' कथा, दिग्दर्शन आणि अभिनयात अव्वल ठरणारे हे ५ दाक्षिणात्य चित्रपट आजही मनात घर करतात – InMarathi

कथा, दिग्दर्शन आणि अभिनयात अव्वल ठरणारे हे ५ दाक्षिणात्य चित्रपट आजही मनात घर करतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लॉकडाऊनमधे इतर व्यवसायांप्रमाणेच चित्रपट व्यवसायालाही फटका बसला. अनेक हिंदी चित्रपट डब्यात गेले तर काहींकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. लॉकडाऊन संपल्यानंतर चित्र पालटेल असं वाटत असतानाच प्रेक्षकांनी मोठा धक्का दिला.

दक्षिणी चित्रपट एकामागोमाग सुपरहिटचा बोर्ड मिरवत असताना बॉलिवूडमधल्या भल्या भल्यांचे चित्रपट साफ कोसळत आहेत. आज थिएटर्समधे नि:संशयपणे साऊथचे चित्रपट गल्ला जमवत आहेत आणि बॉलिवूडच्या तोंडचं पाणी पळालं आहे. याचीच परिणीती हिंदी विरुध्द साऊथ चित्रपट या वादात झाली.

आधी अजय देवगण आणि आता महेश बाबू. हा वाद नजिकच्या काळात संपण्याची लक्षणं दिसत नाहीत. बाहुबलीपासून दाक्षिणात्य चित्रपटांची लाट आलेली दिसत असलं तरिही रजनीककांत, मामुटी पासून कमल हसन आणि चिरंजिवीपासून नागार्जून ते अलिकडच्या काळातील अल्लू अर्जूनपर्यंत सर्वांनी हिंदीला टक्कर देत दाक्षिणात्य चित्रपसृष्टीला स्पर्धेत ठेवलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जसे बॉलिवूड मसालापट असतात, तसेच टिपिकल साऊथ चित्रपट असतात. यातली गाणी, नाच असोत की मारामारीचे सीन्स. अतर्किकपणा कोळून भरलेला असूनही प्रेक्षकांना ते आवडतात, मात्र काही दाक्षिणात्य चित्रपट एक विशेष छापही पाडून गेलेले आहेत. मग तो अभिनय असो, कथा असो, दिग्दर्शन असो की छायाचित्रण. आजही हे चित्रपट पहावेसे वाटतात. पाहूया असेच काही चित्रपट-

 

१- अंजली-

 

anjali im

 

नव्वदच्या दशकापासून साऊथच्या चित्रपटांचं वेड तरूण पिढीला घेरुन गेलं. मणिरत्नम हे ऐंशीच्या दशकाच्या मध्यात झळकू लागलेलं नाव.अनेक उत्तम चित्रपट नावावर असणार्‍या या लेखक दिग्दर्शकाचा अंजली हा १९९० साली प्रदर्शित झालेला चित्रपट.

रघुवरन आणि रेवती यांच्या मुख्य भूमिका असल्या तरीही याची खरी नायिका होती, शमिली ही चिमुरडी. शेखर आणि चित्राचं सुखी चौकोनी कुटुंब असतं. मात्र एक दिवस चित्राला आपल्या पतीच्या वर्तनाचा संशय येतो. मात्र यातून जे सत्य समोर येतं ते धक्कादायक असतं.

या दोघाना अंजली नावाचं तिसरं अपत्य असतं, जे जन्माला येताच मृत आल्याचं शेखरनं सांगितलेलं असतं. प्रत्यक्षात अंजली जिवंत असते. शरीरानं ठणठणीत अंजलीची मानसिक वाढ मात्र तितकीशी झालेली नाही.

अंजलीची मेडिकल कंडीशन अशी आहे, की पालकांना तिच्याकडे सतत डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. एका सुखी चौकोनी कुटुंबात अंजलीचं अनाहुत आगमन होतं. कुटुंबाची यामुळे होणारी कुचंबणा आणि त्यांनी अंजलीला स्विकारणं या कथानकाभोवती हा चित्रपट गुंफ़ला आहे.

२- पुष्पक-

 

pushpak im

 

खरंतर रुढार्थानं हा साऊथचाच काय पण कोणत्याच “भाषेतला” चित्रपट नाही. कारण हा चक्क मूकपट आहे. सिनेमाला स्वतंत्र भाषेची गरज नाही, सिनेमॅटिक लॅग्न्वेज हीच चित्रपटाची भाषा असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट.

कमल हसन आणि सारिका यांच्या भूमिका असणारा हा मूकपट एक ब्लॅक कॉमेडी आहे.

३- किलुक्कम-

 

killukam im

 

एक अनाथ मुलगी (रेवती) आपल्या वडिलांच्या शोधार्थ उटीला येऊन पोहोचते जे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश आहेत. वडिल आणि मुलीच्या भावनिक नात्यावर बेतलेला हा हलका फ़ुलका रोमकॉम चित्रपट आहे.

१९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, प्रियदर्शन. हाच चित्रपट अमरिश पुरी आणि रेवती यांना घेऊन हिंदीतही बनला. हिंदीत हेराफ़ेरी, हंगामा सारखे एकाहून एक खुसखुशित विनोदी चित्रपट देणार्‍या प्रियदर्शनची स्वत:ची एक खास स्टाईल आहे.

प्रियदर्शन हे असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी भारतात प्रथमच रिच कलर ग्रेडींग, सुस्पष्ट ध्वनी आणि दर्जेदार डबिंग आणलं. प्रियदर्शन यांनी मल्याळम चित्रपट चित्रपट सृष्टी तांत्रिकदृष्ट्या वरच्या स्थानावर नेऊन ठेवली.

मोहनलाल आणि प्रियदर्शन ही मल्याळम चित्रपटातली जय विरू जोडी समजली जाते.

४- शिवा-

 

shiva im

 

नव्वदच्या दशकातल्या तरूणाईचा चित्रपट म्हणून ज्याची ओळख आहे असा हा चित्रपट आणि नव्या युगाच्या सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून ज्यानं सिनेमाची तांत्रिक भाषा बदलली तो रामगोपाल वर्मा.

नागार्जून आणि अमला यांच्या मुख्य भूमिका असणार्‍या या चित्रपटानं अक्षरश: वेड लावलं होतं. सायकलची चेन ओढून मारामारी करणारा हिरो रातोरात हिट झाला होता.

५- रोजा-

 

roja im

 

मणिरत्नम यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजे एक आयकॉनिक चित्रपट आहे. संतोष सिव्हन यांची सुपरिचित शैली असणारं छायांकन, ए.आर, रहमान यांची सुपरहिट गाणी आणि अरविंद स्वामी नावाचा या चित्रटानं दिलेला तरूणींचा स्वप्नातला राजकुमार.

कश्मिर खोर्‍यातल्या आतंकवादाची पाश्र्वभीमी असणारा हा चित्रपट नव्वदीच्या दशकात खोर्‍यात आतंकवादानं थैमान घातलेल्या काळातला आहे.

आज कश्मिर फ़ाईल्स हा त्याच काळातल्या सत्य घटनांवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिला आहे. त्याच टाईमलाईनवरची प्रेम कहाणी असणारा रोजा (जो नंतर हिंदितही डब झाला) आजही तितकाच ताजातवाना वाटतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?