देशातील एकमेव असं राज्य जिथे हिंदूही दोन लग्न करू शकतात
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात एक असं राज्य आहे जिथे दोन लग्नं करायची परवानगी आहे…वाचून धक्का बसला? की मनात गुदगुल्या झाल्या? इथे एक लग्न होताना मारामार होती आहे आणि दुसरं लग्न? उपवर मुलांच्या मनात पहिला प्रश्न.
विवाहित लोक इथे एक सांभाळताना तोंडाला फेस आला आहे. त्यात दुसरी बायको? कायद्याने दोन लग्न केलेली चालतात का? ही तिसरी शंका.. आहे कुठे पण ही सोय? हा महत्वाचा आणि मनातला प्रश्न.
भारतात कुठेही हिंदू विवाह कायद्यानुसार एकच विवाह करणे ग्राह्य मानले जाते. घटस्फोट झाला तरचं दुसरा विवाह केला जातो, पण त्याआधी जर पत्नी हयात असेल आणि घटस्फोट झाला नसेल तर हा विवाह बेकायदेशीर ठरतो. त्या दुसऱ्या पत्नीला या विवाहामुळे कसलेही अधिकार मिळत नाहीत.
हिंदू विवाह कायद्यानुसार एकच विवाह करणे शास्त्रसंमत आहे. दुसरा विवाह हा बेकायदेशीर मानला जातो. आधी पहिल्या पत्नीने तुम्हाला घटस्फोट दिला असेल तर ठीक नाहीतर कुणी त्यातूनही दुसरा विवाह केला आणि जर पहिल्या बायकोने तक्रार केली तर पोलिस तुमच्या भेटीला हे ठरलेलं आहे.
हे झालं हिंदूबाबत, पण मुस्लीम समाजात मात्र तशी सक्ती नाही. मुस्लीम पुरुष एका वेळी चार स्त्रियांसोबत लग्न करू शकतात. त्या चार स्त्रिया सोबत पण राहू शकतात आणि यासाठीच नागरी कायदा सगळीकडे एकसारखा हवा ही मागणी आता रेटा देत पुढे येऊ लागली आहे.
तरीही भारतात एक राज्य असं आहे जिथे कायद्याने दोन विवाह ग्राह्य धरले आहेत. ते राज्य म्हणजे गोवा. कारण गोव्यात नागरी कायदा आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे तिथे पुरुष एकापेक्षा अधिक विवाह करू शकतात
भारतीय घटना तयार होऊन बराच काळ लोटला आहे. त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात खूप बदल झाले आहेत. काही लोकांना घटनेमुळे बरंच काही मिळाले आहे तर काहीजण रिकामेच राहिले आहेत.
भारतीय दंड विधान कायद्यात काळानुसार बरेच बदल करणे अपेक्षित आहे. काही कायदे बदलले आहेत. काही कायद्यात बदल करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
भारताचा नागरी कायदा यात बदल करण्यावरून मतमतांचा गलबला उडाला आहे. आता गोवा राज्य चर्चेत आलेलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
—
- या सुट्टीत, गोव्यात फिरताना या १० गोष्टी चुकूनही करू नका…
- पोर्तुगिजांचे भारतीय जनतेवरील धार्मिक अत्याचार; काळाकुट्ट,अमानुष इतिहास!
—
असं का? गोवा हा भारतातीलच एक भाग आहे. मग भारतातील इतर भागात जे कायदे आहेत ते गोव्यात का नाही?
याचं कारण असं आहे, गोवा पूर्वी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. त्यावेळी पोर्तुगीजमधील कायदेच गोव्यातही लागू केले होते. कारण शासन त्यांचे होते. पोर्तुगालच्या राजाने जे कायदे अंमलात आणले होते त्यामध्ये हा नागरी कायदा संमत केला होता.
१८८० मध्ये हे बिल पास केलं गेलं, ज्यामध्ये पुरुषाला बहुपत्नीत्वाचा हक्क दिला होता. पुरुष मग तो कोणत्याही धर्माचा असो तो एकपेक्षा जास्त विवाह करू शकतो असं त्या कायद्यात स्पष्ट सांगितलं होतं. पण त्यासाठी काही नियम व अटी ठेवल्या होत्या.
१. एखाद्या जोडप्याला लग्नानंतर १० ते २५ वर्षं जर मुलबाळ झाले नाही, तर किंवा पहिली पत्नी गर्भवती राहत नसेल तर तो पुरुष दुसरा विवाह करू शकतो.
२. दुसरा विवाह करताना त्या पुरुषाने आपल्या पहिल्या पत्नीची लेखी संमती घेणे आवश्यक असेल. ती संमती असेल तरच हा विवाह ग्राह्य मानला जाईल.
३. हे सगळं यासाठी कारण गोव्यात प्रत्येक लग्नाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. पण गंमत अशी की आजवर या कायद्याअंतर्गत कोणत्याही विवाहाची नोंदणी झालेली नाही, किंवा या कायद्याला आजवर कोणीही आव्हान दिलेले नाही.
आज गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यातून स्वतंत्र राज्य म्हणून भारताचा भाग झाले आहे. पोर्तुगीजांनी आपले कायदे कानून मागे घेतले आहेत. अगदी हा बहुपत्नीत्वाचा कायदा देखील, पण तरीही आजसुद्धा गोव्यात दुसरा विवाह ग्राह्य मानला जातो.
आता हा मुद्दा वेगळा आहे की कितीजण तसा दुसरा विवाह करतात… आणि त्याची नोंदणी करतात. पण हत्ती गेला आणि शेपूट राहिले तसे पोर्तुगीज गेले पण हा कायदा अजूनही गोव्यात राहिला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.