Site icon InMarathi

घरपोच येणारं दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त? ओळखण्याच्या ५ सोप्या टिप्स

milk im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दूध हा पदार्थ माणसाच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे. माणसाच्या आहारात दुधाचा वापर होत असतो. शरीरासाठी दूध हे पौष्टिक असल्याने लहानपणापासून माणूस दूध पित असतो.

अगदी तान्ह्या बाळापासून म्हाताऱ्या आजी- आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी दूध हे अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं आहे.

दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात. त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि ए, डी, के आणि ई जीवनसत्त्व असतात.

 

 

 

लहान मुलांच्या पोटात अधिकाधिक दूध कसं जाईल याकडे आई लक्ष देत असते, दुधाचा फक्कड चहा ही अनेकांच्या आवडीची गोष्टी आहे. पनीर, तूप, खरवस, लस्सी हे दुधापासून तयार झालेले पदार्थ चवीने खाल्ले जातात.

 

 

इतकं सगळं असलं, तरीही एकूण दुधापासून मिळणारं जीवनसत्त्व माणसाच्या अंगी लागतं का? असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत पडणं अगदीच स्वाभाविक आहे. त्याचं कारण म्हणजे दुधात होणारी भेसळ.

हल्ली भाज्यादेखील अशुद्ध पाण्यावर पिकवल्या जातात, दुधात पाण्याची भर टाकली जाते आणि असं निकृष्ट दर्जाचं दूध अनेक घरांमध्ये पोहोचवलं जातं. यामुळे जीवनसत्वाचा नाश होतो. म्हणूनच आपल्या घरी येणारे दूध किती शुद्ध आहे? हे तपासणे सद्यस्थितीत गरजेचे आहे.

आपल्याला घरपोच दूध रोज मिळतं, पण घरी येणारे दूध किती प्रमाणात शुद्ध आहे याची आता पडताळणी करता येणार आहे. ही पडताळणी आपण घरच्या घरी करू शकतो. काही घरगुती सोप्या चाचण्या केल्या, तर दुधातली भेसळ आपल्यालाही चटकन लक्षात येते.

अशा पद्धतीने दुधात केली जाते भेसळ :-

शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही दुधात भेसळ करून तसे भेसळयुक्त दूध वापरले जाते. यामुळे बऱ्याचदा लहान मुले दगावली गेली आहेत.

दुधात होणारी भेसळ दोन प्रकारची असते.

 

 

१) आरोग्यासाठी आवश्यक पदार्थ काढून टाकून पाण्याची मिलावट केली गेली, तर ते दूध सबस्टॅन्डर्ड असते. या भेसळीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम तर होत नाहीत; पण दुधातली पोषकमूल्य मात्र कमी होतात.

२) दुसऱ्या प्रकारच्या भेसळीमध्ये काही पावडरी दुधात मिसळल्या जातात. या भेसळीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

दूधातील भेसळ ओळखण्यासाठी करा हे उपाय :-

 

 

१) स्वयंपाक घरातील लाटणं किंवा मग त्यासारखीच एखादी गुळगुळीत लाकडी काडी घ्या. लाटणं उभं धरा आणि त्याच्या वरच्या टोकावर दुधाचे काही थेंब टाकून पाहा.

दुध खाली घसरलं आणि पांढरट ओघळ दिसला तर दूध शुद्ध आहे, तसेच दूध खाली घसरूनही पांढरट ओघळ दिसला नाही, तर ते भेसळयुक्त आहे.

२) दुधात आयोडिनचे काही थेंब टाका. दुधाचा रंग बदलून निळसर झाला, तर त्या दुधात भेसळी केली आहे अस समजावं.

३) दुधातील भेसळ ओळखण्याचा हा अगदी सोपा उपाय आहे. दूध हातावर ओता आणि हात एकमेकांवर रगडा. हात तेलकट झाले, तर दूध भेसळयुक्त आहे. शुद्ध दुधात एवढा तेलकटपणा दिसून नसतो.

४) दूध उकळल्यानंतर त्यात गाठी तयार झाल्यास त्या दुधात भेसळ केली असल्याचे समजते. शुद्ध दूध हे आटले जाते आणि त्याचा रंग बदलतो, पण त्यात गाठी होत नाहीत.

५) भेसळीच दूध ओळखण्यासाठी दुधात सोयाबीन पावडर टाका. काही वेळाने त्यात लाल रंगाचा लिटमस पेपर बुडवा. लिटमस पेपरचा रंग निळा झाल्यास दुधात भेसळ केली आहे. रंग न बदलल्यास दूध शुद्ध आहे असे समजले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version