Site icon InMarathi

धाकड गर्ल कंगना ने सलमान-अक्षय सकट अनेक “स्टार्स”ना थेट “नकार” दिला होता

akki im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हल्ली प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर आपले मत मांडत असते. वयाच्या ३५ व्या वर्षी या अभिनेत्रीने नावापासून ते पैसा आणि प्रसिद्धी सर्व काही कमावले आहे.

बॉलीवुडमध्ये सुरूवातीला केवळ काही मोजक्याच लोकांना महत्त्व दिले जात असे, परंतु अशा या बॉलीवुडमध्ये परिश्रम करून कंगनाने स्वत:च्या जोरावर तिचे अनेक चित्रपट हिट करून दाखवले आहे आणि बॉलीवुड सारख्या एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीत तिने स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.

 

 

बॉलीवूडची थलायवी अशी ओळख असणाऱ्या कंगना रणौतने मणिकर्णिका, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि अशा इतर अनेक चित्रपटांमध्ये तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेकांना प्रभावित केले आहे. परंतु याचबरोबर या बॉलीवुड क्वीन ने सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर यांसारख्या सुपर-डुपर अभिनेत्यांच्या चित्रपटांना ही नकार दिले आहे. चला तर जाणून घेऊया त्या चित्रपटांविषयी, जी कंगना ने नाकारली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१) संजू (Sanju) :

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कंगनाला रणबीर कपूरसोबत ‘संजू’ या चित्रपटामध्ये संजय दत्तच्या ऑन-स्क्रीन पत्नीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. परंतु काही अज्ञात कारणांमुळे, अभिनेत्रीने या चित्रपटामधून माघार घेतली. ‘संजू’ हा चित्रपट अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभवी चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांनी केले होते.

 

 

२) द डर्टी पिक्चर (The Dirty Picture) :

इकोनॉमिक्स टाइम्स(ET) सोबत झालेल्या एका खास मुलाखती दरम्यान, कंगनाने खुलासा केला होता की, ‘द डर्टी पिक्चर’ मध्ये विद्या बालनला भूमिका देण्याआधी, ती ऑफर तिलाच देण्यात आली होती. पुढे ब्लॉकबस्टर मूवी नाकारण्याचे कारण सांगताना, कंगनाने शेअर केले की, “मला वाटत होते की या भूमिकेमध्ये विद्या बालन ही माझ्यापेक्षा चांगले काम करु शकली असती, कारण ती त्यात कमालीची होती. पण हो, कधीकधी मला असं वाटतं की मला या चित्रपटात काम करायला पाहिजे होते.”

 

easterneye.com

३) सुल्तान (Sultan) :

सुल्तान या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत मुख्य भूमिकेसाठी कंगनासोबत संपर्क करण्यात आले होते. परंतु तिने या चित्रपटमध्ये काम करण्यास नकार दिले, कारण तिला त्यात स्वत: साठी काहीही दिसत नव्हते. तथापि तिने नंतर एकदा व्यक्त केले होते की हे पात्र एका मुलीसाठी एक उत्तम पात्र आहे. त्यानंतर ही भूमिका अनुष्का शर्माने साकारली.

 

 

४) एयरलिफ्ट (Airlift) :

अक्षय कुमार च्या एयरलिफ्ट या चित्रपटामध्ये अक्षय कुमारच्या ऑन-स्क्रीन पत्नीच्या भूमिका निम्रत कौरला देण्याआधी निर्मात्यांनी प्रथम कंगना राणौतशी संपर्क साधला होता. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटाची ऑफर नाकारली. ऐतिहासिक घटनेवर आधारित ही मूवी राजा कृष्ण मेनन यांनी दिग्दर्शित केली होती. तसेच ही मूवी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट म्हणून उदयास आली होती.

 

dailyo.in

 

५) बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijan) :

सलमान खानच्या केवळ ‘सुलतान’च नाही तर ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामध्येही कंगनाने भूमिका करण्यस नकार दिले होते. तसे बघितले तर कंगना ही निर्मात्यांची पहिली पसंती होती पण तिने नाकारल्यानंतर अखेरीस हा चित्रपट करीना कपूर खानकडे गेला.

 

timesofindia.com

 

६) रुस्तम (Rustom) :

ज्याप्रकारे कंगनाने सलमान चे दोन चित्रपट नाकारले होते, त्याचप्रकारे तिने अक्षय कुमारचे ही दोन चित्रपट नाकारले होते. पहिले म्हणजे एयरलिफ्ट तर दूसरे म्हणजे रुस्तम. रुस्तम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी चित्रपट निर्मात्यांनी कंगनाशी अनेकवेळा संपर्क साधला होता, परंतु तिने शेवटी नकार दिला. यानंतर ही भूमिका इलियाना डी’क्रूझला ऑफर करण्यात आली. इलियाना ने अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेने सगळ्यांचे मन जिंकले होते.

 

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण

अनुपम खेरच नव्हे तर या ७ काश्मिरी पंडितांनी बॉलीवूड गाजवले आहे

अक्षय कुमार, सलमान खान या मंडळींसोबत काम करण्यासाठी अभिनेत्री जीवाचे रान करतात मात्र कंगना सारख्या अभिनेत्री मात्र स्वबळावर पुढे येतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version