Site icon InMarathi

ओवेसींपासून ते सामान्य जनतेपर्यंत, सर्वांनाच का आहे औरंजेबाच्या कबरीचं कुतूहल

owasis im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अगदी शालेय जीवनापासून औरंगजेब कोण होता, त्याची भारतात एकेकाळी कशी दहशत होती, कसा त्याने आपल्या देशातल्या लोकांवर जुलूम केला हे आपल्याला माहीत असतं. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नातल्या सगळ्यात मोठ्या अडसरांपैकी एक असा हा मुघल शासक.

 

 

बुद्धिवान असलेली व्यक्ती शहाणी असेलच असं नाही. तुमच्याकडची बुद्धी, सत्ता तुम्ही शहाणपणाने वापरलीत तर ती तुमची खूप मोठी आयुधं ठरू शकतात. मात्र ती अविचाराने, मनमानी करून वापरल्यास स्वतःच्या आणि निरपराध अशा अनेकांच्या विध्वंसाचं कारण ठरतात. औरंगजेबाच्या बाबतीत नेमकं हेच म्हणता येईल.

 

 

आपल्या हयातीत औरंगजेबाने केलेल्या जुलुमांमुळे, आत्याचारांमुळे आपल्या मनात औरंगजेबाविषयी केवळच अनादरच नाही तर तिरस्काराची भावना असते. एमआयएमचे तेलंगणामधील आमदार असलेले अकबरुद्दीन ओवेसी यांनी नुकतंच औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतल्यामुळे राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय.

या इतक्या क्रूर शासकाच्या समाधीचं दर्शन घेण्याच्या ओवेसी यांच्या कृतीचा सगळीकडूनच मोठ्या प्रमाणावर निषेध केला जातोय. पण एकट्या ओवेसींनीच औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलेलं नाही.

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण भारतातले अनेक जण औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घ्यायला जातात. भारतीयांचं अमानुषपणे शोषण केलेल्या या शासकाच्या कबरीत असं काय खास आहे? लोकांनी ही समाधी पाहायला जाण्यामागे अन्य काही कारणं आहेत का? जाणून घेऊ.

औरंगाबाद दौऱ्यावर असताना अकबरुद्दीन ओवेसींनी खुल्दाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. बरीच नेतेमंडळी त्यांच्या या कृतीमुळे नाराज झाली असून तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. १६५८ पासून १७०७ पर्यंत जवळपास ४९ वर्षं औरंगजेबाने भारतावर राज्य केलं.

 

 

मुघलांनी कैक वर्षं भारतातवर राज्य केलं. अकबराचं भारतावर साम्राज्य असताना त्याने हिंदूच्या गरजा, हिंदू मुस्लिमांमधील ऐक्य या सगळ्या बाबींची काळजी घेतली. अकबरानंतर औरंगजेबाने भारतात मुघल साम्राज्याचा विस्तार केला मात्र शासक म्हणून अकबराने लोकांची जशी मर्जी संपादन केली होती तशी औरंगजेबाला करता आली नाही.

आपल्या सत्तेचा त्याने केवळ दुरुपयोगच केला. औरंगजेब कट्टर मुस्लिम होता. राजा म्हणूनही त्याचे वर्तन कठोर होते. त्याच्या इतक्या आंधळ्या कट्टरतेला हिंदूंमधला माणूस दिसूच शकला नाही. त्याने मंदिरं तोडून त्याजागी मशिदी बांधल्या. हिंदूचे सणसमारंभ साजरे करण्यावर पूर्णतः बंदी आणली.

हिंदूंवर खूप अत्याचार केले. सतीसारखी प्रथाही पुन्हा सुरू केली. वेश्याव्यवसाय, दारू पिणे, मांसाहार अशा समाजाला उन्नतीऐवजी अधोगतीकडे नेणाऱ्या उपक्रमांनाच त्याने आपल्या कार्यकाळात प्रोत्साहन दिलं. समाजतले जे लोक मुस्लिम नाहीत अशांवर त्याने अतिरिक्त कर लावला. अगदी काश्मिरी लोकांवर मुस्लिम धर्म स्वीकारायची जबरदस्तीही केली.

 

 

 अख्खा देश मुस्लिम बनवणं हे औरंगजेबाचं ध्येय्य होतं. भल्याबुऱ्याचा विचार न करता औरंगजेब त्यासाठी प्रयत्न करत राहिला.

