सोन्याचा भारत निर्माण करूनही, इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या ‘या’ राजवंशाचा इतिहास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गुप्त वंशजांच्या शासन काळाला स्वर्ण काळ म्हटले जाते. गुप्त वंशाचा प्रारंभ ई.२४० मध्ये प्रथम शासक श्रीगुप्त पासून झाला होता. या वंशाचा अंतिम शासक बुद्धगुप्त याने ई.४९५ पर्यंत राज्य केले. त्याचे उत्तराधिकारी ७ व्या शतकापर्यंत राज्य करत होते, परंतु ते पूर्णपणे मर्यादित आणि शक्तिहीन राहिले.
या वंशामध्ये चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त विक्रमादित्य तसेच स्कंदगुप्त सारखे महापराक्रमी सम्राट होऊन गेले. या वंशातील सुमुद्रगुप्त हा इतिहासातील एक महान वीर म्हणून ओळखला जातो, ज्याने आपल्या तलवारीच्या जोरावर संपूर्ण भारतभर गुप्त साम्राज्याचा विस्तार केला.
चंद्रगुप्त विक्रमादित्य एक महान सम्राट होता, ज्याच्या कालखंडामध्ये भारताने विद्या, शिक्षा, संस्कृती, विज्ञान, कला आणि स्थापत्य यामध्ये आश्चर्यकारक प्रगती केली होती. धनधान्याने भरलेला आपला देश सोन्याचे भांडार म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्याच्या काळात आलेल्या चीनी यात्री फाह्यान याने भारताची स्तुती करताना त्याची राजधानी पाटलीपुत्र ही जगातील सर्वात श्रेष्ठ नगर आहे अशी आपल्या ग्रंथात नोंद केली. पाचव्या शतकामध्ये मध्य आशियामधून आक्रमण करण्यासाठी आलेल्या सैन्याचा गुप्त सम्राट स्कंदगुप्त याने धीराने सामना केला.
चला जाणून घेऊया याच गुप्त वंशांच्या राजांविषयीची संक्षिप्त माहिती.
श्रीगुप्त आणि घटोत्कच
गुप्त साम्राज्याचा पाया श्रीगुप्त याने ई.२४० मध्ये घातला होता. श्रीगुप्त याने ४० वर्ष राज्य कले आणि त्याच्या नंतर त्याचा मुलगा घटोत्कच ई.२८० पासून गुप्त साम्राज्याच्या गादीवर बसला. प्राचीन लेखांमध्ये श्रीगुप्त आणि त्याचा मुलगा घटोत्कच यांना महाराजाची उपाधी दिली गेली होती, परंतु चंद्रगुप्त प्रथम याला राजाधिराज ही उपाधी देण्यात आली आहे ज्याचा अर्थ राजांचा राजा असा होतो.
चौथ्या शतकाच्या सुरुवातीला गुप्त वंशाने मगधच्या छोट्या हिंदू राज्यापासून (आजच्या बिहारपासून) आपल्या शासनाची सुरुवात केली होती.
चंद्रगुप्त पहिला
राजा घटोत्कच याने आपला मुलगा चंद्रगुप्त पहिला याला ई.३२० मध्ये आपला उत्तराधिकारी घोषित केले. चंद्रगुप्ताने एका करारा अंतर्गत मगधची राजकुमारी कुमारदेवीशी विवाह केला.
हुंड्यात मगध साम्राज्य मिळवून आणि नेपाळच्या लिछावींना सोबत घेऊन चंद्रगुप्त याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. याप्रकारे त्याने मगध, प्रयाग आणि साकेतचे अनेक प्रांत आपल्या ताब्यात घेतले होते.
ई.३२१ मध्ये त्याने राज्याचा विस्तार गंगा नदीपासून प्रयागपर्यंत वाढवला होत. त्याला महाराजधिराज उपाधी देण्यात आली होती. मुख्य म्हणजे त्याने केवळ राजकन्यांशी विवाह रचून, आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.
समुद्रगुप्त
ई.३३५ मध्ये आपले वडील चंद्रगुप्त प्रथम यांच्या साम्राज्याला समुद्रगुप्त याने पुढे विस्तारीत केले आणि स्वतःच्या मृत्यूपर्यंत ४५ वर्ष राज्य केले. त्याने सुरुवातीला अहिचात्र आणि पद्मावती राज्याला आपल्या अधिपत्याखाली आणले. त्यानंतर त्याने मालवा, यौधेय, अर्जुनायन, मदुरा या सर्व आदिवासी भागांवर आक्रमण केले.
ई.३८० मध्ये आपल्या मृत्यूपूर्वी समुद्रगुप्ताने २० पेक्षाही जास्त गणराज्यांना आपल्या साम्राज्यामध्ये समाविष्ट करून घेतले होते. तेव्हा त्याचे राज्य हिमालयापासून नर्मदा नदीपर्यंत अवाढव्य पसरलेले होते. विदेशी इतिहासकार त्याला ‘भारतीय नेपोलियन’ मानत होते.
