आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याकडे म्हण आहे, ‘पी हळद आणि हो गोरी!’ अनेक जण शब्द्श: या म्हणीनुसार आपल्याला वागताना दिसतात. कधी कधी अशा आततायी वागण्याचे दुष्परिणाम देखील या लोकांना भोगावे लागतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक महाभाग बघतो की ज्यांच्या प्रत्येक वागण्यात संयमाचा अभाव दिसून येतो मग ते रोजचं जगणं असो की आरोग्याची काळजी घेण असो हे लोक आततायीपणा करतातच.
आता हेच पहा ना आजकाल आपण किती ब्युटी कॉन्शस झालो आहोत की आपणही बरेचदा अनेक प्रलोभनांना बळी पडतो आणि आधी जे होते तेच बरे होते असे म्हणायची वेळ येते. तुम्हाला ती ‘आयशा टाकीया’ आठवतेय? होय तीच ती जीने आपले ओठ आणखी सुंदर दिसावेत यासाठी ओठांवर प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि तीच्या नशिबाने ती फसली. तीच्या ओठांचा आकार बदलला आणि ओठांचे सौंदर्यही…
हा मुद्दा आत्ता येण्याचे कारण म्हणजे चेतना राज या २१ वर्षीय कन्नड अभिनेत्रीचा बंगळुरूमध्ये चरबी काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेला मृत्यू!
आता तुम्हाला प्रश्न पडतील की प्लास्टिक सर्जरीमुळे एखाद्याचा मृत्यू होवू शकतो? किंवा या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे हृदयविकाराचा धोका होवू शकतो का? हे प्रश्न गंभीर आहेत याचे कारण चेतना राज हिची शस्त्रक्रियेदरम्यान तब्येत बिघडली आणि त्याच दरम्यान तिचा मृत्यू झाला.
तिला तब्बल ४५ मिंनिटांपर्यंत ‘सिपीआर’ म्हणजेच ‘कार्डियों पाल्मोनरी रिससीटीएशन’ देण्याचा प्रयत्न केला गेला जो अयशस्वी ठरला कारण त्यापूर्वीच चेतनाचा मृत्यू झाला होता.
झाले होते असे की कोणीतरी चेतनाला सल्ला दिला की तिच्या कंबरेवरील चरबी वाढलेली असल्याने तिने ती कमी करून घ्यावी. पण तिच्या कुटुंबियांनी या शस्त्रक्रियेला विरोध केला. तेव्हा तिने आपल्या कुटुंबीयांना अंधारात ठेवून हा शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला होता.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दांत शरीरातील चरबी कमी करण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेला लिपोसक्शन म्हणतात. या ठिकाणी डॉक्टर असेही सांगतात की लिपोसक्शनमुळे फॅट ग्लोब्युल्स फुफ्फुसात जाऊ शकतात.
वास्तविक, लिपोसक्शन ही एक वैद्यकीय पद्धत आहे ज्याद्वारे डॉक्टर शरीराच्या त्या भागातून लठ्ठपणा कमी करतात जिथे ते हलवता येत नाही. जसे की मांड्या, नितंब आणि उदर आणि जिथे चरबी साठू शकतील असे शरीरातील भाग!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांना न सांगता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. चेतनाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. योग्य उपकरणांशिवाय ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
चेतना राज ही मूळची अबीगेरे, बंगलोरची आहे. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या फुफ्फुसात पाणी साचल्याने हा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील अधिकारी सांगत आहेत. चेतनाच्या वडिलांनी मात्र मीडियाला सांगितले की त्यांना याची माहिती मिळेपर्यंत ऑपरेशन सुरू झाले होते. संध्याकाळपर्यंत, चेतनाच्या फुफ्फुसात पाणी आणि चरबी भरल्यामुळे तिला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला. आयसीयूमध्ये योग्य सुविधा नव्हत्या. तेव्हा तिला दुसर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
—
- या १२ सेलिब्रिटीजचा दयनीय शेवट: जीवन कधीही कोणतंही वळण घेतं, याचा पुरावाच
- तुमच्या घरात असलेला हा एक पदार्थ तुम्हाला सुंदर बनवू शकतो!
—
चेतनाचे वडील ‘के वरदराज’ यांनी सांगितले की, हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की त्यांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या प्रशासनावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांनी बसवेश्वर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चेतना राजने ‘गीता’, ‘डोरसानी’, ‘ओल्विना नीलदाना’ या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. त्याने ‘हवायमी’ या कन्नड चित्रपटातही काम केले होते. ती एक आश्वासक आणि उभरती अभिनेत्री होती. पण या शस्त्रक्रियेच्या आततायी निर्णयामुळे तिला आपला जीव आणि आपले सोनेरी भविष्य गमवावे लागले.
आता पोलिस तपास करतील, हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई होईल, कदाचित यानंतर अशा शस्त्रक्रिया करणारे किंवा करण्याचा विचार करणारे लोक थोडेफार सावधपणे आणि डोळसपणे विचार करतील पण त्यासाठी एका चेतनाला आपला जीव गमवावा लागला हे ही तितकेच खरे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.