जनतेच्या मनात आपली दहशत निर्माण करणाऱ्या या जुलुमी सम्राटाविरोधात मराठ्यांनी बंड पुकारायला सुरुवात केली. शीख, राजपुतांनीही त्याच्याविरोधात आवाज उठवला. अखेरीस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याच्या मदतीने औरंगजेबाला नामोहरम केलं आणि औरंगजेब नावाचं वादळ एकदाचं शमलं.

औरंगजेबाबरोबर मुघल साम्राज्याचा अस्त झाला. १६८३ मध्ये औरंगजेब औरंगाबाद शहरात आला आपल्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिला. औरंगाबादचं नाव पूर्वी ‘खडकी’ होतं. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हे शहर ‘औरंगाबाद’ या नावाने ओळखलं जाऊ लागलं. ३ मार्च १७०७ ला औरंगजेब ९० वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला.

 

 

औरंगजेबाचे अध्यात्मिक गुरू शेख झैन-उद्-दिन यांच्या खुल्दाबादमधील दर्ग्याजवळ आपला दफन विधी व्हावा अशी औरंगजेबाची इच्छा होती. इतकी वर्षं बेबंदशाही केलेल्या या राजाला आपली समाधी अगदी सध्या पद्धतीने उभारली जायला हवी होती. एका वर्षाच्या अवधीत औरंगजेबाने स्वतः टोप्या विणल्या होत्या.

आपला वेष बदलून त्या टोप्या आणि कुराणाच्या प्रती त्याने बाजारात विकल्या आणि त्यातून जमलेल्या ८ रुपयांमधूनच आपली समाधी बांधली जावी, त्यावर त्याहून अधिक खर्च केला जाऊ नये अशी औरंगजेबाची इच्छा होती. तसं त्याने त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं. त्याच्या इच्छेनुसार औजारंगजेबाचा मुलगा आझम शाह याने त्या तितक्याच पैशांमध्ये झैन-उद्-दिन दर्ग्यामध्ये दक्षिण-पूर्व कोपऱ्यात साधी समाधी उभारली. इ. स. १८५० मध्ये इंग्रजी चित्रकार विलियम कारपेंटर याने या समाधीचे चित्र काढले आहे.

समाधीला भेट देण्यामागची कारणे :

या इतक्या धर्मांध राजाला मानणाऱ्या लोकांची संख्या भारतात पुष्कळ आहे. त्याच्या कबरीचं दर्शन घ्यायला अनेक भारतीय जातात. औरंगजेबाच्या हयातीतच त्याला ‘जिंदा पीर’ असं म्हटलं जायचं. प्रत्यक्ष जीवनात औरंगजेबाचं राहणीमान अगदी साधं होतं. इस्लाम धर्माचं तो अगदी कडवटपणे आणि आक्रमकपणे पालन करत असे.

औरंगजेबासारख्या इतक्या निष्ठूर शासकाला छानछोकीचा अजिबात शौक नव्हता. तो एखाद्या वैराग्यासारखा जगायचा. इस्लाममध्ये ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या होत्या त्यांच्यावर त्याने बंदी आणली होती. शरियत कायद्याचा अंमल बसवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. दुर्दैवाने, इतिहासाची पुरेशी माहिती नसलेले लोक त्याला एखाद्या संताच्या जागी मानतात.

 

अझानचं पूर्वीचं स्वरूप कसं होतं? लाऊडस्पीकरचा वापर कोणी सुरु केला… जाणून घ्या

‘वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि हिंदू वास्तव’

लाकडी चौथऱ्यावर ठेवलेला एक साधासा दगड असं त्याच्या कबरीचं स्वरूप आहे. १७६० साली निझामाच्या पैशातून या कबरीच्या चहूबाजूने भिंत आणि आत जाण्यासाठी दरवाजा बांधण्यात आला. पुढे असलेला आग्र्याचा ताजमहाल, हुमायून, मोगल सम्राट, जहांगीर यांच्या भव्य कबरींपुढे औरंगजेबाची साधी कबर लक्ष वेधून घेते.

साधेपणा हा निश्चितच गुण आहे. मात्र कलंकित अशा औरंगजेबाला डोळ्यासमोर न ठेवता अनेक मोठ्या, समाजहिताची कामं केलेल्या व्यक्तींचा त्यांच्या साधेपणासाठी आपल्याला नक्कीच आदर्श ठेवता येईल. आपल्याला असलेल्या अर्धवट माहितीच्या आधारावर आपण अनेकांविषयी मतं बनवून मोकळे होतोच. मात्र औरंगजेबासारख्या माणूसकीलाच काळिमा फासणाऱ्या लोकांबद्दल प्रत्येकाच्या मनात चीडच असायला हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version