धा वीरगती प्राप्त झाली.

पण त्यांचे बलिदान वाया गेले नाही. संतापलेल्या ठाकूरमदन सिंहाच्या सैन्याने मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडले. युद्ध संपल्यानंतर ठाकूर मदन सिंहाने जिथे त्या कुत्र्याला वीरगती प्राप्त झाली होती, त्या जागी शूर निष्ठावंत कुत्र्याच्या आठवणीमध्ये एक वास्तू तयार केली.

याच वास्तूपासून काही अंतरावर राणी सतीचे मंदिर सुद्धा आहे, जिथे बख्तावर सिंहची पत्नी सती गेली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

टीप: लेखामध्ये वापरण्यात आलेली चित्रे केवळ संदर्भासाठी आहेत.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?