आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या देशातील वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे. विविध जात धर्म इतकी वर्षे एकत्र राहतच होते की, पण आजकाल असे अनेक लोक आहेत जे भारतात राहून भारताचे तुकडे करायचे स्वप्न बघताना दिसतात.
हीच तरुण मंडळी सहजासहजी पाकिस्तान झिंदाबाद, भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा देताना आपण पाहिली आहेत, आणि यामुळे त्यांच्या बाजूला निर्माण झालेलं लोकप्रियतेचं वलयदेखील आपण पाहिलं आहे.
याच सगळ्या सो कॉल्ड बुद्धिजीवी लोकांना वेगवेगळ्या मंचावर डीबेटसाठी बोलावलं जातं, एक गरमागरम चर्चा रंगवली जाते आणि त्या चर्चेत हीच मंडळी स्वतःच्या अकलेचे तारे तोडून स्वतःच्याच विचारधारेला फोल ठरवताना आपण बऱ्याचदा पाहिलं असेल.
स्वरा भास्कर, कन्हैया कुमार, अमूल्या लीओनी शैला रशीद ही टुकडे-टुकडे गँग म्हणूनच ओळखली जाते. या लोकांचे असे देशविरोधी घोषणा देशातच राहून देण्याचे धाडस होतेच कसे? आणि त्यावर सगळे मूग गिळून गप्प का बसतात?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
हेच वाक्य इतर कुणी बोलले असते तर त्यांना लगेच जेलची हवा असते मग या टुकडे गँगसाठी वेगळा न्याय असे का? हे आताच सुरु झालं आहे का? तर नाही… ही गोष्ट आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनची देण आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या भारतविरोधी मते बाळगणारी विचारधारा समांतरपणे चालत आलेली आहे. डावी विचारधारा मानणारे लोक हे भारताला अगदी क:पदार्थ मानतात असं आजवरचं निरीक्षण आहे.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर डाव्या लोकांनी भारत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला त्याचे चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पण या लोकांनी त्याच्या सत्यासत्यतेविषयी प्रश्न उभे केले होते.
बेंगलोर येथे मध्यंतरी झालेल्या सभेत अमुल्या लीओनी हिने ओवेसीच्या सभेत स्टेजवर जाऊन पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिली होती. तिलाही हे माहित होते की, जोवर इथे ओवेसीसारखा नेता आहे तोवर तिला गर्दीतील कुणीही काहीही करू शकणार नाही.
—
- देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!
- JNU: देशद्रोही नारे आणि अभाविपचा दीर्घ संघर्ष…
—
हे विष हळूहळू झिरपत अवघी तरुणाई खिळखिळी करत चालले आहे. आपले जवान जे सीमेवर उणे तापमानात पण देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत त्यांचे , यापूर्वी ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्या सैनिकांचे, स्वांतत्र्य मिळवून देण्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून निधड्या छातीने गोळी झेललेल्या स्वांतत्र्यसैनिकांचे बलिदान हे लोक व्यर्थ घालवत आहेत ही मोठी शोकांतिका आहे.
त्याहून मोठी शोकांतिका म्हणजे या टुकडे गँगला मीडियाने दिलेलं अभय, त्यांच्या देशद्रोही भूमिकेला दिलेला हिरोपंथी चेहरा याचा परिणाम म्हणून ही गँग दिवसेंदिवस आपले हातपाय पसरत चालली आहे.
१९५० पासूनचा इतिहास हेच सांगतो. देशात राहून देशाला विरोध करणाऱ्या लोकांची कमतरता अजिबात नाही आहे. शिवरायांच्या स्वराज्याला जसा सूर्याजी पिसाळ हा शाप होता तशीच ही गँग आपल्या भारताला असलेला शाप आहे.
या देशात स्टार होण्यासाठी तळागाळात लोकांच्या समस्या समजून घेणं, त्यांच्यासाठी सेवाभावाने काही करणे हे न करता देशविरोधी घोषणा देऊन स्टार होण्याची किती हौस आहे या लोकांना. आणि विविध वाहिन्या, पत्रकार यांचीच तळी उचलून ते कसे बरोबर होते हे दाखवायचा प्रयत्न करत राहतात.
डाव्या लोकांची विचारसरणी हीच आहे जो आपल्या देशाचा शत्रू तो यांचा मित्र. ही कथा आजची नाही.
इतिहासात जाऊन पाहिलं तर असं दिसतं की, १९६२ मध्ये जेव्हा चीनने भारतावर हल्ला करून युद्ध लादले होते तेव्हा भारत अत्यंत अडचणीत आला होता. भारताचं आर्थिक आणि मानवीय नुकसान खूप प्रमाणात झालेलं होतं.
त्यावेळी सी.एस. अच्युतानंद हे केरळचे मुख्यमंत्री होते. केरळमध्ये कायमच डाव्यांची राजवट होती. एकाएकी सी.एस. अच्युतानंद यांना मुख्यमंत्रीपदावरून पदच्युत करण्यात आले.
कारण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की, चीनसोबत युद्ध करताना आपल्या देशाच्या सैनिकांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करून ते रक्त सीमेवरील जवानांना पाठवून द्यावे.आणि तिकडे अन्नधान्याची कमतरता आहे तर आपण तिकडे अन्न धान्य ही पाठवून देऊ.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्या मते हे विचार पार्टीविरोधी होते म्हणून सी.एस. अच्युतानंद यांची सरळ पदावरून उचलबांगडी केली गेली. त्यांना पार्टीतूनच काढून टाकलं. देशाच्या विकासापेक्षा सुद्धा यांचे विचार जास्त वरचे होते.
