Site icon InMarathi

बूगी-वूगीवाल्या जावेद जाफरीच्या जादूची कमाल – थेट जापानी गेम शोमध्ये!

javed im 1

the print

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या दशकातील ‘टकेशीज कॅसल’ नावच्या जपानी गेम शो ने पोगो या लहान मुलांसाठीच्या चॅनलवरुन नुसता धुमाकूळ घातला होता. या गेम शो मध्ये वाटेत येणारे अडथळे पार करत टकेशीच्या वाड्यापर्यंत पोचणार्‍या स्पर्धकाला विजेता म्हणून घोषित केले जायचे, पण या गेम शो इतकीच भन्नाट होती त्याची धमाल कॉमेण्ट्री!

जी केली होती प्रसिद्ध अभिनेता, कॉमेडीमॅन आणि बुगी-वूगी स्टार जावेद जाफरी याने!

धमाल मधला मानव असो की ज ज्ंतरम म म्ंतरम मधला आदित्य, जावेदणे आपल्या हलक्या फुलक्या अभिनयाने प्रत्येकात रंग भरले आहेत. भारतात ही टेकशी कॅसल फेमस होण्यात जावेदच्या सुपर डिलायटेड कॉमेडी कोमेन्ट्रीचा सिंहाचा वाटा होता. हा विषय आत्ता निघायचे कारण ही असेच एक्सायटेड करणारे आहे. काय असेल बरे हे कारण?

 

 

मुंबईत जन्म झालेल्या जावेदचे वडील ‘जगदीप’ हे हिंदी सिंनेसृष्टीतील नामवंत विनोदी अभिनेता होते. शोले सिनेमातील त्यांचा ‘सुरमा भोपाली’ आजही आपल्या चेहर्‍यावर हसू फुलवतो.

जावेदला अभिनयाचे बाळकडू मिळाले ते असे आपल्या वडिलांकडून आणि त्याने त्याचे सोने केले. ‘मेरी जंग’ या चित्रपटापासून त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. या चित्रपटात खलनायक बनलेल्या जावेदने आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘बोल बेबी बोल रॉक एन रोल’ या चित्रपटातील गाण्यावरून लोकांना त्याच्या नृत्य कौशल्याची जाणीव झाली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले.

तो खूप प्रतिभावान अभिनेता आहे आणि इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांची उत्तम मिमिक्री करतो. धमाल चित्रपटात मानव श्रीवास्तव या त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक झाले.

भाऊ नावेद जाफरी आणि मित्र रवी बहल यांच्यासोबत सोनी टीव्हीच्या लहान मुलांच्या नृत्य कार्यक्रम ‘बूगी वूगी’ मध्ये जजही होता. जो एक धमाल असा डांस शो होता.

 

 

त्याने अनेक अवॉर्ड शो देखील होस्ट केले आहेत ज्यात फिल्मफेअर, स्क्रीन, आयफा सारखे अवॉर्ड शो आहेत. त्याने भारतात आणि परदेशात २००हून अधिक लाईव्ह शो केले आहेत आणि मायकेल जॅक्सन, अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, एआर रहमान यांसारख्या सेलिब्रिटींसोबत स्टेज शेअर केले आहे.

‘सलाम नमस्ते’ या चित्रपटासाठी त्यांना प्रथमच सर्वोत्कृष्ट कॉमिक भूमिकेसाठी आयफा पुरस्कार देण्यात आला होता. डिस्नेसाठी त्याने मिकी माऊस, गूफी, डॉन कार्नेज यांचे आवाज हिंदीत डब केले आहेत.

‘रोडसाइड रोमिओ’ या चित्रपटातील चार्ली अण्णा या त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. 1980 पासून तो जाहिरात क्षेत्रात मॉडेल, कोरिओग्राफर, कॉपी रायटर, निर्माता-दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत.

जावेद जाफरी त्याच्या खास कॉमेडी आणि विनोदासाठी ओळखला जातो. प्रत्येक वेळी तो स्वत:ची वेगळी आणि नवीन स्टाइल घेऊन येतो.

 

 

टकेशीज कॅसल हा एक जपानी गेम शो आहे,ज्यामध्ये स्पर्धक छोटे छोटे अडथळे पार करत टकेशीच्या वाड्यापर्यंत पोचतात. जिथे ते लुटुपुटुचे युद्ध देखील खेळतात. धमाल मस्ती असलेला हा गेम शो जगभरातील तरुणाईमध्ये फेमस आहे.

पोगो टीव्ही चॅनेलवर १ मार्च २००५ पासून शोची एक छोटी आवृत्ती जावेद जाफरी यांच्या हिंदी डबिंग सह प्रसारित केली जाते. टकेशीज कैसल मधील जावेद यांची कोमेण्ट्री ही शो चा सर्वोत्कृष्ट भाग होती असा उल्लेख असणार्‍या या शो बद्दल ट्वीट करताना जावेद यांनी ,”हम्म!!! कया ख्याल?#TkeshisCastle#OnceMore असे ट्वीट केले आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले.

या शो च्या साहसी आणि अनोख्या कल्पनेशिवाय शो बद्दलचा सर्वात चांगला भाग म्हणजे जावेद जाफरी याचे विनोदी भाष्य. ज्याने शो लोकप्रिय व्हायला मदत झाली. टकेशीज कॅसल अमेझॉन प्राइमवर रीबुट होतो आहे ही बातमी आल्यानंतर पुन्हा जावेद जाफरीच होस्ट करणार का अशी चर्चा सुरू झाली.

द प्रिंटला दिलेल्या एका मुलाखतीत जावेद म्हणाले, की ‘या गेम शो ची कॉमेंटरी करण्याआधी मी या गेमचे ब्रिटिश व्हर्जन पहिले, पण त्यात खूप कमरेखालचे विनोद होते, आणि भारतात हा शो लहान मुलांसाठी दाखवला जाणार होता, म्हणून मी स्वतःची खास शैली तयार केली. आजही लोकं या गेम शो ची आठवण काढतात.’

जर जावेद कॉमेंट्री करणार असेल तरच मी हा शो बघेन, असे एका चाहत्याने टिप्पणी केली. शोचा रीबूट २०२३ मध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रसारित होईल.

जावेदने केलेल्या ट्वीट नंतर आता हा वॉइसओवर आर्टिस्ट पुन्हा हा शो होस्त करण्यासाठी रेडी आहे हे निश्चित आहे. आता प्रतीक्षा आहे ती लवकरच  अमेझॉन प्राईमवर पुन्हा सुरू होणार्‍या या शो ची. तेव्हा… तयार रहा या शो मध्ये धमाल करण्यासाठी. Lets play with javed jaffrey… गेट सेट गो…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version