आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हिंदू देवदेवतांचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक देवतेला एक वाहन आहे आणि हे वाहन पशु-पक्षी आहेत. गणपतीचा उंदीर, विष्णूंचा गरुड तर दुर्गेचा सिंह आहे. तसेच महादेवांचा नंदी. तुम्ही विचार केलाय कधी की त्या त्या देवतेची हीच वाहनं का आहेत? बारकाईनं पाहिलं तर ही वाहनं खरंतर प्रतिकं आहेत.
विष्णूचं वाहन गरुड कारण गरूड हा चपळता आणि बळासाठी परिचित आहे. तो रक्षक मानला जातो आणि म्हणूनच तिन्ही लोकांचा भार असणार्या विष्णूंचं वाहन गरुड आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
दुर्गेचं वाहन सिंह आहे कारण मुळातच दुर्जनांच्या नाशासाठी तिचा अवतार आहे. ती महिला सेनापती मानली जाते. आसुरांविरुध्दच्या भयंकर युध्दांत वाहनही तितकंच रुद्र असणं आवश्यक आहे.
सरस्वतीचं वाहन हंस आहे. सरस्वती ही विद्येची, कलागुणांची देवता आहे आणि म्हणूनच नितळतेचं, सौंद्यर्याचं प्रतिक असणारा हंस तिचं वाहन आहे.
महादेव, ज्यांनी समुद्रमंथनातून आलेलं विषही प्राशन केलं, पचवलं आणि तिन्ही लोकांना अभय दिलं असे महादेव नंदीवर स्वार होऊन येतात. याचं कारण नंदी हा पौरुषात्वाचं प्रतिक आहे.
सामर्थ्य असणार्या नंदीत भार सहन करण्याची ताकद असते. ज्या देवतेनं विष प्राशन करुन तिन्ही लोकांना भार पेलला त्या देवतेचं वाहनही, त्याला साजेसंच हवं आणि म्हणूनच नंदी महादेवांचं वाहन मानलं जातं.
महादेव हे सतत ध्यान धारणेत मग्न असं दैवत आहे, मात्र त्याचवेळेस भक्तांनी संकटात साद घातली तर जलद गतीनं सर्वात आधी पोहोचून बाकी काहीही विचार न करता मदत करणारे म्हणूनच भोळा सांब या नावानंही परिचित आहेत.
सर्वात जास्त भक्ती ज्याची केली जाते ते दैवत म्हणजे महादेव. सततच्या प्रवासासाठी न थकणारं, सामर्थ्यशाली आणि चपळ वाहन असणं गरजेचं असल्यानं महादेवांनी नंदीला निवडलं. हिंदुस्थानातच नाही तर एप ऑफ़ एग्प्टी आणि मिसोपोटेमियाचा मार्डुक, वळू देखील देवाच्या रुपातच वापरला जातो.
इतर देवतांच्या मंदिरात त्यांची वाहनं आढळत नाहीत किंवा क्वचित आढळतात मात्र शंकराच्या मंदिरात नेहमी नंदी आढळतो.
—
- प्रत्येक मंदिरासमोर, आवारात कासव असण्यामागचं कारण काय?
- “ब्रह्म” देवाचं एकच मंदिर असण्यामागे कारणीभूत आहे ‘सावित्रीचा शाप’!
—
याबाबतच्या दोन कथा सांगितल्या जातात-
पहिली कथा आहे, शिलाद मुनींची. पुराणातल्या कथेनुसार शिलाद मुनींना अपत्य नव्हतं म्हणून त्यानी शंकराची आराधना केली. एक दिवस ते आपल्या आश्रम आवारात चालत होते, तेव्हा त्यांना एक गोरं गोमटं बाळ दिसलं आणि त्याचवेळेस आकाशवाणी झाली की ‘या बाळाचा तू अपत्याप्रमाणे सांभाळ कर’.
