' विध्वंसकारी हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी! – InMarathi

विध्वंसकारी हिरोशिमा आणि नागासाकी अणुहल्ल्याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याशी तुम्ही परिचित आहात. जगाच्या इतिहासातील अतिसंहारक घटनांपैकी एक म्हणून या घटनांची नोंद झाली. या दोन शहरांनी अणुबॉम्बचा मार झेलला आणि जगाने पाहिले अणुबॉम्बचे पडसाद!

आज कित्येक वर्षे लोटून गेली, पण त्या अणुबॉम्बचे पडसाद आजही तेथील नागरिकांमध्ये दिसतात. आज आम्ही तुम्हाला या हृदयद्रावक घटनेशी निगडीत काही सत्य सांगणार आहोत.

 

Hiroshima-Nagasaki-marathipizza01

 

१. अणुबॉम्ब टाकण्याच्या अगोदर अमेरिकेच्या वायुसेनेने हिरोशिमाच्या लोकांना चिठ्या टाकून बॉम्ब हल्ल्याची चेतावणी दिली होती

 

२. जपानच्या हिरोशिमामध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या लोकांच्या आठवणीमध्ये एक मशाल (The Flame Of Peace) १९६४ सालापासून प्रज्वलित आहे.

ही तेव्हापर्यंत पेटत राहणार आहे, जोपर्यंत संपूर्ण जगातून अणु हत्यारे नष्ट होत नाहीत आणि पृथ्वी पूर्णपणे अणुच्या संकटातून मुक्त होत नाही.

 

३. जपानच्या हिरोशिमामध्ये पहिला अणुबॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमाचा एक पोलीस, नागासाकी मधील लोकांना अणु उत्सर्जित किरणांपासून बचाव करण्याची पद्धती सांगण्यासाठी गेला.

त्याच्या याच प्रसंगावधनामुळे नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बने एक ही पोलीस कर्मचारी मारला गेला नाही.

 

Hiroshima-Nagasaki-marathipizza02

 

४. १९४५ मध्ये झालेल्या हिरोशिमाच्या अणुबॉम्ब हल्ल्यातून ‘सुटोमु यामागुची’ हा व्यक्ती कसाबसा वाचला, दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने तो आपल्या कामासाठी नागासाकीला गेला आणि सुदैवाने तिथेही अणु हल्ल्यातून सुरक्षित बचावला.

 

५. ओलेंडर हे हिरोशिमा शहराचे अधिकृत फुल आहे. कारण १९४५ मध्ये झालेल्या अणु हल्ल्यानंतर पहिले फुल इथेच उमलले होते.

 

olendear hiroshima inmarathi

 

६. Enola Gay नावाच्या विमानाच्या (जो अणुबॉम्बला घेऊन जात होता) कॉकपिट मध्ये १२ साइनाइडच्या गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या.

पायलटना सूचना देण्यात आली होती – जर ते हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्याच्या मिशनमध्ये अयशस्वी ठरले तर त्यांनी या साइनाइडच्या गोळ्या खाव्यात.

 

७. या विमानात असलेल्या १२ लोकांमधील फक्त ३ लोकांनाच हिरोशिमा मिशनमागील खरा उद्देश माहित होता.

 

Hiroshima-Nagasaki-marathipizza03

 

८. हिरोशिमाच्या अणु हल्ल्यानंतर हजारो लोक जखमी होऊन सुद्धा नागासाकीकडे रवाना झाले. त्यामधील १६५ लोक दोन्ही अणु हल्ल्यातून वाचले आणि त्यांनी अणुबॉम्बच्या विनाशाची गोष्ट जगासमोर मांडली.

 

९. हिरोशिमाच्या अणुबॉम्बपासून सुरक्षेसाठी एका अमेरिकन व्यक्तीने वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी एक बँक वॉल्ट तयार केले होते. अणु हल्ल्यानंतर ही बँक जेव्हा पुन्हा उभी राहिली तेव्हा नवीन मॅनेजरने वॉल्ट बनवणाऱ्याला शुभेच्छा पत्र पाठवले होते.

 

१०. हिरोशिमावर जेव्हा अणुबॉम्ब टाकण्यात आला तेव्हा  स्फोटाची तीव्रता एवढी जोरात होती की त्यामुळे जमिनीवर दिसणारी माणसांची आणि वस्तूंची सावली सुद्धा पूर्णपणे नष्ट झाली होती.

 

११. १९४५ मध्ये जपान्यांच्या रडारमध्ये काही अमेरिकी विमाने येताना दिसली होती, (त्यातील एकामध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यासाठीचे अणुबॉम्ब होते.)

परंतु त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न जपानी अधिकाऱ्यांनी केला नाही, कारण त्यांना तसूभरही कल्पना नव्हती की हीच विमाने त्यांची सुंदर शहरे जमीनदोस्त करणार आहेत.

 

Hiroshima-Nagasaki-marathipizza04

 

१२. दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठी विनाशक बॉम्बफेक हिरोशिमा आणि नागासाकी वर झाली नव्हती तर त्याही पूर्वी एक ‘ऑपरेशन मिटिंगहाउस’ राबवण्यात आले होते, ज्यामाध्यमातून अमेरिकेने टोकियोवर फायरबॉम्बिंग केली होती.

 

१३. गिंको बिलोया प्रजातीची झाडे २७० दशलक्ष वर्ष जुनी आहेत. ही झाडे कोणत्याही आजाराने किंवा हल्ल्याने क्वचितच प्रभावित होतात आणि हेच कारण होते की हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर वाचणारी ही एकमात्र प्रजाती होती. ही झाडे आजही पाहायला मिळतात.

 

१४. १९४५ मध्ये हिरोशिमामध्ये झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान अणुबॉम्ब टाकल्या जाणाऱ्या ठिकाणापासून ३ मैल लांब इमारतीमध्ये एक प्राचीन खेळ खेळला जात होता, हल्ल्यानंतर ती इमारत उध्वस्त झाली आणि खूप लोक जखमी झाले परंतु परत दुपार नंतर त्यांनी खेळ पूर्ण केला होता.

 

१५. हिरोशिमावर बॉम्ब टाकला जाईल असे भाकीत टोकियो मध्ये ३ तास आधीच करण्यात आले होते.

 

१६. हिरोशिमा घटनेनंतर जपानी सैन्याने प्रत्येक पुरुष, स्त्री आणि मुलांना शेवटच्या श्वासापर्यंत अमेरिकेशी लढण्यासाठी उत्तेजित केले. जेव्हा राजाला अटक झाली होती तेव्हा जपानी सेनेने पलटवार करण्याचा प्रयत्न देखील केला होता.

 

Hiroshima-Nagasaki-marathipizza05

 

१७. हिरोशिमा अणु हल्ल्यात बचावलेली मैदाने १७० मीटर खाली बेसमेंट मध्ये स्थित होती.

 

१८. हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये जवळपास २५ टक्के कोरियन होते.

 

१९. अमेरीकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकण्याच्या आधी ४९ प्रॅक्टिस बॉम्ब (Pumpkin Bombs) टाकले होते, ज्याच्यामुळे ४०० लोकांचा मृत्यू झाला. तब्बल १२०० लोक जखमी सुद्धा झाले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?