ही गोष्ट काही प्रथमच झाली नव्हती. भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा इंग्रज भारतातून निघून गेले तेव्हा या कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांची अशी इच्छा होती की, भारतावर चीनने राज्य करावे. त्यावेळी चीन हा कम्युनिझम मानणारा पहिला देश होता.
कम्युनिझम मानणारे भारतीय नेते काही तळागाळात काम करून आलेले नव्हते. ते स्वत: श्रीमंत, भांडवलदार घरातील लोक होते. त्यामुळे त्यांचा वैचारिक विकास क्युबा, रशिया किंवा चीन मधील कम्युनिस्ट नेत्यांसारखा झालेला नव्हता.
उच्च शिक्षणासाठी हे भारतीय नेते जेव्हा ऑक्सफर्ड, केम्ब्रिज विश्वविद्यालयात शिकत होते तेव्हा ही डावी विचारसरणी यांनी अंगिकारली होती. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नीतीला हे एक मोठे हत्यारच मिळाले होते.
याच्याच जीवावर भारताचा गौरवशाली इतिहास जनतेच्या मनातून काढून टाकणे इंग्रजांना सहज शक्य होणार होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९५० सालीच जवाहरलाल नेहरुंना कळवले होते की, चीन आज न उद्या आपली डोकेदुखी होऊ शकेल. त्यामुळे केवळ पाकिस्तानच नाही तर चीनशी पण आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागेल. पण त्यांच्या या सांगण्याकडे केंद्रीय नेतृत्वाने फारसे लक्ष दिले नाही.
पुढे कम्युनिस्ट लोकांसाठी भारतीय सैन्य म्हणजे वसाहतवादीच होते. भारतीय सैन्याचा डावे पक्ष तिरस्कारच करत होते.
भारत चीन युद्धावेळी जे.कृष्णमेनन हे भारताचे संरक्षण मंत्री होते. त्यांना तर फौज म्हणजे अगदी टुकार वाटायची. त्यावेळी दिलेल्या कसल्याही इशाऱ्याकडे लक्ष न दिल्याचा परिणाम म्हणून तर भारत चीन युद्ध सुरु झाले होते.
चीनच्या विरोधात एक शब्दही कृष्णमेनन ऐकून घेत नव्हते. त्यांच्या मते सैनिक, जनरल यांच्यापेक्षा फक्त त्यांची स्वत:ची विचारधारा जास्त महत्त्वाची होती. आणि हे लोक लोकशाहीच्या गप्पा करायचे. त्यांना भीती होती, की आपण जर प्रत्येक गोष्ट लष्कराची ऐकत बसलो तर एक दिवस भारतात लष्कराचेच राज्य येईल.
माओवादी कम्युनिस्ट पक्षांच्या कार्यालयात असलेले माओचे फोटो पण या लोकांनी काढले नव्हते. किती एखाद्या विचारधारेची गुलामी करावी.
जो देश तुमच्या देशावर शत्रू म्हणून तुटून पडला आहे त्याच्याच नेत्याची भलामण करताना या लोकांना जराही कमीपणा वाटत नव्हता.
आजही या परिस्थितीत बदल झाला आहे असं वाटतं का? CAA च्या विरोधात याच लोकांनी कसा देश पेटवला हे आपण पाहिलं आहे. देशाच्या प्रत्येक विकासकार्यात यांनी कशाप्रकारे अडथळे निर्माण केले तेही आपण पाहिलं आहे. नोटाबंदी असो किंवा कोरोना महामारी यांच्या देशविरोधी कारवाया काही अजूनही थांबलेल्या नाहीत.
याच लोकांनी उघडपणे मीडियासमोर भारतीय आर्मी बलात्कारी आहे असं म्हंटलं होतं, पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर पण या कम्युनिस्ट लोकांनी इम्रान खानच्या भाषेला समर्थन देत आपल्याच सरकारवर प्रश्न उभे केले होते.
कित्येक हिंदी सिनेमातून या अशा विचारधारेला प्रमोट केलं जातं. आतंकवाद, नक्षलवादाला जस्टीफाय केलं जातं. न्यूटन किंवा रंग दे बसंतीसारख्या सिनेमातून देशातल्या सिस्टिमविषयी विष तरुणांच्या मनात कालवलं जातं, राझीसारख्या सिनेमातून पाकिस्तानसारख्या देशाला सहिष्णू दाखवण्याचा प्रयत्न होतो.
त्यामुळे आजही एक एक पाऊल किती गंभीरपणे उचलावे लागणार आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. आणि एवढं होऊन मग जर एखादा माणूस म्हणाला की “पाकिस्तान झिंदाबाद म्हणता तर त्याच देशात रहायला जा…” त्यात काय चूक आहे?
एकंदरच हा विचारधारेचा वाद आहे आणि विचाराला विचारांनीच लढा द्यायचा असतो. डावी विचारसरणी ही कितीही उदारमतवादी असल्याचं ढोंग करत असली तरी ती किती फोल आणि विनाशाकडे नेणारी आहे हे सिद्ध करताना संवैधानिक पद्धतीनेच सिद्ध करावी लागणार आहे आणि तरच एक देश म्हणून आपण पुढे जाऊ शकू!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.