आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मंडळी, भारताचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे.हाच भारत महाभारत, रामायणासारख्या महान आणि अद्वितीय महाकाव्यांनी ओळखला जातो. ज्ञानाचे भांडार,निसर्गाने समृद्ध अश्या सर्वसंपन्न भारतावर आधीपासूनच परकीय आक्रमकांची नजर होती आणि कालानंतराने मोठ्या प्रमाणावर या आक्रमणांना सुरवात झाली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मंगोल,मुघल नंतर ब्रिटिश अश्या विविध आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून येथील सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टींचा ऱ्हास करायला सुरुवात केली.त्यामध्ये सर्वात अग्रभागी होती हिंदू मंदिरे.
‘जर भारतात राज्य करायचे असेल तर भारतीयांच्या धार्मिक खुणा नष्ट कराव्या लागतील’ या विचाराने त्यांनी हिंदू मंदिर पाडून तिथे त्यांची धार्मिक स्थळे उभारण्यास सुरवात केली. प्रामुख्याने परकीय आक्रमक मुस्लिम असल्याने त्यांनी मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारल्या.
इतिहासात जवळपास ३००० मंदिरे पाडून त्यावर दर्गा, मशिदी, घुमट बांधल्याचा अंदाज आहे. त्या अनेक मशिदींपैकी १० अश्या मशिदी पाहुयात जिथे आधी मंदिर अस्तित्वात होती.
१.काशी विश्वनाथ मंदिर- ग्यानवापी मशीद
सध्या सुरु असलेले वादातलं हेच ते मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू धर्मियांचे अत्यंत श्रद्धा असलेले धार्मिक स्थळ आहे. भगवान शंकराचे हे मंदिर वाराणसी येथे स्थायिक आहे. गंगा स्नान करायला किंवा विश्वनाथाला नमन करायला प्रत्येक भारतीय मोठ्या श्रद्धेने येथे येतो. एवढंच नव्हे तर ही काशीनगरी भारतातील सर्वांत पुरातन नगरींमधील एक म्हणून देखील ओळखली जाते.
मात्र आता ते पुरातन ज्योतिर्लिंग तिथे नाहीये कारण विविध मुस्लिम आक्रमकांनी तब्बल तीन वेळा आक्रमण करून हे मंदिर जवळपास जमीनदोस्त केले. त्यानंतर १६६९मध्ये औरंगजेबाने तिथे ग्यानवापी मशिद बांधली.आता सध्याला जे मंदिर तिथे अस्तित्वात आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे.
२.श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर(मथुरा)-शाही ईदगाह मशिद
श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर हे भारतीयांचे श्रद्धास्थान मथुरेला आहे.ज्याप्रमाणे द्वारकाधीश मंदिर द्वारकेला आहे अगदी त्याचप्रमाणे हे मथुरेचे श्रीकृष्णमंदिर भगवान श्रीकृष्ण यांच्या नातवाने म्हणजे वज्र यांनी बांधले होते. मथुरेचे हे मंदिर प्रत्येक भारतीयांसाठी श्रद्धेचे स्थान आहे.
आज त्याठिकाणी दिसणारी शाही इदगाह मशीद ही औरंगजेबाने १६६० च्या आसपास बांधली असल्याचा दावा आहे. बाजूचे मंदिर हे १९६५ साली प्रचंड वादानंतर बांधले गेले.
३. रुद्र महालय-जामी मशिद
गुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व ९४३ मधेच सुरू झाली होती; १२व्या शतकात सिद्धराज जयसिंह यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. मात्र १४१०-१४४४ या काळात परकीय आक्रमक अलाउद्दीन खिलजीने या मंदिराची तोडफोड केली आणि तिथे जामी मशीद वसवली.
४. भोजशाला मंदिर-कमाल मौला मशिद
भोजशाला हे एक पुरातन सरस्वती देवीचे मंदिर आहे. इ.स.पूर्व १०३४ मध्ये राजा भोज यांनी या मंदिराची उभारणी केली. मध्य प्रदेशातील धारमध्ये हे मंदिर आहे आणि हीच राजा भोज यांची राजधानीदेखील होती.
इ.स.पूर्व १२६९ मध्ये कमाल मौलाना नावाचा एक फकीर तत्कालीक माळवा प्रांतात आला आणि त्याने स्थानिक हिंदूंचे बळजबरी मुस्लिम धर्मांतर करून घेतले.नंतर अलाउद्दीन खिलजी आणि दिलावर खान यांनी त्या भोजशाला मंदिराचा काही भाग मशिदीमध्ये बदलला.
५. आदिनाथ मंदिर-आदिना मशिद
इ.स.पूर्व १३५८-९० मध्ये सिकंदर शहा याने ही आदिना मशीद बांधली. ही मशीद ही आज भारतातील सर्वात मोठी मशीद म्हणून ओळखली जाते पण या मशिदीच्या आतील भिंतींवरचे चित्र आणि कोरीव काम हे याआधी इथे मंदिर होतं अशी साक्ष देत राहतात. भिंतींवरील गणपतीची, नटराजाची आणि भगवान शंकराची चित्रे हे सर्वकाही सांगून जातात.
