आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘ताज महाल’ हे जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. १६ व्या शतकात शहाजहाने आपली पत्नी मुमताजसाठी बांधलेला हा महाल कित्येक वर्ष ‘मुमताज महेल’ म्हणून देखील ओळखला जायचा.
ताज महाल बांधण्यासाठी तब्बल २२ वर्ष लागली होती. १६५३ मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या या वास्तूसाठी २२,००० बांधकाम कामगारांनी आपलं योगदान दिल्याचं सांगितलं जातं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘ताज महाल’ बांधून झाल्यानंतर शहाजहाने या बांधकामात योगदान देणाऱ्या सर्व कामगारांचे हात कापले होते अशी काही पुस्तकांमध्ये नोंद आहे.
आज जरी ताज महाल हा जगातील पर्यटकांचा लाडका ‘सेल्फी पॉईंट’ असला तरी ज्या भूमीवर ही वास्तू बांधण्यात आली आहे त्या जागेबद्दल बरेच वाद आहेत असा आपला इतिहास सांगतो.
आग्रा येथील ज्या जागेवर ताज महाल बांधण्यात आला आहे तिथे आधी शिव मंदिर होतं हा कित्येक शतकांपासून चर्चेत असलेला मुद्दा आहे. या मंदिराचे अवशेष हे ‘ताज महाल’च्या बंद असलेल्या २२ खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत अशीही एक याचिका अलाहाबाद न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यात काही तथ्य नसल्याचं वरकरणी काही लोक बोलू शकतात.
एक मुद्दा असाही होऊ शकतो, “त्या खोल्यांमध्ये काहीही असलं तरीही आपल्याला काय फरक पडणार आहे?” काही लोक असाही युक्तिवाद करतील की, “आपल्या वर्तमानात जर इतके प्रश्न आहेत तर मग इतिहासातील प्रश्न उकरून का काढायचे?”
हे सगळं मान्य, पण मग संबंधित प्रशासन, केंद्र सरकार ताज महाल मधील २२ खोल्यांचे दरवाजे उघडत का नाहीत? हे गूढ का कायम ठेवत आहेत? एकदाच काय तो सोक्षमोक्ष करण्यात काय हरकत आहे?
युनेस्कोने ‘वर्ल्ड हेरिटेज सेंटर’ म्हणून घोषित केलेला ताज महाल हा आपल्या देशाची शान आहे. त्याबद्दल जाणून घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे. ताज महाल मध्ये इतक्या खोल्या आहेत ही सुद्धा कित्येक लोकांसाठी नवीन माहिती असेल.
काय आहे हे प्रकरण? कशी झाली या भव्य वास्तूची निर्मिती? याबद्दलच्या विविध माहिती उपलब्ध आहेत. काय सांगतो एकेक दावा? ते जाणून घेऊयात.
१. दावा क्रमांक १:
१६३१ या वर्षी मुघल राजा शहाजहाने राजा जयसिंग कडून ही जागा घेतल्याची काही पुस्तकांमध्ये नोंद आहे. जयसिंग राजाच्या पुरखांनी या जागेवर १२१२ मध्ये शिव मंदिर बांधलं होतं.
पिढ्यान् पिढ्या या मंदिराची पूजा, देखरेख करायचे. ताज महाल बांधण्यासाठी मुघलांनी ही जागा हस्तगत केल्यानंतर त्यांनी त्या सर्व मूर्ती ताज महालमधील या २२ खोल्यांमध्ये ठेवल्याचा काही संघटनांचा दावा आहे. अलाहाबाद न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेवरील सुनावणी सध्या पुढे ढकलण्यात आली आहे.
—
- माचिसच्या ७५ हजार काड्या + १ वर्ष १९ दिवसांची मेहनत, आणि त्यातून तयार झाला…
- ताजमहाल हा भारताचा फक्त ऐतिहासिक ठेवा, सांस्कृतिक वारसा अजिबात नाही
—
२. दावा क्रमांक २:
१९७० च्या दशकात पुरुषोत्तम नागेश ओक यांनी ‘द ताज महाल इज् अ टेम्पल पॅलेस’ या नावाने एक पुस्तक लिहिलं होतं. त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे की, ताज महाल हे एक मंदिर आहे. ताज महाल हे नाव ‘तेजो महालया’ या शिव मंदिराच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.
