Site icon InMarathi

पवारांच्या कानशिलात लगावणारा महाभाग तब्बल ८ वर्ष फरार होता…

pawar im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

 

 

केतकीने फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या विषयाला तोंड फुटलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

शेतकरी आंदोलनावरुन सचिन तेंडुलकरने टविट केल्यानंतर माजी कृषीमंत्री व एनसीपी प्रमुख शरद पवारांनी, “आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील” असे म्हटले होते. यानंतर पवारांना थप्पड लगावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

१० वर्षांपूर्वीच्या बातमीचा हा व्हिडिओ जो सध्याच्या व्हायरल व्हिडिओशी मिळता जुळता आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर नव्या ट्रेंडला भरती आली आहे.

शरद पवार हे युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषिमंत्री होते त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. २४ नोव्हेंबर २०११ रोजीच्या बातमीत म्हटले आहे की, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना नवी दिल्ली महानगरपालिका (एनडीएमसी) केंद्रात एका तरुणाने थप्पड लगावली. दिल्लीत एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्यावर ते बाहेर जात असताना हरविंदरसिंग नावाच्या तरूणाने त्यांना थप्पड लगावली होती.

 

 

कृषिधोरणांमधला नाकर्तेपणा आणि उदासीनता तसेच सरकारचे नियंत्रण नसल्याच्या रागातून ही कृती केल्याचे हरविंदरसिंगने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. श

शरद पवारांना थप्पड लगावणा-या हरविंदरसिंगला आठ वर्षानंतर २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली. ही घटना घडली होती तेव्हाच त्याला ताब्यात घेण्यात आले होते. खटल्यादरम्यान २०१४ मध्ये त्याला दिल्ली न्यायालयाने फरार घोषित केले होते. अरविंदरला हरविंदर या नावानेही ओळखले जाते.

दिल्ली पोलिसांनी अरविंदरला अटक केल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला कारण ते गेली ८ वर्षे आरोपीला शोधत होते.

 

 

अटक केल्यानंतर तो कोठडीतून पळाला होता. शोधूनही न सापडल्याने त्याला २०१४ मध्ये फरारी घोषित करण्यात आले होते. २०११ मध्ये शरद पवार कृषीमंत्री होते. दिल्लीतील इफ्कोच्या एका कार्यक्रमात त्यांच्याबाबत हा प्रकार घडला होता. आरोपी अरविंदर याने पवारांच्या गालावर थप्पड लगावली होती. पवार तेव्हा बाहेर पडत होते. अचानक झालेल्या हल्ल्याने शरद पवारही तोल गेल्याने खाली पडता पडता वाचले होते.

या हल्ल्यानंतर संसद मार्गावरील या ऑडिटोरियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अरविंदरला पकडले होते आणि पोलिसांच्या ताब्यात दिले होते. हल्लेखोर अरविंदर हा एक वाहतूकदार होता.

मात्र पोलिसांच्या तावडीतून तो अत्यंत बेमालूमपणे निसटला, त्यानंतर त्याचा शोध सुरु झाला, मात्र हरविंदर नेमका कुठे आहे याचा ठावठिकाणा लागत नव्हता. सातत्याने त्याचा शोध पोलिसांनी सुरुच ठेवला. 

गोपीनाथ मुंडे यांनी उघडकीस आणले दाऊद आणि शरद पवारांचे संबंध…?

बाळासाहेब ठाकरे – शरद पवार मैत्रीचे, जनतेसमोर न आलेले महत्वपूर्ण पैलू

काही काळानंतर हे प्रकरण काहीसे विस्मृतीत गेले, मात्र त्यातच ८ वर्षांनंतर पोलिसांना खबरींकडून हरविंदरच्या हालचालींबाबत माहिती मिळाली. हरविंदर हा एका कामाकरिता नाईलाजाने दिल्लीजवळ येणार असल्याची बाब समजातच दिल्ली पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या,

 

Fwww.dnaindia.com

 

पवार यांनी त्याच्या या कृत्याला भ्याडपणा म्हटले होते.

 

 

केतकी चितळे प्रकरणानंतर हा व्हिडीओ मँटर आणि थप्पडनामा पुन्हा चर्चेत आला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनाही या केतकी चितळे प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, “कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांबद्दल आपण काय भाषा वापरतोय याचं भान हे असलं पाहिजे,” असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. यासंदर्भात कायदा योग्य तो निर्णय घेईल,” असंही ते पुढे म्हणाले.

काही असो. विषय हार्ड आहे. केतकी चितळेमुळे या दहा वर्षे जुन्या थप्पड नाम्याला उजाळा मिळाला आणि शिळ्या कढीला उत आला हे मात्र नक्की!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version