' मुघलांना चकवा देत हरिहरगडाचे रक्षण करणारी ‘मास्टरमाईंड आजीबाई’ आजही अनेकांना ठाऊक नाही – InMarathi

मुघलांना चकवा देत हरिहरगडाचे रक्षण करणारी ‘मास्टरमाईंड आजीबाई’ आजही अनेकांना ठाऊक नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शाळेत असताना साधारणतह तिसरी-चौथीपासून म्हणजेच वयाच्या नवव्या –दहाव्या वर्षापासून इतिहास नावाच्या विषयाची ओळख होते. अनेकदा पाठ्यपुस्तकात नसलेले तरीही प्रसिध्द असे अनेक किस्से आपण पोवाडा, पुस्तके किंवा गड-किल्ल्यांना भेट दिली असता, तिथल्या स्थानिक लोकांद्वारे अथवा गाईडकडून ऐकत असतो. वरवर जरी हे किस्से साधे वाटत असले तरी त्यामध्ये किती महानता दडली असते हे सखोल विचार केल्यानंतर जाणवते.

 

shivaji inmarathi

 

अशाच एका छोट्याशा परंतु महत्वपूर्ण घटनेविषयी जाणून घेणार आहोत .ही घटना आहे ,छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात हर्षद गड किवा हरिहर गड नावाचा प्रसिध्द असा गड आहे. त्र्यंबकेश्वरपासून साधारणतः दहा ते बारा किमी अंतरावर हा देखणा आणि चढाई करण्यास तितकाच कठिण असा हा गड! संभाजी महाराजांनी या हरिहर गडाचे हर्षद गड हे नामकरण का केले याची कहाणी खूप रंजक आहे.

१६८० च्या सुमारास औरंगजेब आपलं सुमारे ४० हजार सैन्य  घेऊन महाराष्ट्र काबीज करण्याच्या इराद्याने आला. उत्तरेकडून महाराष्ट्र काबीज करायचा त्याचा इरादा होता त्यामुळे उत्तरेच्या रस्त्यावरचे मोक्याचे सर्व किल्ले ताब्यात घेण्याचा आदेश त्याने आपल्या सरदाराना दिला.

 

fort im

 

त्यातच हरिहर गड हा महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणाऱ्या गुजरात खडक आणि उत्तर कोकणात उतरणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवर नियंत्रण ठेवणारा एक महत्वाचा किल्ला होता. हा गड जरी छोटा असला तरीही तो लष्करदृष्ट्या अतिशय महत्वाचा होता.

या किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून त्याच्या तीनही बाजूना निसर्गतः एक संरक्षण लाभले होते. शिवाय उभी चढण असलेल्या कातळ कोरीव, अरुंद अशा पायऱ्या या गडास होत्या त्यामुळे चढाई करून हा गड जिंकण ही अतिशय अवघड अशी बाब होती शिवाय गडावर माणसे आणि धान्य दोन्ही कमी आहेत ही गोष्ट मुघल सुभेदाराने घेरली  त्यामुळे त्याने चढाई न करता, उत्तरेकडून गडावर जाणारी रसद रोखण्याचे ठरविले.

धान्य आणि दारुगोळ्याचा पुरेसा पुरवठा झाला नाही ,तर महिन्या दोन महिन्यातच गडावरची माणसे उपासमारीने तरी मरतील किंवा शरण तरी येतील असा मुघल सुभेदाराचा अंदाज होता.

 

sardar im

 

असेच दिवसांमागून दिवस जात होते. कुठूनही काहीच हालचाल होत नव्हती. तेव्हा एक दिवस किल्लेदाराने निर्णय घेतला की गडावरील दोनशे सैनिकापैकी शंभर सैनिक मुघलांवर हल्ला करुन विळखा तोडतील आणि या काळात गडावर रसद पोहचविण्याचे काम काही सैनिक करतील. या प्रयत्नात मावळे यशस्वी ठरले तर गड राखता येईल आणि जरी अपयश आले तरी खाणारी तोंडे तरी कमी होतील असा विचार किल्लेदाराने केला.

