Site icon InMarathi

तब्बल ३६ वर्ष मुलीसाठी ‘बाप’ बनून राहिलेल्या आईची गोष्ट

lady im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या किंवा जगभरातील चित्रपट सृष्टीत बऱ्याच अभिनेत्यांना आव्हानात्मक वाटणारा आणि तितकाच भुरळ पाडणारा ट्रेण्ड म्हणजे स्त्री पात्र साकारणे. नटाने स्त्री पात्र साकारणाऱ्यांची संख्या भरपूर असली, तरीही फार कमी अभिनेते ती उत्तम प्रकारे साकार करू शकले आहे.

 

 

पण गमतीची गोष्ट अशी आहे की, नायिकांना फार कमी वेळेला पुरुष पात्राच्या भूमिकेत सादर केले गेले आहे. कदाचित स्त्रीला पुरुष भूमिकेत बघण हे तितकेसे अपील नसेल. मग प्रत्यक्ष जीवन जगताना एखादीवर स्त्री असून सुद्धा पुरुष म्हणून जगण्याची वेळ आली तर ,कसे असेल तिचे आयुष्य? ही विचार करण्याजोगी बाब आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

विश्वास नाही ना बसत ,पण आपल्या तामिळनाडू राज्यातील थोथुकुडी जिल्ह्यात वास्तवात घडलेली घटना आहे. एस .पेटिचीम्माल या ५७ वर्षीय स्त्रीची ही कहाणी. स्त्री असून देखील आपल्या आयुष्याचा तीस वर्षाहून अधिक काळ ती ‘पुरुष’ म्हणून जगली. अशी वेळ तिच्यावर का यावी ही विचार करण्याजोगी बाब आहे.

 

 

पेटीचीम्माल वीस वर्षाची असताना तिचे लग्न झाले. लग्न होऊन काही महिने होत नाही, तोच नवऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि तिच्यावर आभाळ कोसळलं.

दुःख पचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गरोदर असल्याची बाब तिला लक्षात आली. मात्र त्या परिस्थितीतही नवऱ्याची आठवण म्हणून तिने बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. एकीकडे दुःख आणि दुसरीकडे पोटातील बाळा अशा द्विधा मनस्थितीतच तिने एका मुलीला जन्म दिला.

 

 

 

पुन्हा एकदा लग्न करायची तिची तयारी नव्हती त्यामुळे मुलीच्या पालनपोषणासाठी तिला नोकरी करणे भाग होते. परंतु कामाच्या ठिकाणी तिला अनेक वाईट अनुभव आले. तरुण वय, सुंदर रुप, एकटी स्त्री, मुलीच्या जबाबदारीमुळे डोक्यावरील कर्ज या परिस्थितीत अनेकांनी तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांची वाईट नजर तर कुणी स्त्री म्हणून नाकारणे या परिस्थितीत नेमके काय करावे हे तिला समजत नव्हते.

अशावेळी परिस्थिती समोर हार न मानता तिने स्वतःच्या तसेच मुलीच्या सुरक्षिततेसाठी मुलीची ‘आई ‘ न बनता ‘बाप’ बनून जीवन जगण्याचा विचार केला.

त्यासाठी ती मुलीसह वेगळ्या शहरात स्थायिक झाली. तिथे तिला कोणाही ओळखत नव्हते.

तिने आपल्या केसांचा बॉयकट केला आणि शर्ट व लुंगी घालून मुलीचा बाप म्हणून जगायला सुरुवात केली. इतकेच नाही तर देवळात जाऊन स्वतःचे नाव देखील बदलले मुथु ठेवले.

 

 

 

सुरुवातीला हरतऱ्हेची कामे केली. रंगारी म्हणून तर चहा टपरीवर कामे केली. पुढे चेन्नई व थोथुकुडी मधील अनेक ढाब्यावर, हॉटेलात हर प्रकारची कामे केली. कामात जम बसू लागताच ,काही वर्षांनी स्वतःचा चहा आणि पराठा विक्रीचा व्यवसाय सुरु केला. काही वर्षातच ती ‘मुथु मास्टर’ म्हणून ओळखू जाऊ लागली. या व्यवसायात मिळणाऱ्या मिळकतीमधून तिने आपल्या मुलीचे शिक्षण तर पूर्ण केले. शिवाय तिचे लग्न देखील करून दिले.

बायकांच्या नकळत त्यांच्या अपत्यांचा बाप होणारा उलट्या काळजाचा “डॉक्टर”!

“दहावीत असताना मला स्त्री असल्याची जाणीव झाली”: अभिनेत्री अंजली अमीरचा खडतर प्रवास!

हा प्रवास तिच्यासाठी वाटतो तितका सोपा नव्हता. अनेक छोट्या परंतु महत्वाच्या गोष्टींसाठी तिला तडजोडी कराव्या लागल्या. जसे बसमधून प्रवास करताना स्त्रियांसाठी राखीव जागा असून देखील तिला पुरुषांच्या जागेवर बसावे लागे. इतकेच काय,अगदी सार्वजनिक शौचालयात जाताना देखील ‘पुरुषांसाठी’ असलेल्या ठिकाणी जावे लागे.

याशिवाय अनेक महत्वाच्या कागदपत्रांवर जसे, आधार कार्ड ,निवडणूक ओळखपत्र ,बँक खाते अशा अनेक ठिकाणी मुथु म्हणूनच नाव घातले आहे. वरवर या गोष्टी खूप मजेशीर वाटत असल्या तरी त्या प्रत्यक्ष आयुष्यात निभावणं हे आव्हानात्मकच आहे.

पण मुलीच्या सुरक्षित आयुष्यापुढे या अडचणी तितक्याशा कठिण वाटल्या नाहीत. गेल्या वीस वर्षांपासून ती कटायुनाय्कापत्ती येथे रहात आहे. हीचे हे रहस्य मुलीला आणि अगदी जवळच्या नातेवाईकांनाच माहित होते.

 

 

तिची मुलगी श्याममुगसुंदरी आता विवाहित आहे. आता त्यांच्या आयुष्यात सारंकाही आलबेल आहे. तिचे हे रहस्य ठाऊक झाल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले. आता तरी आपली खरी ओळख स्विकारून जगण्याचा सल्लाही तिला दिला मात्र तरीही ती आपली ओळख बदलायला तयार नाही.

ती म्हणते , ज्या ओळखीने मला आणि मुलीला सुरक्षित आयुष्य बहाल केले ,ती ओळख मी कशी काय विसरू. मला मरेपर्यत मुथु म्हणूनच जगायचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा:इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल:https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version