Site icon InMarathi

प्रभू श्रीरामाबद्दल नेपाळच्या माजी पंतप्रधानांचं मत धक्कादायक आहे

oli final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोदींच्या यूरोप दौऱ्याची चर्चा सुरु असतानाच बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी नेपाळला भेट दिली. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान शेर बहादूर देबुआ यांनी त्यांचे स्वागत केले. भगवान बुद्धाचे जन्मस्थळ असलेल्या लुम्बिनीमध्ये जाऊन दर्शन घेतले. तसेच त्यांनी केलेल्या भाषणामध्ये भगवान राम आणि अयोध्येचा उल्लेख केला. दोन वर्षांपूर्वी  नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी शर्मा ओली यांनी रामबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते.

 

 

गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या व्यक्तींनी पुराव्यासहित किंवा बिनपुरावी दावे करणं आता आपल्याला नवं राहिलेलं नाही. कुणीतरी एखादा दावा करतं, काही काळापुरतं चर्चेत राहतं आणि नंतर बराच काळ त्याविषयी पुन्हा काहीच ऐकू येत नाही. पण हिंदूची देवता असलेल्या रामाचा जन्म भारतात झाला नसून तो नेपाळमध्ये झालाय आणि भारतातली अयोध्या खोटी असून नेपाळमध्ये खरीखुरी अयोध्या आहे असा दावा जेव्हा केला गेला होता तेव्हा कित्येकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या.

 

 

नेमकं काय म्हणाले होते?

वाल्मिकी रामायणाचा नेपाळी अनुवाद केलेले नेपाळचे आदिकवी भानुभक्त यांच्या जयंतीनिमित्त काठमांडूच्या प्रधानमंत्री आवास येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ओली असं म्हणाले होते.

प्रभू रामचंद्रांची अयोध्या नगरी भारतातील उत्तर प्रदेशात नसून नेपाळमधील वाल्मिकी आश्रमाच्या जवळ आहे असा दावा ओली यांनी केला होता. ओली यांनी म्हटलं होतं की, भगवान राम यांचं जन्मस्थान भारतात असल्याचा दावा भारत करतो. मात्र वास्तविक नेपाळमधील जनकपूरच्या पश्चिमेला बीरजंगच्या जवळ थोरी नावाची एक जागा आहे जिथे वाल्मिकी आश्रम आहे, त्याच्याच जवळ अयोध्या आहे.

सीतेचा विवाह ज्या रामाशी झाला तो राम भारतीय आहे असा लोकांचा आजतागायत भ्रम आहे. मात्र राम भारतीय नसून नेपाळी आहे. त्यावेळी वाहतुकीची साधनं नसल्यामुळे इतक्या दूरवर राहणाऱ्या नवरा-नवरीचा विवाह होणं त्यावेळी शक्य नव्हतं असं त्यावेळी ओली म्हणाले. नेपाळ हे राष्ट्र सांस्कृतिक अतिक्रमणाचं बळी ठरलं असून त्याच्या इतिहासात हस्तक्षेप केला गेला आहे असंही ओली म्हणाले होते.

 

 

ओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे जिथे भगवान राम यांचा जन्म झाला होता. भारतातल्या अयोध्येवर वाद आहे. मात्र आमच्या अयोध्येवर कुठलाही वाद नाही.

वाल्मिकी आश्रमही नेपाळमध्ये आहे आणि जिथे राजा दशरथाने आपल्या पुत्रासाठी यज्ञ केला होता ते रिडीदेखील नेपाळमध्ये आहे. राजा दशरथ हे नेपाळचे राजे होते त्यामुळे स्वाभाविकपणे रामाचं जन्मस्थानही नेपाळच आहे.” नेपाळमध्ये बरेच वैज्ञानिक आविष्कार झाले मात्र दुर्दैवाने त्या परंपरांना पुढे नेलं गेलं नाही असंही ते म्हणाले.

‘रामायण’, ‘महाभारत’ या महाकाव्यांना भारतीय पौराणिक ग्रंथ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षांपासून रामायण महाभारतातल्या कथा आपण ऐकलेल्या असतात. प्रभू श्रीरामचंद्र हे रामायणातील केवळ एक पात्र नसून ते हिंदूंचं दैवत आहेत.

आजही रामाकडे आदर्श म्हणून पाहीलं जातं आणि पुढेही पाहीले जाईल. रामाची नगरी अयोध्या. त्याचा जन्म याच अयोध्यानगरीत झाला जी आपल्याच देशात आहे हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला असलेली ही मूलभूत माहितीच खोटी असल्याचा दावा कुणी केला तर?

 

 

ओली यांच्या या खळबळजनक दाव्यावर टीका करत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री म्हणाले होते की भारतातील डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी लोकांच्या श्रद्धेशी खेळ केलाय. ज्याप्रकारे भारतात दिला गेलाय त्याचप्रकारे नेपाळमधल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना लोक नकार देतील.

नवी दिल्ली येथे शास्त्री यांनी म्हटलं होतं, “भगवान राम हे आमच्या श्रद्धेचं प्रतीक आहेत आणि या भावनेशी खेळ करायची परवानगी लोक कुणालाही देणार नाहीत, मग ते नेपाळचे पंतप्रधान असोत किंवा आणखी कुणी.”

बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात वाल्मिकी नगर नावाचं ठिकाण आजही आहे ज्याचा काही भाग नेपाळमध्येही आहे. ओली यांनी दोन वर्षांपूर्वी रामाविषयी केलेलं ही विचित्र, वादग्रस्त वक्तव्यं एक कटू आठवण म्हणून आपल्या कायम स्मरणात राहतील.

 

गौतम बुद्धांच्या १० हस्तमुद्रांचा अर्थ सोप्या भाषेत समजून घ्या!

रामायणाचा शेवट झाला कसा? वाचा, प्रभू श्रीराम- लक्ष्मण यांच्या अवतार कार्याच्या शेवटाची कथा

आपल्या मनात रामायणाचे संदर्भ इतक्या खोलवर रुजलेले आहेत की या अशा वक्तव्यांवर आपण नक्कीच आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही. मात्र कुठल्याही देवतांबद्दल काहीही बोलण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, आपण किती मोठी वक्तव्यं करतोय याचं गांभीर्य लक्षात न घेता चक्क पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीने सहजपणे असे दावे करणं खटकणारं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version