Site icon InMarathi

मानसिक आजार की निर्ढावलेपण: केतकी चितळेच्या वादग्रस्त कृतींचा पाढा

ketaki chitale image im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या अभिनयाने नव्हे तर वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे! केतकी आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे,

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांविरोधात सोशल मिडीयावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आणि महाराष्ट्रातील राजकारणतही त्याचे पडसाद उमटलेले दिसले.

 

 

राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या केतकी चितळेने शरद पवारांवर केलेली ही अश्लाघ्य टिका बहुतेकांना रुचली नाही. वय, अनुभव अशा सर्वार्थाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीवर अशा शब्दात टिका करणे, विशेषतः त्यांच्या व्यंगावर बोट ठेवणे हे भारतीय संस्काराला अनुसरून नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एकीकडे महाराष्ट्रातून टिका होत असताना दुसरीकडे कोर्टात केतकीने बेधडकपणे आपली बाजू मांडत वागण्याचे समर्थन केले आहे. कोणाविषयीही मत मांडणे हे माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे तिने म्हटले आहे.

 

Charmboard

 

मात्र केतकीने घेतलेला हा पंगा काही नवा नाही. यापुर्वीही आपल्या शब्दांतून तर कधी कृतीतून केतकीने अनेकदा वादांना आमंत्रण दिले आहे.

जाणून घेऊयात केतकी चितळेच्या वादांचा न संपणारा पाढा…

कॉमेडियन अग्रिमा जोशुआने शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारक या विषयी केलेल्या विनोदानंतर बराच वाद उफाळला होता. त्यानंतर अग्रिमाने माफी मागत याविषयाला पुर्णविराम दिला होता, मात्र या वादात केतकीने उडी घेतल्याने हे प्रकरण चिघळले होते.

याविषयी केतकीने केतकीने केलेल्या पोस्टमध्ये तिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. आपला मुद्दा समजावून सांगताना तिने महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला असून याविषयी अनेक धमक्याही आल्याचे तिने सांगितले होते.

 

 

शिवाजी महाराजांची शिकवण विसरून त्यांच्या नावावर पोकळ विनोद करणाऱ्यांना तिने आपल्या पोस्टमधून खडे बोल सुनावले होते, मात्र यामध्ये तिने केलेल्या एकेरी उल्लेखावरून शिवसैनिकांसह पदाधिकारीही संतप्त झाले होते.

अॅट्रोसिटीचाही गुन्हा

काही महिन्यांपुर्वी केतकीने सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये विविध जाती धर्मांचा उल्लेख केला होता. नवबुद्ध ६ डिसेंबरला फुकटात मुंबई फिरण्यासाठी येतात असं धक्कादायक विधान तिने केले होते. त्यावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला जावे लागले होते,

 

 

तसेच आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत तिच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल केला होता.

मानसिक रुग्ण की…?

केतकी चितळे ही मानसिक रुग्ण असल्याची बाब या दरम्यान समोर आली होती. एकीकडे तिच्यावर टिकेच्या तोफा डागल्या जात असताना दुसरीकडे ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा खुलासा करण्यात आला होता.

केतकी ही एपिलेप्सी आजाराने ग्रस्त असून त्यावर उपचारही सुरु असल्याचे तिने सांगितले होते. या आजारामुळेच आपल्याला झी मराठीवरील तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप तिने केला होता.

 

 

उपचारांदरम्यानचे फोटो ती सोशल मिडीयावर पोस्ट करत असल्याने अनेकांनी तिला सहानुभूती दिली होती.

कोणताही आजार असला तरी सोशल मिडीयाचा आझार घेत कोणत्याही व्यक्तीबद्दल आक्षोपार्ह विधान करणे योग्य नाही. सोशल मिडीयावर वावरताना काही नियमांच्या चौकटींची मर्यादा राखणे गरजेचे आहे.

आता केतकी चितळे प्रकरणात नेमकी शिक्षा होणार का? केतकी बचावासाठी कोणता युक्तीवाद करणार? कायदा काय ठरवणार? याची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version