स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की इथे आदिनाथाचे (भगवान शंकराचे)भव्य मंदिर होते. परकीय आक्रमकांनी या ‘आदिनाथ मंदिरा’चे ‘आदिना मशिदी’त रूपांतर केले.
६. भद्रकाली मंदिर-जामा मशिद
तेव्हाच्या भद्र,राजनगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि आताच्या अहमदाबाद असणाऱ्या भागात ही मशीद आहे.या मशिदीच्या जागेवर आधी भद्रकाली देवीचे मंदिर होते.
आजही जामा मशिदीचे खांब आणि भिंती या विविध हिंदू देवदेवतांच्या चित्रांनी आणि कोरीव कामांनी भरलेल्या आहेत. एवढेच नाही तर ही मशिदभद्र किल्ल्याला लागूनही आहे म्हणजे तात्कालीक काळामध्ये त्या किल्ल्याचा काही भाग पाडून तिथे ही मशीद उभारण्यात आली असल्याचा दावा स्थानिक लोक करतात.
७. विजय मंदिर-ब्रिजमंडल मशिद
माळव्याच्या राजा नवरमण राजाने विजय मंदिराची स्थापना केली होती.विजया राणी देवीचे हे मंदिर आताच्या भोपाळमध्ये दिमाखात उभे असते. मात्र १६८५-७० मध्ये औरंगजेबाने या मंदिराची तोडफोड केली. मंदीरातील सर्व मूर्त्या जमीनदोस्त करून त्याने तिथे मशिद बांधली.
मात्र या मशिदीच्या काही स्तंभावर आजही विजया देवीचे राक्षसाचा वध करतानाचे चित्र आहेत.
८. सोमनाथ मंदिर-
बारा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकरांच्या मंदिरांमध्ये गुजरातच्या सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. या मंदिरावर आजपर्यंत १७ वेळा आक्रमण झाले आहे आणि १७ वेळा ते पाडले गेले आहे असे म्हणतात.
सुरवातीला गझनी मग खिलजी त्यानंतर औरंगजेब या सर्वांनीच या मंदिरावर हल्ला करून त्याची मोडतोड केली होती. आताचे भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले सोमनाथ मंदिर हे१९५१ मध्ये सरदार पटेलांच्या देखरेखीखाली बांधले गेले.
९. ध्रुव स्तंभ/विष्णू ध्वज -कुतुबमिनार :
आजकाल आपण दिल्लीत ज्याला कुतुबमिनार म्हणतो तो कुतुबुद्दीन ऐबक याने बांधला असे काही जण मानतात..खरेतर राजा विक्रमादित्य याने बांधलेले “हिंदू नक्षत्र निरीक्षण केंद्र” आहे, ज्याचे खरे नाव “ध्रुव स्तंभ” आहे. पण प्राचीन इतिहासकारांनी मूर्खपणाने आणि आधुनिक काळात “मुस्लिम तुष्टीकरणासाठी” कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधला होता असे सांगतात.
तुम्हाला माहित आहे का की अरबीमध्ये ‘कुतुब’ ला ‘अक्ष’, ‘केंद्रबिंदू’ किंवा ‘स्तंभ’ म्हणतात. कुतुबचा वापर खगोलीय आणि दैवी कार्यांसाठी केला जातो. ही खगोलशास्त्रीय संज्ञा आहे किंवा ती आध्यात्मिक प्रतीक म्हणून समजली जाते. अशा प्रकारे कुतुबमिनार म्हणजे खगोलीय स्तंभ किंवा बुरुज.
१०. राममंदिर अयोध्या-बाबरी मशिद :
हिंदूंच्या मते, जमिनीवर १५२८ मध्ये बाबरी मशीद बांधली गेली ती ‘रामजन्मभूमी’ (श्री रामाचे जन्मस्थान) आहे. पण, मीर बाकी, एक मुघल राजा जो बाबरचा सेनापती होता तो असे म्हणतो की पूर्वीपासून असलेले सगळी मंदिर नष्ट केले आहे आणि बाबरी नावाची मशिद त्या जागेवर बांधली आहे (बाबरची मशीद).
–
क्रूर मुघल शासकांनी विध्वंस केलेल्या या ८ मंदिरांचा इतिहास आपल्या निशब्द करतो
अयोध्येतील “त्या” धर्मस्थळाला ‘मशीद’ म्हणणं हा मुळात इस्लामचा अपमान…!
–
येथे दोन्ही समुदायांची पूजा केली आहे ‘मशीद-मंदिर”, आत मुस्लिम मशीद आणि त्याच्या बाहेर हिंदू. येथे रामाचे मंदिर असल्याचे काहीजण म्हणतात पण आयोध्यातली जमिन बाबर ने जप्त केली… तर काही मानतात की पूर्वीच्या इस्लामिक शासकांनी नष्ट केले कारण सध्या मशिदीची रचना आजच्या काळाशी मिळतीजुळती नाही..
तथापि, यात शंका नाही की मंदिर अस्तित्वात होते आणि शतकानुशतके लोक भगवान रामाची पूजा करत. तर मंडळी.. हे आहेत १० मशिदी जिथे आधी मंदिरे अस्तित्वात होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.