Site icon InMarathi

एअर इंडियाबद्दल टाटांनी घेतलेल्या ‘या’ निर्णयातून त्यांच्यातील कल्पक उद्योजक दिसून येतो

air india im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी विमानाने प्रवास करणे ही खूप मोठी गोष्ट होती, परंतु आता अनेकांचे विमानाने प्रवास करणे सामान्य झाले आहे. तरीही भारतासारख्या देशात अजूनही अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्यासाठी विमान प्रवास हे स्वप्नच आहे.

आता अनेक विमान कंपन्या आहेत, ज्या लोकांना अगदी स्वस्त दरात तिकीट उपलब्ध करून देतात. स्वस्त दरात सेवा देणारी एक कंपनी म्हणजे ‘विस्तारा’.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सध्या विस्तारासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे २०२३ च्या अखेरपर्यंत एयर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्स या दोन्हींमध्ये चर्चा सुरु आहे.

२०२३ च्या अखेरीस याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता असे म्हणता येईल, की टाटा समूहाच्या या दोन विमान कंपन्यांचे लवकरच विलीनीकरण होईल.

टाटाला एअर इंडियाला अधिक चांगली सेवा देणारी कंपनी बनवायची आहे. त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही विस्तारा आणि एअर इंडियाचे लवकरच विलीनीकरण होणार असल्याचे समोर आले होते.

 

 

एअर इंडियाची टाटा समूहामध्ये घरवापसी झाल्यानंतर आता टाटाच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण तीन विमान कंपन्या आल्या आहेत. एअर इंडिया, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया.

टाटा सन्सचा एअर एशियामध्ये ८३.६७ टक्के हिस्सा आहे. उर्वरित भागभांडवल एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकडे आहे. तसेच विस्तारामध्ये टाटाचा ५१ टक्के हिस्सा आहे, बाकीचा हिस्सा सिंगापूर एअरलाइन्स (SIA) कडे आहे. त्यामुळे टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील चर्चेनंतर विस्तारा आणि एअर इंडियाचे विलीनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

परंतु ही काही पहिली वेळ नाही, याआधी पण जानेवारी २०२२ या प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र एसआयएचे अध्यक्ष भास्कर भट्ट यांनी तेव्हा या बातमीला नाकारले होते.

यानंतर ते म्हणाले होते की, ‘विस्ताराच्या कामकाजाला धक्का न लावता एअर इंडियाला कार्यान्वित करण्याचे टाटा समूहाचे उद्दिष्ट आहे’. भास्कर भट्ट हे टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे संचालक देखील आहेत.

सध्या भारतात एअर इंडिया आणि विस्तारा या दोनच पूर्ण-सेवा देणाऱ्या कंपनी आहेत. दोघेही देशांतर्गत ऑपरेशन्ससाठी एअरबस A320 आणि 737s या विमानांवर अवलंबून आहे, आणि दोघांनीही बोईंगच्या ड्रीमलाइनर्समध्ये दीर्घ पल्ल्याच्या उड्डाणासाठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे एकाच मालकाच्या या दोन कंपन्यांमध्ये भविष्यात कुठलीही स्पर्धा होऊ नये, हे विलीनीकरणामागे प्रमुख कारण सांगितले जात आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version