' एका Python मुळे आपल्या NH66 चं काम तब्बल ५४ दिवस थांबवलं गेलं होतं! – InMarathi

एका Python मुळे आपल्या NH66 चं काम तब्बल ५४ दिवस थांबवलं गेलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठल्याही हायवेचं म्हणजेच महामार्गाचं काम म्हणजे जिकिरीचं, अनेक दिवस चालणारं काम. एकदा हे काम सुरू झालं की ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या आव्हानांचा सामना करत कामगारांना ते पार पाडावं लागतं. एक विशाल हायवे तयार झाल्यानंतर त्यावरून आपली वाहनं सुसाट नेताना वाहनाबाहेर दिसणाऱ्या त्या सुंदर हायवेचं निरीक्षण करायला आपल्याला आवडतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखाद्या हायवेचं काम सुरू असताना नेहमीच्या समस्यांपेक्षा एखादी निराळीच समस्या उद्भवून त्यामुळे हायवेचं काम थांबवावं लागलं तर? “साला सांप को पाल रहा था” असा डायलॉग आपण ऐकला असेलच..

 

highway-inmarathi
dnaindia.com

 

 

गटातल्या एका व्यक्तीने चुकीच्या वेळी गटातल्या इतरांची फसवणूक करणे असा या म्हणीचा खरा अर्थ होतो. या अर्थाचा इथे काही संबंध नाही. पण या म्हणीचा शब्दश: अर्थ घेतला तर जे होईल तशीच काहीशी परिस्थिती केरळमधल्या NH 66च्या हायवेवरील कामाच्या बाबतीत घडलीये.

या कामाकरता एका ठिकाणी खणल्यावर तिथे एक बीळ आढळलं आणि त्या बिळात सापांची अंडी आढळली. ही अंडी उबवण्यासाठी तब्बल ५४ दिवस हायवेचं काम थांबवलं गेलं. काय आहे हे सगळं वृत्त? जाणून घेऊ.

 

python im

 

सापांची अंडी उबवण्यासाठी थांबवलं गेलं हायवेचं काम :

‘उरलुंगल लेबर काँट्रॅक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ (ULCCS) च्या कामगारांनी २० मार्चला केरळमधील कासारगोडमधल्या सीपीसीआरआय जवळच्या एरियल येथे NH 66चा विस्तार करून चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू केलं होतं. त्या रस्त्यावर चार फूट खाली खणल्यावर त्यांना एक बीळ दिसलं आणि त्या बिळात स्वतःला गुंडाळून बसलेली भारतीय प्रजातीची रॉक पायथन नावाची सापीण दिसली.

हे पाहून त्या कामगारांनी वन विभागाला याविषयी कळवलं. वन विभागाचे अधिकारी जेव्हा तिथे काय घडलंय ते बघायला आले तेव्हा त्यांनी रोजीरोटीसाठी ऍल्युमिनियमपासून उत्पादनं तयार करणाऱ्या आणि गेल्या दहा वर्षांपासून साप वाचवण्याचं काम करणाऱ्या अमीन अडकथबाईल यांना तिथे बोलावलं. त्या बिळात त्यांना बरीच अंडी दिसली आणि त्या भोवती ती पायथन मादी बसली होती.

 

highway-inmarathi
youtube.com

ही एकूण २४ अंडी होती. त्यानंतर अमीन यांनी याविषयी सल्ला घेण्यासाठी सरपटणारे प्राणी आणि उभयचरांचे अभ्यासक असलेल्या मावीश कुमार यांच्याशी संपर्क साधला. मूळचे कासारगोडचे असलेले मावीश कुमार हे नेपाळच्या ‘मिथिला वन्यजीव संस्थे’च्या वन्यजीव संशोधनाचे प्रमुख आहेत.

अमीन म्हणाले, “मावीश यांनी मला अंडी न हलवण्याचा सल्ला दिली कारण मादी पायथनची उब मिळाल्याशिवाय ती अंडी उबणार नव्हती.” पायथनची अंडी २७ डिग्री सेल्सियस ते ३१ डिग्री सेल्सियस या मर्यादित तापमानातच उबतात. याहून जास्त तापमान असेल तर पिल्लं मृत होऊन किंवा कमतरता घेऊन जन्माला येतात.