ठरल्याप्रमाणे एका अंधाऱ्या रात्री मावळ्यांनी मुघल सैनिकांवर हल्ला चढविला .परंतु ,मावळे असा हल्ला नक्कीच करतील याची मुघल सुभेदाराला खात्री होती त्यामुळे तो सावध होता. तो तयारीनेच उतरला. आपले मावळे देखील उपाशी पोटी असूनदेखील शूरपणाने लढले मात्र त्यांना वीर मरण आले.

 

war im

 

या घटनेनंतर गडावरच नव्हे तर स्वराज्यातही हळहळ व्यक्त केली जात होती, दुसरीकडे मुघलांविषयीची भितीही वाढत होती.

आजीबाईंची नामी युक्ती

गडावरही शांतता पसरली होती. हा वेढा तोडायचा कसा? शत्रुची नजर चुकवून अन्नधान्य आणायचे कसे? या प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने प्रत्येकजण हतबल झाला होता.  मात्र या निराशेच्या गर्तेत गडावरील एक आजीबाई आशेचा किरण ठरल्या,

या हल्ल्यानंतर काही दिवसांनी मुघल सैनिक गडाखाली उष्ट्या पत्रावळ्या मोजून उचलत असताना तिने पाहिले. ही महत्वाची बाब तिने लगेचच हरिहर गडाच्या किल्लेदाराच्या नजरेस आणून दिली. इतकेच नाही तर या पेच प्रसंगातून बाहेर पडण्याची युक्ती देखील तिने किल्लेदाराला सांगितली.

 

old lady im

 

त्यानुसार त्या रात्री गडावर मोठा जल्लोष करण्यात आला. दारुगोळा –फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

अचानकपणे गडावर इतका जल्लोष सुरु होण्यामागचे कारण न कळल्यामुळे मुघल सैनिक गोंधळून गेले आणि इथेच आजीबाईंचा पहिला डाव यशस्वी झाला. 

“आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं!”, वाचा रायबाचं पुढे काय झालं?

जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनिमाला कापून काढतात…!

दुसऱ्या दिवशी पत्रावळ्या गोळा करताना त्या पाचशे ते सहाशे आढळून आल्या म्हणजेच किल्ल्यावर मुबलक प्रमाणात रसद पोचली असून ,आता मराठे आपल्याला भारी पडणार. त्यातच पावसाळा सुरु होणार होता  आणि गडाच्या या परिसरातील प्रचंड पावसाविषयी मुघल सुभेदार चांगलाच जाणून होता. त्यामुळे त्याने लगेचच वेढा उठविला आणि माघारी वळला.

 

maratha im

 

गडावरील अशिक्षित आजीबाईंचा खडा नेमका बरोबर लागला होता. राजनिती, व्यवस्थापन, कुटनिती यांचा कोणताही अनुभव नसलेल्या आजीबाईने शेकडो मराठ्यांचे प्राण वाचवले होते. 

एका सामान्य आजीबाईंनी सुचविलेल्या युक्तीमुळे गडावरील अनेकांना संजीवनी मिळाली, गडाचेही रक्षण झाले ही गोष्ट जेव्हा संभाजी राजांना कळली तेव्हा त्यांनी त्या आजीबाईचा योग्य तो आदर सत्कार केला. आणि या गोष्टीची आठवण म्हणून गडाचे हर्ष गड असे नामकरण केले.

 

fort 1 im

 

त्र्यंबकेश्वर परिसरात आजीबाईची ही कहाणी प्रसिध्द आहे .पण महराष्ट्रात ती तितकीशी प्रसिध्द नाही, मात्र ही कथा जास्तीत जास्त इतिहासप्रेमींना ठाऊक असायलाच हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?