Site icon InMarathi

आणि बी आर चोप्रांची “मी दूसरा रफी तयार करेन” शपथ हवेत विरून गेली…!

chopra and rafi featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज आपलं बॉलिवूड फक्त साऊथच्याच सिनेमांचं रिमेक करत नाहीये तर जुन्या गाण्यांचीही वेगवेगळी रीमिक्स आणि रिमेक आपल्या कानावर पडत आहेत. बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत खरंच चांगल्या लेखकांची कमी आहे हे गेले बरेच दिवस जाणवतंय.

जुन्या संगीतकारांनी किंवा गायक गायिकांनी रचून ठेवलेली अजरामर गाणीसुद्धा यात अपवाद नाही. दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या ‘मधूबन मे राधिका’पासून रहमानच्या ‘हम्मा हम्मा’पर्यंत कित्येक गाणी अत्यंत हिडीस स्वरूपात रिमेक करून झाली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरंतर आजच्याही पिढीला ही जुनी गाणीच जास्त भावतात. जुन्या गायक आणि गायिकांनी जी गाणी करून ठेवली आहेत त्याची सर कशालाच येणार नाही हे त्रिभुवनातील सत्य आहे.

याच काही अजरामर गायकांपैकी एक म्हणजे मोहम्मद रफी. जात धर्म या पलीकडे जाऊन स्वतःच्या गायकीतून करोडो संगीतप्रेमींच्या मनात रफी यांच्यासाठी एक खास जागा आहे.

 

 

रस्त्यावर भिकाऱ्यासोबत बसून त्यांचंच दोस्ती सिनेमामधलं गाणं गाणारे रफी साहेब, आणि गाण्यांची रॉयल्टी न घेता केवळ सरस्वतीची सेवा म्हणून गाणारे रफी साहेब यांच्या साधेपणाचे खूप किस्से आहेत.

वेगवेगळ्या भाषेत हजारो गाणी गाणाऱ्या रफी साहेबांनी कधीच कशाच्या बाबतीत भेदभाव केला नाही, शिवाय इंडस्ट्रीत कुणीच त्यांच्याशी वैर घेतलं नाही. रफी साहेब म्हणजे एक देवमाणूसच होते, पण एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मात्र रफी साहेबांना कधीच गायला देणार नाही असा चंगच बांधला होता.

हा किस्सा आहे प्रसिद्ध दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांचा. वक्त, नया दौर, गुमराह, ईन्साफ का तराजूसारखे सिनेमे देणाऱ्या बी.आर.चोप्रा यांनी महाभारात ही अजरामर सिरियलसुद्धा दिग्दर्शित केली आहे.

 

 

त्या काळी बी.आर चोप्रा हे नाव आजच्या राजामौली इतकंच मोठं होतं आणि त्यांचे सिनेमे कारायला खूप मोठे अभिनेते अभिनेत्री उत्सुक असायचे. शिवाय त्यांच्या सिनेमातली गाणीसुद्धा तितकीच अजरामर होत असत.

१९५५ मध्ये त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि नया दौर हा बिग बजेट सिनेमा लोकांच्या भेटीला आणला. वैजयंतीमाला आणि दिलीप कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने चोप्रा यांना एका उंचीवर नेऊन ठेवलं.

या सिनेमाने आणखीन एका व्यक्तीला प्रसिद्धीच्या शिखरावर बसवलं ती व्यक्ति म्हणजे आशा भोसले. आशाजी यांनी बरीचशी गाणी ओ.पी नय्यर यांच्याकडेच गायली असली तरी त्यांचं करियरला योग्य वळण देण्यात बी.आर. चोप्रा यांचा सिंहाचा वाटा आहे.

जेव्हा आशाजी यांना बी आणि सी ग्रेड सिनेमांत गाण्याची संधी मिळत होती त्या काळात चोप्रा यांनी आशाजी यांना नया दौरमधून एक मोठी संधी दिली आणि त्यांनीदेखील त्याचं सोनं केलं.

नया दौरमध्ये आशाजी यांची साथ दिली मुहम्मद रफी यांनी. यानंतर जणू दिलीप कुमार हे समीकरण दृढ झालं. नया दौरच्या यशानंतर एकदा बी.आर. चोप्रा यांनी मुहम्मद रफी यांच्याकडे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला.

 

 

तो प्रस्ताव असा होता की रफी हे इतर कुणासाठी नाही तर फक्त आणि फक्त बी.आर. चोप्रा यांच्यासाठीच गाणं गातील. त्यांचा हा प्रस्ताव मुहम्मद रफी यांना अजिबात आवडला नाही, आणि त्यांनी नकार देत स्पष्टीकारण दिलं की “तुम्ही मला बंधनं घालू शकत नाही. हा आवाज दैवी आहे त्यामुळे जिथे मला गायची संधी मिळेल तिथे मी गाईन!”

रफी यांचं हे वक्तव्य चोप्रा यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं. तेव्हा बी.आर.चोप्रा यांनी त्यांनी रफी यांना यापुढे त्यांच्या सिनेमात गायची संधी मिळणार नाही असं सांगितलं. शिवाय बाहेरही इतर कामं मिळणार नाही अशी धमकीच त्यांनी रफी यांना दिली.

शिवाय याबरोबरच “मी दूसरा रफी तयार करेन” असं चोप्रा यांनी रफीला जवळजवळ धमकावलच. बी आर चोप्रा यांनी त्यांची धमकी खरी करून दाखवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. रफी समोर तगडा गायक म्हणून त्यांनी महेंद्र कपूर यांना उभं केलं.

 

 

चोप्रा आणि रफी यांच्यातल्या या वादाचा महेंद्र कपूर यांना चांगलाच फायदा झाला. चोप्रा यांच्या बॅनरखाली महेंद्र कपूर यांनी खूप गाणी गायली.

संगीतकार रवी यांनी बी.आर.चोप्रा यांच्यासोबत बरंच काम केलं होतं, रफी हे रवी यांचे अत्यंत आवडते गायक होते, त्यांना ते पुन्हा आपल्याकडे गायला हवे होते पण बी.आर.चोप्रा नेहमीच अडून बसायचे.

अखेर वक्त या सिनेमासाठी भाऊ यश चोप्रा यांनी बी.आर.चोप्रा यांची समजूत काढली आणि मग अखेर मोठ्या कालावधीनंतर रफी साहेबांनी त्या सिनेमासाठी आवाज दिला!

वक्त हा यश चोप्रा यांचा पहिला सिनेमा होता, जो प्रचंड हीट गेला शिवाय सिनेमातली गाणी आजही कित्येकांच्या तोंडी ऐकू येतात. रफी यांनीसुद्धा नंतर कोणताही राग मनात न ठेवता या सिनेमात गाणं म्हंटलं, आणि नंतरही यश चोप्रा यांच्या सिनेमात स्वतःचा आवाज दिला.

 

 

तो काळ खरंच खूप ग्रेट होता, तेंव्हाचे कलाकारसुद्धा खूप ग्रेट होते, ते ज्या पोटतिडकीने मेहनत कलाकृतिसाठी मेहनत घ्यायचे तसेच ते तितक्याच हक्काने एकमेकांशी भांडायचेदेखील, आणि पुन्हा तेच भांडण मिटवून एकत्र कामदेखील करायचे.

तेव्हा बी.आर.चोप्रा किंवा रफीसारख्या कित्येक कलाकारांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवला नसता तर आपण कित्येक महान कलाकृतींना मुकलो असतो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version