आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ज्ञानव्यापी मशिद हा सध्याचा सगळ्यात चर्चेतला मुद्दा आहे. ही मशिदही मंदिराच्या जागेवर बांधली आहे, असा दावा तर गेली अनेक वर्ष करण्यात येत आहे. एवढंच नाही, तर अयोध्येत कोर्टाने राम मंदिराची वाट मोकळी करून दिल्यानंतर, ‘अयोध्या तो बस झांकी हैं’ या घोषणेने जणू पुन्हा जोर धरलाय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
याचाच एक परिपाक म्हणजे ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरात सर्वेक्षण करण्याचा घेण्यात आलेला निर्णय! त्यातच आता हे सर्वेक्षण सुरु असतानाच १२ फुटांचं शिवलिंग ज्ञानव्यापी मशिद परिसरातील विहरीत सापडल्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आलं.
कोर्टाने सुद्धा हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आणि ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा आणि त्यामुळे उडणारा धुरळा लवकर थांबणार नाही, यावर शिक्कामोर्तब झालं. अर्थात मंदिरावर बांधलेली मशिद आणि मंदिराचे ऐतिहासिक पुरावे हा विषय काही फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.
तिकडे उत्तरेकडे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या जागेवरून हा उहापोह सुरु असतानाच, तशीच काहीशी मागणी दक्षिणेला
कर्नाटकात सुद्धा जोर धरू लागली आहे.
कर्नाटकातील या मशिदीच्या बाबतीत…
कर्नाटकातील मांड्या भागात जामिया मशिद आहे. या मशिदीच्या बाबतीत हिंदू वर्गाने एक मोठा दावा ठोकला आहे. ही मशिद हे मुळात मंदिर असून त्याठिकाणी मशिदीची निर्मिती झाली असल्याचं या हिंदूंचं म्हणणं आहे. त्यामुळेच मशिदीच्या परिसरात पूजापाठ करण्याची परवानगी द्यावी असं या गटाने म्हटलं आहे. एवढंच नाही, तर ही मशिद मुळात मंदिर असल्यामुळे इथे नमाज पठण होऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नेमका दावा काय?
जामिया मशिद ही मुळात एक मंदिर असून, या मंदिरात ‘अंजनेय’ देवाची पूजा करण्याची परवानगी मिळायला हवी. ही वास्तू म्हणजे मूळ अंजनेय मंदिर असून, त्याचे रूपांतर मशिदीत करण्यात आलं आहे. मध्ययुगीन काळापासूनच इथे मंदिर अस्तित्वात असल्याचा दावा या गटाने केलेला आहे. या मंदिराच्या जागेवरच मशिदीची निर्मिती झाली असल्याचे ऐतिहासिक पुरावे असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय.
या सगळ्या पार्श्वभूमीवरच मशिदीच्या परिसरात पूजा करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे. तसं रीतसर पत्र मांड्या विभागाच्या उपायुक्तांकडे सादर करण्यात आलं आहे.
–
अझानचं पूर्वीचं स्वरूप कसं होतं? लाऊडस्पीकरचा वापर कोणी सुरु केला… जाणून घ्या
‘अयोध्याच’ नव्हे तर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या ‘या’ धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या
–
टिपू सुलतानच्या एका पत्राविषयी सांगत, ऐतिहासिक पुराव्यांचा दावा करण्यात आला आहे. या मंदिराविषयी टिपू सुलतानाने इराणचा राजा खलिफ याला सांगितलं होतं. याठिकाणी मशिद नसून ‘अंजनेय मंदिर’ होतं हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे असल्याचं मत मांडलं गेलं आहे. पुरातत्व खात्याने यात लक्ष घालून योग्य तो पाठपुरावा करण्याची मागणी सुद्धा या हिंदू गटाने केली आहे.
या नव्या दाव्याचं पुढे नेमकं काय होणार? यावरूनही नवं वादळ पेटणार का? हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती आणि तिचे लागलेले परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी सुद्धा अशा मागण्या होऊ लागल्या, तर त्यात अनेकांना आश्चर्य वाटणार नाही, हे मात्र निश्चित!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.