Site icon InMarathi

१५० वर्षांचे आयुष्य जगलेले शंकर महाराज आजही अनेकांसाठी गूढ आहेत

shankar maharaj pune im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।

दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर॥

यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।

पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है॥

हे शब्द आहेत शंकर महाराज यांचे! योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर म्हाराज त्यांच्या जिवंतपणीच अख्यायिका बनले होते.

महाराष्ट्राला असलेल्या संतपरंपरेतील प्रत्येक संत, योगी यांचे जीवन हे आजही सामान्यांसाठी गूढ आहे. जितके उकलण्याचा प्रयत्न करून तितकेच गुंतागुंतीचे बनणारे, तरिही मनाचा ठाव घेणारे!

 

 

त्यांचं छायाचित्र तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल मात्र तुम्हाला ते कोण आहेत? याची पुरेशी कल्पना नसेल. दाढी असणारा, निरागस भाव डोळ्यात असणारा आणि गुडघे मुडपून बसलेला एक तेजस्वी पुरुषाचा फोटो तुम्ही पाहिला असेलच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शंकर महाराज असं या योगीपुरुषाचं नाव आहे. मोठा भक्त संप्रदाय असणार्‍या शंकर महाराजांबाबत अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. शंभर वर्षांहूनही अधिक काळ आपल्या सहवासाचा लाभ भक्तगणांना देणारे शंकर महाराज हे इतर महाराजांसारखे नव्हते. त्यांच्या जन्मापासूनच अख्यायिका सुरू होतात.

नाशिक जिल्ह्यातील अंतापूर या गावात चिमणाजी नावाचे गृहस्थ रहात होते. चिमणाजींच्या पोटी मूलबाळ नव्हते. हे दांपत्य त्यामुळे मनातून नेहमी खिन्न असे, चिमणाजी शंकराचे मोठे भक्त होते. एकदा साक्षात शंकरानं त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं की, ”रानात जा, तुला बाळ मिळेल. ते घेऊन ये आणि त्याला पोटच्या पोराप्रमाणे वाढव”.

दुसर्‍याच दिवशी चिमणाजी सपत्नीक रानात गेले असता त्यांना झुडुपात दोन वर्षांचं बाळ सापडलं. आजूबाजूला बाळाची आई, वडिल कोणीच नव्हतं. रानमाळावर एकटं बाळ पहुडलं होतं. चिमणाजींना साक्षात्काराची खात्री पटली आणि ते हे बाळ घरी घेऊन आले. शंकराच्या प्रसादानं मिळालेलं बाळ म्हणून त्याचं नावही त्यांनी शंकर ठेवलं. काही वर्षं मातापित्यांकडे राहिल्यावर त्यानं आईवडिलांनाच आशिर्वाद दिला की, तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल आणि ते घरातून बाहेर पडले.

 

 

लहानपणापासूनच इतर मुलांसाराखा नसणारा, वेगळ असणारा हा मुलगा आईवडिलांनाच आशिर्वाद देऊन घराबाहेर पडला. जात,धर्म, नाव, गाव, आडनाव सगळे पत्ते पुसत त्यानं फक्त शंकर म्हणून आयुष्य व्यतीत केलं.

 

 

महाराजांना अष्टवक्र म्हणून ओळखलं जायचं कारण त्यांचं शरीर आठ ठिकाणी वाकलेलं होतं. महाराज अजानूबाहू होते. त्यांची बसण्याची पध्दतही अनोखी होती. ते गुडघे मुडपून बसत असत. भगवान शंकराप्रमाणेच ते वैरागी होते.

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांना आपले अध्यात्मिक पिता मानणार्‍या शंकर महारांना सिध्दी प्राप्त होती. लोकांच्या दृष्टीनं ते चमत्कार असले तरिही त्या महाराजांच्या लिला होत्या.

सुरुवातीला त्यांनी वेगवेगळी कामं केली. तमाशात सोंगाड्या म्हणून काम केले, या दरम्यान प्रयोग सुरु असताना त्यांनी मंचावरील लहान बाळाचे शीर कापल्याची आख्यायिका आहे. यावेळी या बाळाचा मृत्यु झाला. शंकर महाराजांकडून हे अनवधानाने झाले असले तरी उपस्थितांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधिन केले. मात्र यावेळी त्यांनी स्वामी समर्थांचा धावा केल्याने ते बाळ जीवंत झाल्याचे कथेत सांगण्यात येते. तेंव्हापासूनच अनेकांना त्यांच्या सिद्धीची प्रचिती आल्याचेही सांगितले जाते.

महाराज नेहमी सांगत असत की सिध्दीच्या मागे जो लागतो त्याला प्रसिध्दी हवी असते. म्हणून तुम्ही या कशाच्याही मागे न लागता भगवंत स्मरणात लीन रहा. ही सिध्दी प्राप्त करा, तुम्हाला इतर कोणत्या चमत्काराचं आश्चर्यच वाटणार नाही. अध्यात्म मार्ग, धर्माचरण हाच मुक्तीचा मार्ग आहे.

धर्म वाचवणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या ‘बाप्पाचा’ पेशवेकालीन इतिहास वाचायलाच हवा!

शेगावला जाताय? मग गजानन महाराजांच्या दर्शनासह या ठिकाणांना भेट द्याच!

महाराजांच्या भक्त समुदायात सर्व जाती, धर्मांचे भक्त होते. महाराजांची सेवा करायला, आशिर्वाद घ्यायला जाती-धर्माची कवचं आड येत नसत. एक कथा अशीही सांगितली जाते की, महाराजांच्या भक्तगणात एक भक्त धर्मानं मुस्लिम होता. तो महाराजांकडे मार्गदर्शनासाठी आला असता महाराजांनी त्याला उपदेश केला की, अरे तू नियमित नमाज पढत जा.

महाराजांचं वय काय? हा एक असाच अनिश्चित, अनुत्तरीत प्रश्न. महाराजांच्या भक्तांपैकी एकजण होते पुण्याचे डॉक्टर धनेश्वर. त्यांनी महाराजांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांचं वय १५२ वर्षं असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि ते थक्क झाले.

 

 

काही जण म्हणतात महाराज शंभर वर्षं जगले तर काही म्हणतात त्यांनी शंभरावर पन्नसही पार केलेली होती. महाराजांचं वृधत्व मात्र त्यांच्या शरीरावर, चेहर्‍यावर कधीच दिसलं नाही. धुम्रपान करणारे, मद्यपान करणारे आणि अगदी शिवीगाळ करणारे असे हे शंकर महाराज कधीही इतर योग्यांप्रमाणे भगव्या वस्त्रांत नसत. ते नेहमी साध्या पेहरावात असत. त्यांना दागिन्यांचा शौक होता मात्र ते दागिना अंगावर ठेवत नसत. ताबडतोब तो भक्तांना वाटून टाकत.

महाराजांनी एकेकाळी तमाशात सोंगाड्याचे कामही केले. मात्र स्वामींच्या दृष्टांतानंतर त्यांनी हे काम सोडून भक्तीमार्ग स्विकारला. गुरु आदेशानुसार शंकर महाराजांनी पुढे कैलासाकडे प्रस्थान केले आणि १२ वर्षं केदारेश्वराला वास्तव्य करुन प्रयाग येथे त्रिवेणी संगमावर भक्ती साधना केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

s

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version