आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजकाल आपले आरोग्य उत्तम कसे ठेवावे या विषयाला घेऊन लोक प्रचंड जागरूक झालेले दिसतात. वाढलेले वजन आटोक्यात राहावे, आपण शारीरिक दृष्ट्या स्लीम ट्रिम आणि फिट असावे यासाठी प्रत्येकजण जीवाचा आटापिटा करत असतो.
कोणी जीमला जाऊन शरीर फिट आणि पिळदार ठेवताना दिसतात तर कोणी दोरीवरच्या उड्या मारून. कोणी आपल्या साखर झोपेतून भल्या पहाटे उठून फिरायला जातात तर कोणी सूर्य नमस्कार घालतात.
प्रत्येकाची फिट राहण्याची पद्धत वेगवेगळी असते. वरील सगळ्या गोष्टींसोबतच डाएट हादेखील वजन आटोक्यात ठेवण्याचा आणि वाढलेले वजन कमी करण्याचा नवीन आणि प्रचलित फंडा आहे.
दिक्षित डाएट, दिवेकर डाएट, किटो डाएट, पालेओ डाएट असे वेग वेगळ्या प्रकारचे डाएट प्लान आपण आपली शरीरयष्टी आणि आरोग्य यांचे संतुलन अबाधित राहण्यासाठी फॉलो करत असतो. सध्या अजून एका नवीन डायटची चलती आहे ज्याचे नाव आहे लिक्विड डाएट.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मध्यंतरी लोकप्रिय क्रिकेटपटू शेन वॉर्नचं अकाली निधन झालं आणि सारं क्रिकेटविश्वच सुन्न झालं. खरंतर शेन हा एकदम फिट होता आणि त्याला अचानक आलेला हा अटॅक इतका घातक ठरू शकेल असं खुद्द त्यालादेखील कधीच वाटलं नसेल.
शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता, आणि आहार तज्ञांचं असंही म्हणणं आहे की त्याच्या मृत्यूमागे हेच लिक्विड डाएट कारणीभूत आहे.
आता नेमकं यात तथ्य किती हे आपल्याला फारसं ठाऊक नाही, पण तरी जर तुम्हीसुद्धा हे लिक्विड डाएट फॉलो करणार असाल तर हा लेख एकदा आवर्जून वाचावाच.
काय आहे बरे हे लिक्विड डाएट? याचे फायदे काय? तोटे काय? शरीरसाठी हे डाएट फायदेशीर आहे का? चला तर आजच्या लेखात जाणून घेऊया.
लिक्विड डाएट म्हणजे नेमके काय रे भाऊ?
लिक्विड डाएट हा डाएटचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही घन स्वरूपातले अन्न वर्जित करून फक्त पातळ पदार्थ जसे, फळांचे भाज्यांचे रस, ज्यूस, स्मूदी, न्यूट्रिशियस ड्रिंक्स, केन पेपर, आणि लिंबाचे मिश्रण यांचा वापर करून आपले वजन कमी केले जाते.
आजकाल अनेक सेलेब्रिटी, क्रिकेटर, कलाकार आपले वजन कमी करण्यासाठी, किंवा ते आटोक्यात ठेवण्यासाठी लिक्विड डाएटचा वापर करताना दिसत आहेत.
जेव्हा तुम्ही रोज तुमच्या आहारात घन आहार कमी करता तेव्हा तुमचा कॅलरी काऊंट कमी होतो. एखाद्या व्यक्तिचे वजन तेव्हाच कमी होते, जेव्हा तो आहारात कमी कॅलरी घेतो, आणि जास्त कॅलरी बर्न करतो.
उदाहरणार्थ, एखाद्या सामान्य व्यक्तिला जर वजन संतुलित ठेवण्यासाठी २००० कॅलरीजची आवश्यकता असेल तर लिक्विड डाएटप्रमाणे फक्त ६०० ते १००० कॅलरीजचा समावेश तुमच्या आहारात करू शकता .
याने तुमचं इनटेक कॅलरी काऊंट कमी होतो आणि तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होऊन वजन कमी होते, पण हे फक्त तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही बिना साखरेच्या पेयांचे सेवन करता.
—
- फिटनेससाठी साखर बंद करताय; तरी गोड खायचंय? मग हे ६ पदार्थ खास तुमच्यासाठीच
- प्रोटीनची कमतरता ठरू शकते फारच गंभीर; या ७ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
—
लिक्विड डाएटचे फायदे :-
लिक्विड डाएट आपल्या आतड्यांसाठी अतिशय उत्तम, आणि फायदेशीर असते. आपण घन आहार न घेता तरल पण पोषक आहाराचा समावेश आपल्या जेवणात करून एका आठवड्यामधे जवळ जवळ १०० पाउंड वजन कमी करू शकतो.
वजन कमी करण्यासोबतच लिक्विड डाएट शरीर डिटोक्स करते. ज्या मध्ये शरीरामधील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडून, किडनी, मूत्राशय, आणि लिवर यांची स्वछ्ता होते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी देखील लिक्विड डाएट फायदेशीर ठरते. फळे आणि भाज्या यांच्या मधून काढलेल्या रसाद्वारे शरीराला विटामिन्स, प्रथिने,आणि अॅंटीओक्सीडंट्सचा पुरवठा होतो. ज्या मुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते.
आहार कमी खाल्ल्याने मेटाबोलीझम वाढतो आणि वजन झपाट्याने कमी होते. जे तुम्हाला फिट ठेऊ शकते.
लिक्विड डाएट मुळे शरीराला होणारे नुकसान :-
प्रत्तेक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये फायदे आणि तोटे या दोन्हींचा समावेश होतो. एखाद्या डाएटचे पालन तोपर्यंतच ठीक आहे जोपर्यंत ते मर्यादेत पाळले जातात.
अन्यथा अतिरिक्त डाएटिंगमुळे शरीरातील मिनरल्स आणि विटामिन्स कमी होतात, आणि शारीरिक नुकसान होते, सतत थकवा जाणवत राहतो जो स्वस्थ आरोग्याचे लक्षण नाही.
लिक्विड डाएट हे तुम्ही तुमचंसुद्धा करू शकता, पण त्यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. तसेच जर तुम्हाला कोणता आजार असेल, तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल किंवा तुम्ही काही औषधं घेत असाल तर तुम्ही लिक्विड डाएटच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
शिवाय गरोदर स्त्रियांनी तर चुकूनही या डाएटचा विचार करू नये, कारण या काळात स्त्रियांना पोषक आहाराची नितांत गरज असते त्यामुळे अशा काळात स्त्रियांनी या डाएटचा अवलंब अजिबात करू नये!
आपले शरीर हे स्वत:च स्वता:ला स्वस्थ आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आपण दोन्ही प्रकारच्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन केले तर आपले स्वास्थ्य आणि आपले वजन दोन्ही आटोक्यात राहू शकते.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.