' वेळेआधीच येणाऱ्या मान्सूनबद्दल तुमच्या मनात गैरसमज तर नाहीत ना? – InMarathi

वेळेआधीच येणाऱ्या मान्सूनबद्दल तुमच्या मनात गैरसमज तर नाहीत ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एप्रिल महिना उजाडला आणि आपण सगळेजण एकाच गोष्टीची बघत होतो ती गोष्ट म्हणजे आंबा. मात्र आपल्या सगळ्यांच्या पदरात आंबे यायला उशीर झाला, गेल्या महिन्याभरापासून आपण एकाच गोष्टीमुळे हैराण आहोत ते म्हणजे वाढता उकाडा. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उष्णतेची लाट आली आहे. उष्मघातामुळे अनेकजण दगावले देखील आहेत.

 

heat stroke im

 

हवामान खात्याने याबद्दलची अनेक कारणं सांगितली, त्यात नुकतंच आंध्र प्रदेश ओडिसा राज्यांनी चक्रीवादळाचा सामना केला मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आसामध्ये देखील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर आपल्याकडे काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने सगळेच चिंतेत पडले आहेत. त्यात यावर्षी आंब्यांची आवक देखील कमी असल्याने एक प्रकारचा नाराजीचा सूर पसरला आहे.

 

raghu mango inmarathi

 

ढगाळ असलेल्या वातावरणामुळे आज घराघरात यंदा लवकर पाऊस येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. बातम्यांमध्ये देखील असे सांगण्यात आले आहे की मान्सून यंदा लवकर आपले दर्शन देणार असून मे २७ पर्यंत तो दाखल होईल. सामान्यपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात होते मात्र यावेळी हाच वरुणराजा आपले दर्शन लवकर देणार आहे, त्याच हे दर्शन चांगले की वाईट? नेमका यावर्षी का तो लवकर आला आहे? हे आजच्या लक्षात जाणून घेणार आहोत…

मान्सून लवकर येण्यामागची कारणं :

यंदाचा मान्सून लवकर येण्यामागे हवामान खात्याने असा अंदाज दर्शवला आहे की, केरळमध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांमागे एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे नुकत्याच येऊन गेलेल्या सायक्लॉन वादळाच्या दुष्परिणामांमुळे विषववृत्तावर क्रॉस वेव्ह प्रवाह सुरु झाला आहे. जो मोसमी पावसासाठी एक महत्वाचा घटक आहे.

 

monsoon inmarathi
moneycontrol.com

 

गेल्या वर्षी आलेल्या ‘व्यास’ नावाच्या चक्री वादळामुळे अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. तसेच हवामान खात्याच्या एका अहवालानुसार यावर्षी आलेल्या असनी चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार बेटांवर हवेतील बाष्प खेचले गेले असल्याने हवेत एक प्रकारचा ओलावा तयार झाला आहे, सामान्यतः दरवर्षी वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांच्या ही एक पुढची पायरी आपल्याला म्हणता येईल.

उष्णतेच्या लाटेपासून सुटका?

यंदाच्या वर्षी लवकर आलेल्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी भारतातील काही भागात आलेल्या अति  उष्णतेच्या लाटेपासून लोकांना तात्पुरता दिलासा देण्याचे काम केले आहे. असनी नावाच्या चक्रीवादळाने दिल्लीत आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी केली आहे मात्र हवामान खात्याचं म्हणणं आहे की पुन्हा ही उष्णतेची लाट येऊ शकते.

 

heatwave im

 

IMD ने  शुक्रवारसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. शहराच्या काही भागात तापमान ४६ ते ४७ डिग्री पर्यंत जाऊ शकते. रविवारसाठी येलो अलर्ट दिला आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे तात्पुरता दिलासा मात्र आपल्याला मिळेल असा अंदाज त्यांनी दर्शवला आहे.

लवकर येणार मान्सून म्हणजे जास्तीचा मान्सून?

मुळात लवकर किंवा उशिरा येणारा मान्सून याचा परिणाम पावसाच्या कमी जास्त प्रमाणावर होत नाही. इंडियन एक्सरप्रेसच्या मते गेल्या काही वर्षात मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा दोन दिवस आधी होताना दिसून आले आहे. आणि असा पाऊस सतत १० दिवस मुसळधार पडतो. संपूर्ण सीजन संपताना पावसाचे प्रमाण मात्र १४ % असते जे सामान्य पाऊस पडतो त्यापेक्षा कमी असते.

 

rainy season precaution inmarathi1

उन्हाळ्यात सतत AC मध्ये राहताय? या ७ दुष्परिणामांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

ऊन, पाऊस, वारा असं वातावरण असतानाही रेल्वे रुळांना गंज का चढत नाही?

यावर्षीच्या सुरवातीलाच IMD ने  असा अंदाज दर्शवला होता कि यंदाचा मान्सून हा सामान्य असणार आहे. १९७१ ते २०२० पर्यंतचा दीर्घ कालावधी बघता सरासरी यंदा ९६-१०४ % पर्यंत पाऊस पडेल अशी शक्यता आहे. सामान्य पावसाचे प्रमाण यंदा ८७ सेमी असेल.

आधीच सामान्य जनता शेतकरी दादा वाढत्या उष्णतेमुळे हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यंदाचा लवकर येणारा मान्सून खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणी असणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?