अंड्यांना योग्य प्रमाणात उब मिळावी म्हणून सापीण आपल्या अंड्यांना लपेटून घेते. त्यानंतर विभागाने ULCCS कंपनीला हायवेचं काम थांबवण्याची विनंती केली आणि कंपनीनेही ती विनंती मान्य केली. पायथन अंडी उबवेपर्यंत दुसऱ्या एका साईटवर काम करायचं कंपनीने ठरवलं. याविषयी ‘एबीपी लाईव्ह’शी बोलताना कासारगोडचे विभागीय वन अधिकारी पी बिजू म्हणाले, “या प्रकल्पाला वेळेचं बंधन असलं तरी त्यांनी (ULCCS कंपनीने) आमची विनंती मान्य केली. NHAI कडे जाणं आणि काम थांबवण्याची परवानगी मिळवणं त्रासदायक झालं असेल.”

पायथन्सच्या संरक्षणासंदर्भात कायदा काय सांगतो?

‘वन्यजीव संरक्षण कायद्या’च्या परिशिष्ट १ अंतर्गत पायथन्सना वर्गीकृत केलं गेलं आहे. भारतात वाघांना जसं उच्च दर्जाचं संरक्षण मिळतं तसंच ते पायथन्सनादेखील मिळतं.

 

python im 1

 

अंडी दुसरीकडे नेमकी केव्हा हलवली गेली?

NIE च्या वृत्तानुसार, अमीन हे सापाची आणि अंड्यांची पाहणी करायला दिवसातून एकदा किंवा दोनदा यायचे. पायथनची अंडी उबायला ६० ते ६५ दिवस लागतात. बांधकाम करणाऱ्या कामगारांना पायथन आढळल्यानंतरच्या ५४व्या दिवशी अंडी फुटायला सुरुवात झाल्याचं दिसलं. “याचा अर्थ अंडी घातल्यावर साधारण आठवड्याभरानंतर ती सापडली होती.”, अमीन म्हणाले.

तेव्हा अंडी हलवण्याचा निर्णय झाला कारण, यानंतर मादी पायथन अंड्यांभोवती असण्याची आवश्यक्ता नव्हती. अमीन म्हणाले, “त्यानंतर माझ्या घरी अंडी हलवण्याचा आम्ही निर्णय घेतला.” अंडी देण्यासाठी जेव्हा पायथन बिळात गेली होती तेव्हा साप बाहेर आले तर त्यांना झाकण्यासाठी आजूबाजूला झुडुपं आणि वनस्पती होत्या. आता मात्र अशी परिस्थिती राहिली नव्हती.

 

python im 4

प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवलेल्या, अतिश्रीमंत लोकांच्या “आवडत्या” महागड्या कॉफी

चक्क हत्तीचं दूध पिते ही चिमुरडी, मनुष्य- प्राण्याचं अनोखं नातं दाखवणारी गोष्ट

यासंदर्भात अमीन म्हणाले, “पण रस्त्याच्या कामाने सगळा भूप्रदेश बदलून टाकला आहे. आता ती पूर्णपणे उजाड जमीन झाली आहे. आणि पिल्लं अगदी सहजपणे गरूड, कावळे आणि बाकी शिकाऱ्यांचं सावज ठरू शकतात.” अमीन यांनी मग बिळात तीन फूट खालपर्यंत हात घातला आणि अंडी बाहेर काढली. अमीन म्हणाले, “पिल्लांची आई बिळातल्या एका भोकात आराम करत होती.

 अमीन यांच्या कासारगोडमधल्या घरी ही २४ अंडी उबवली गेली. हे घडणं ‘दुर्मिळ’ आहे असं ते म्हणाले. मुल्लेरियामधल्या जंगलात या सापांना सोडलं जाईल. समोर आलेल्या वृत्तानुसार, ULCCSने आपलं हायवेचं काम पुन्हा सुरू केलं आहे.

सापाच्या बिळाकडे काळजीपूर्वक लक्ष न देता ULCCS कंपनीच्या कामगारांनी जर ते उध्वस्त केलं असतं तर मादी पायथनसकट ती सगळी २४ पिल्लं वाचू शकली नसती, शिवाय कायद्याचंही उल्लंघन झालं असतं.

कामगारांनी या बिळाची दखल घेतल्यामुळे आणि वनविभाग आणि साप वाचवणाऱ्या अमीश यांनी तत्परता दाखवल्यामुळेच हे होऊ शकलं. या सगळ्यामुळे बरेच दिवस हायवेचं बांधकाम थांबलं खरं! हायवेवरचं बांधकाम थांबवलं जाण्यामागचं हे कारण पाहून सरकारही गंमतीने म्हणेल, “साला सांप को पाल रहा था!”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?