अदानींवर टीका करणाऱ्या Quint ने स्वतःला अदानींनाच विकून टाकलंय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘गौतम अदानी’ हे भारतातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक नाव. एअरपोर्टपासून कर्जमाफीपर्यंत विविध गोष्टींसाठी अदानी समूह कायमच चर्चेत असतो, फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्सलादेखील मागे टाकले आहे.
गौतम अदानीच्या कंपनीने बाजार भांडवलाने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी हे आता ८८५० दशलक्ष डॉलर (६.६१ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील १० व्या क्रमांकाचे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
त्यांच्या संपत्तीचा आढावा घेतला, तर आपल्याला फक्त वाचून दम लागेल, पण संपत्तीची यादी संपणार नाही. कार आणि विमानांची तर मोजदादच नाही. महागड्या गाड्यांची त्यांना आवड असल्याने कार्सचं अफलातून कलेक्शन त्यांच्याकडे आहे.
–
- श्रीमंत व्हायचंय? एका जाणकार माणसाचा सल्ला, फक्त ५ टिप्स!
- श्रीमंत व्हायचंय, पण कसं? जाणून घ्या.. श्रीमंतांच्या “या” १५ सिक्रेट सवयींमधून…!
–
विमानांचा तर एक ताफाच त्याच्याकडे आहे. बॉम्बार्डियर, एक बीचक्राफ्ट आणि हॉकर अशी विमानं त्यांच्याकडे आहेत. त्यांनी ऑगस्टा वेस्टलँड AW139 हे हेलीकाप्टर १२ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
विविध क्षेत्रात वावर असणारे अदानी मीडियापासून तरी कसे लांब राहतील? नुकतंच त्यांनी ‘द क्विंट’मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्राइवेट लिमिटेडमध्ये आता अदानी समूहाचा ४९ टक्के हिस्सा असणारे.
याआधी मार्च २०२२ मध्ये देखील क्विंटचे काही शेअर्स अदानी समूह विकत घेईल अशी चर्चा होती, पण १३ मे ला अदानी समूहाने सांगितले, की त्यांनी क्विंटिलियन मीडिया लिमिटेड (QML) आणि QBML सोबत शेअरहोल्डर करार (SHA) केला आहे. त्यांनी QML, QBML आणि Quint Digital Media Limited (QDML) सोबत शेअर खरेदी करार (SPA) देखील केला आहे.
पत्रकारिता करताना अनेक गोष्टींचे भान बाळगणे गरजचे असते, पण हल्ली सरसकट टीकास्त्र सोडण्याचं धोरण अनेक मीडिया चॅनेल्स करताना दिसतात. ‘क्विंट’ने आतापर्यंत अदानी समूहावर बरीच टीका केली आहे. क्विंटचे स्टेक्स विकत घेतल्यानंतर आता अदानी समूह क्विंटवर भारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
क्विंटच्या वार्तांकनाने आतापर्यंत भारताच्या अनेक गोष्टी धोक्यात आल्या आहेत. कुलभूषण जाधव प्रकरणातही ‘क्विंट’ने जाधव पाकिस्तानातील स्पाय अशा आशयाच्या बातम्या दिल्या होत्या. या बातम्यांचा उपयोग पाकिस्तानने इंटरनॅशनल कोर्टात केला होता.
सध्या जगभरातील औद्योगिक क्षेत्रात बदलाचे वारे वाहत आहेत. एलोन मस्कने ट्विटर विकत घेतलं … याप्रमाणे अदानी समूहाने क्विंट पूर्णच विकत घेतलं तर आश्चर्य वाटायला नको.
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.