३. दावा क्रमांक ३:
ताज महालकडे जर आपण राणी मुमताजची कबर म्हणून बघितलं तर एक लक्षात येतं की, कबरचं दर्शन घेतांना चप्पल, बूट काढून जायची प्रथा नाहीये. पण, ताज महाल बघण्यासाठी जातांना आपल्याला अनवाणी पायाने जाण्याची सक्ती का केली जाते?
‘ताज महाल’च्या मार्बलची काळजी घेणे हा जर मुद्दा असेल तर तो नंतर आला असता, पण स्थापनेपासूनच कोणालाही चप्पल, बूट शिवाय आत जाऊ द्यायचं कारण हे तेथील मंदिर होतं असं पुरुषोत्तम ओक आपल्या पुस्तकात सांगतात.
शिवाय, ताज महालच्या पश्चिमेकडील भिंतींवर असे काही संदर्भ लिहिण्यात आले आहेत जे की कबरच्या ठिकाणी कधीच लिहिलेले नसतात.
४. दावा क्रमांक ४:
ताज महाल बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या फरशीच्या जाळ्यांमध्ये १०८ खाचे असल्याचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. १०८ हा अंक हिंदू धर्मात पवित्र मानला जातो हे सर्वश्रुत आहे. ही सर्व योजना इथे आधी असलेल्या ‘आग्रेश्वर महादेव’ मंदिरासाठी करण्यात आली होती.
ताज मधील या २२ गूढ खोल्या १९३४ मध्ये उघडण्यात आल्या होत्या. पण, त्यामध्ये काय आहे लोकांना सांगण्यात आलं नाही.
सध्याच्या काळात हा वाद २०१७ पासून सुरू झाला आहे. काही राजकीय व्यक्तींनी ताज महालचा उल्लेख ‘तेजो महालया’ असा केला होता. पण, हे ऐकून ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने ताज महालमध्ये शिव मंदिर किंवा शिवलिंग असल्याच्या शक्यतांवर तत्परतेने नकार दर्शवला होता.
ताज महाल ही चार मजले असलेली वास्तू आहे. त्यापैकी केवळ २२ खोल्याच का बंद ठेवल्या असाव्यात? हा प्रश्न ‘राजेश कुलश्रेष्ठ’ या याचिकाकर्त्यांना आणि अनेक इतिहासकारांना कित्येक वर्षांपासून सध्या सतावत आहे.
२०१५ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठात दाखल केलेल्या या याचिकेला फेटाळण्यात आलं होतं. २०१७ मध्ये मूळ याचिकाकर्ते लखनऊचे ‘हरिशंकर जैन’ यांनी परत नवीन याचिका दाखल केली ज्यामध्ये संपूर्ण ताजमहालची आतून व्हिडीओ शूटिंग करण्याची परवानगी मागण्यात आली होती. पण, त्यावर अजूनही कोणताच निर्णय देण्यात आलेला नाहीये.
ताज महाल मधील या २२ खोल्यांचा हा मुद्दा येत्या काळात संसदेत गाजणार असं चित्र सध्यातरी दिसत आहे. मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत या भीतीने या देशात असे कित्येक मुद्दे कितीतरी वर्ष अधांतरी ठेवले गेले ही एक शोकांतिका आहे.
लोकशाही आहे, प्रश्न चर्चिले जावेत, निर्णय व्हावा आणि तो सर्वांना मान्य असावा. बघायला गेलं तर हे इतकं सोपं आहे. ‘सत्य समोर यावं’ इतकी सामान्य माणसाची फक्त अपेक्षा असते. ती अपेक्षा जर सध्याचं सरकार, न्यायवयवस्था पूर्ण करू शकली तर जनता त्यांचे आभार मानेल हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.