शिलाद मुनींनी त्याचं नाव नंदी ठेवलं. यथावकाश हे बाळ कुमारवयीन मुलगा झालं. हा मुलगा सर्व विद्यात तरबेज होता. एके दिवशी आश्रमात मित्र आणि वरुण असे दोन साधू आले.
काही दिवस वास्तव्य केल्यानंतर जाताना त्यांनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशिर्वाद दिला मात्र नंदीला आशिर्वाद देताना ते कचरले. शिलाद मुनींनी याचं कारण विचारता त्यांनी सांगितलं, की या मुलाचं आयुष्य कमी आहे. हे समजल्यावर शिलाद मुनी खूप व्यथीत झाले.
नंदीनं पित्याचं दु:ख बघून साक्षात महादेवांची उपासना करायला सुरवात केली आणि अखेर महादेव प्रसन्न झाले. वर मागण्याची वेळ आल्यावर नंदीनं कायम महादेवांच्या सान्निध्यात रहाण्याची इच्छा व्यक्त केली.
महादेवांनी हे मान्य करून त्याला सांगितले, की माझ्याकडे असलेला बैल मरण पावला असल्यानं त्याच्या जागी आजपासून तू बसशील आणि माझे वाहन बसशील. यानंतर महादेवांनी नंदीला संपूर्ण गण, गणेश आणि वेदांसमोर गणांचा स्वामी म्हणून अभिषेक केला आणि अशा प्रकारे नंदी हा नंदीश्र्वर झाला.
दुसरी कथा समुद्रमंथनाची आहे-
समुद्र मंथनातून जे हलाहल बाहेर आले ते सर्व सृष्टीसाठी घातक होते. सर्व देवतांनी साकडं घातल्यावर महादेवांनी ते हलाहल प्राशन केले. महादेव ध्यानात मग्न अशी देवता आहेत मात्र या हलाहल प्राशन केल्यानं त्यांच्या गळ्याची सतत जळजळ होऊ लागली. यामुळे त्यांचं ध्यानात लक्ष लागेना.
नंदी महादेवांच्या समोर बसून त्याम्च्या गळ्यावर फ़ुंकर घालू लागला आणि त्यांच्या गळ्याची जळजळ थांबली. म्हणूनच महादेवांची ध्यानस्थ समाधी भंग होऊ नये म्हणून नंदी कायम त्यांच्यासमोर असतो अशी कथा आहे.
तुम्ही नीट पहा, नंदी प्रतिक्षेत असलेल्या आसनात असतो. भारतीय संस्कृतीत प्रतिक्षा किंवा एखाद्या गोष्टीची वाट पाहणं हे फार महत्त्वाचे मानतात.
फार कष्ट न करता, विनासायास एखादी गोष्ट मिळाली तर तिची किंमत ठेवत नाही मनुष्य. पण तेच जर वाट पाहून पाहून मिळालं तर त्या वाट पाहण्याची किंमत त्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी कायमस्वरूपी राहते.
मग देवदर्शन तर किती मौल्यवान आहे!!! थोडं थांब असंच सांगतो नंदी. नंदी शिवाकडून काही मागत नाही किंवा भक्तांनाही कशाला आडकाठी करत नाही. तो फक्त वाट पाहतो आणि याच गुणामुळे तो शंकराचा आवडता आहे.
नंदीप्रमाणं एके ठिकाणी बसून परमेश्वराची आराधना करा. त्या जगन्नियंत्याचं अस्तित्व जाणून घ्या.
जागृत अवस्थेत ध्यान लावून बसा. ध्यान लावून त्या परमात्म्याशी एकरुप होणं म्हणजे तादात्म्य पावणे म्हणजे नंदीसारखं बसणे. त्या अवस्थेत तुम्हाला त्या जगन्नियंत्याचं अस्तित्व जाणवेल. हा संदेश नंदीकडून घ्यावा यासाठी नंदीचं दर्शन आधी असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.