केवळ एक चांगला योद्धाच नव्हता तर कला आणि साहित्यप्रेमी सुद्धा होता. त्याने सध्याच्या काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या भागांवर सुद्धा विजय प्राप्त केला होता. समुद्रगुप्त स्वतः महान कवी आणि संगीतकार होता. तो हिंदू धर्माचा साधक होता आणि तो विष्णू देवांची साधना करायचा.
रामगुप्त
रामगुप्तच्या विषयी इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद आहेत, परंतु बहुतांश इतिहासकारांचे मानने आहे की, रामगुप्त हा समुद्रगुप्त याचा जेष्ठ पुत्र होता. जेष्ठ पुत्र असल्यानेच त्याच्याच हातात संपूर्ण कारभार देण्यात आला होत. परंतु राज्यकारभाराची योग्यता नसल्याने त्याला पदावरून हटवण्यात आले आणि नंतर चंद्रगुप्त दुसरा याने सत्ता सांभाळली होती.
चंद्रगुप्त विक्रमादित्य
गुप्त साम्राज्यातील प्राचीन नोंदीनुसार, आपल्या पुत्रांपैकी समुद्रगुप्तने राजकुमार चंद्रगुप्त दुसरा याला आपला उत्तराधिकारी केले होते. चंद्रगुप्त दुसरा हा इतिहासामध्ये चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या नावाने प्रसिद्ध झाला. चंद्रगुप्त विक्रमादित्य याने ई.३७५ मध्ये सत्ता सांभाळली होती. त्याने कदंब राज्याची राजकुमारी कुंतलाशी विवाह केला होता.
चंद्रगुप्त विक्रमादित्य याने आपल्या साम्राज्याचा विस्तार करताना मालवा, गुजरात आणि सौराष्ट्र हे प्रांत काबीज केले होते. ई.३९५ मध्ये त्याने आपला मुख्य शत्रू रुद्रसिन्हा तिसरा याला पराभूत करून बंगालवर आपले आधिपत्य प्रस्थापित केले होते. चंद्रगुप्त विक्रमादित्यचा काळ हा लढायांपेक्षा हिंदू संस्कृती, कला आणि विज्ञान यांच्या विकासासाठी ओळखला जातो.
गुप्तकाळच्या कलेचे सुंदर नमुने तुम्हाला देवगढच्या दशवतार मंदिरामध्ये पाहण्यास मिळतात. त्यांच्या दरबारात नवरत्न दरबारी होते, त्यापैकी एक कालिदास यांनी आपल्या कार्याने संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्धी मिळवली होती.
कुमारगुप्त पहिला
चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या नंतर त्याचा मुलगा कुमारगुप्त पहिला याला उत्तराधिकारी बनवण्यात आले. कुमारगुप्तला महेंद्रदित्यच्या उपाधीने सन्मानित केले गेले होते. त्याने ई.४५५ पर्यंत राज्य केले. त्याचा शासनकाळ संपुष्टात येईपर्यंत नर्मदा घाटीमध्ये पुष्यमित्र आपल्या साम्राज्याचा विस्तार करत होता. त्याने सध्याच्या बिहारच्या नालंदा मध्ये एक बुद्ध विश्वविद्यालय निर्माण केले होते.
===
- इसवी सन ३२० ते ५५० हे भारताचं सुवर्ण युग होतं..वाचा या अज्ञात इतिहासाची गाथा!
- हे १० योद्धे भारताच्या इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ मानले जातात===
स्कंदगुप्त
कुमारगुप्त पहिला याचा मुलगा स्कंदगुप्त पहिला याला महान गुप्त साम्राज्याचा अंतिम शासक मानले जाते. त्याने पुष्पमित्राला पराभूत तर केले होतेच, सोबतच त्याला प्रकारमी श्वेत हुनशी सामना करावा लागला होता. त्याने हुन आक्रमणाला रोखले, परंतु युद्धामध्ये त्याला खूप हानी सहन करावी लागली. ई.४६७ मध्ये स्कंदगुप्त याचा मृत्यू झाला आणि त्याचा गोत्र भाऊ पुरुगुप्त याने सत्ता सांभाळली.
गुप्त साम्राज्याचा अंत
स्कंदगुप्त याच्या मृत्यूनंतरच गुप्त साम्राज्याचे वैभव लयाला जाऊ लागले. त्याच्यानंतर काही वर्षांपर्यंत पुरुगुप्त, बुधगुप्त, नरसिंहगुप्त, कुमारगुप्त तिसरा, विष्णुगुप्त यांनी सत्ता सांभाळली. ई.४२० मध्ये श्वेत हुनांनी गुप्त साम्राज्याचा पुरता विनाश केला आणि ई.५५० मध्ये उत्तरपश्चिम भागांमध्ये हुनांनी आपले एकहुकुमी साम्राज्य प्रस्थापित केले.
अश्या या महान गुप्त राजवंशाने भारताला जगात ओळख मिळवून दिली, पण आजच्या युगात त्यांची फारशी कोणाला ओळख नाही ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.