निखिल वागळे (आणि इतर!) च्या ब्राह्मण द्वेषाची तिरडी बांधण्यासाठी…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : सौरभ गणपत्ये
===
श्वानाचं शेपूट जसं वाकड्या वळणावर जातं तसं निखिल वागळे ब्राह्मणांवर गरळ ओकून गेले. आतापर्यंत या विषयावर बरंच काही लिहून बोलून झालं असल्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या पुढे जाण्याची गरज समस्त ब्राह्मण वर्गाला निर्माण झाली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.
शिवाय निखिल वागळेंच्या बाबतीत ‘ब्राह्मण आपल्याला काही करणार नाहीत म्हणून त्यांना ठोका’ असा अंदाज येऊन चालणार नाही कारण वागळेंना मोठ्या शारीरिक हल्ल्याला तोंड द्यावं लागलं आहे.
सर्वप्रथम निखिल वागळे प्रकरणावरून माझ्या मनात उमटलेले तरंग. ज्या पद्धतीने निखिल वागळे ब्राह्मणांवर चढतात (हो ‘चढतात’ हाच शब्द) त्यावरून माझं असं स्पष्ट मत आहे की वागळे यांना कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, प्रकाश बाळ, हेमंत देसाई, भालचंद्र कांगो, अजित अभ्यंकर किंवा अगदी रत्नाकर महाजन ही त्यांच्या आसपास असणारी आणि कायम त्यांच्या कार्यक्रमांना उचलून धरणारी मंडळी सुद्धा ब्राह्मणी कावा करणारी किंवा ब्राह्मणशाही राबवायला असुसेली वाटत असणार.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
वर उल्लेखिलेली मंडळी नास्तिक आहेत आणि तसे राहण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मग त्यांची मते कुणाला पटोत व न पटोत. पण वागळे यांना ही मंडळी अशीच जात्यंध वाटत असणार. आणि हा अंदाज खरा वाटावा अशी परिस्थिती आहे.
अशी वाकड्या वळणावर जायची वागळेंची ही पहिली वेगळं नाही. वागळेंच ‘जोशी ओ जोशी’ प्रकरण आपल्याला आठवत असेलच.
आपल्याला रात्री कोणी खोडसाळ फोन केला आणि जर तो करणारा इस्लाम धर्माचा असेल, आणि जर आपण त्याला “तुम्ही मुस्लिम लोक असलेच, भारत स्वतंत्र झालाय, तुमची बादशाही संपली हे लक्षात असू द्या” असले अकलेचे तारे तोडले तर एका परीने “तुम्ही मुस्लिम असलेच” या वाक्यात मी परमवीर चक्रधारी अब्दुल हमीद, अब्दुल कलाम, महम्मद रफी, नौशाद, मजरूह सुलतानपुरी, झाकीर हुसेन, झहीर खान, मन्सूर आलीखान पतौडी, जावेद अख्तर, अमजद अली खान, बिस्मिल्लाह खान यां माझ्यासाठी ग्रेट असलेल्या लोकांना वाईटच ठरवत असतो.
माझ्या या असल्या घाणेरड्या पावित्र्यामुळे मला सगळ्या मुसलमानांचा राग नसून काही मुसलमानांचा आहे असं म्हणायचा अधिकार अजिबात राहत नाही.
तद्वतच उद्या निखिल वागळे यांनी मला ब्राह्मणाचा नाही तर ब्राह्मण्याचा राग आहे अशी सारवासारव केली तर तो भंपकपणा ठरावा. अर्थात ते तो करणार नाहीत. माझी जन्माने ब्राह्मण असलेल्या विचारवंतांना नम्र विनंती आहे की निखिल वागळे यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा.
—
- केशव उपाध्येंनी दिलेल्या शुभेच्छांचा निखिल वागळेंकडून उर्मटपणे अव्हेर…!
- निखिल वागळें “…काशिनाथ…” चित्रपटावर केलेल्या टीकेमुळे झाले होते ट्रोल
—
वागळे यांनी आपला कार्यक्रम जन्माने ब्राह्मण नसलेल्या विचारवंतांना बोलावून करावा. हे साध्य झालं तर परिवर्तनाच्या दिशेने ते एक क्रांतिकारक पाऊल असेल, मराठी मीडियात इन्टलेक्चूअल लोकशाही येईल. शिवाय वागळे आपल्या ब्राह्मण द्वेषाशी प्रामाणिकही राहू शकतील.
राहता राहिला प्रश्न ब्राह्मण समाजाचा. या समाजात आता मांस मटण अजिबात वर्ज्य समजलं जात नाही. सोवळ्याओवळ्यातून हा समाज बाहेर केंव्हाच पडला. ब्राह्मण मुलीही आता सर्रास ब्राह्मणेतर मुलांशी लग्न करतात. हा समाज शहरी भागात अधिकाधिक एकवटला आहे. त्यामुळे यांची मुलंही आनंदाने इंग्रजी शाळांमध्ये पाठविली जातात.
त्याचं मित्रमंडळही आता अमराठी असतं. या पिढीला जातीपातीत अडकून पडायचं नाही. आणि ‘इकडे आरक्षण असल्याने आमचं नुकसान होतं आहे’ या भावनेतून परदेशात जाऊन परत न येणारे तर अनेक आहेत.
मग तरीही ब्राह्मण समाजाचा तिरस्कार आणि ब्राह्मणांनी जाती टाकल्या तर बाकी लोक तेच करतील हा भ्रम पोसला जातो.
उघड ब्राह्मणद्वेष प्रामुख्याने दोन बाजूंनी होतोय. एक जण पुस्तक लिहून बोंबलतोय की ब्राह्मण नपुंसक असतात. त्यांना काहीच करता येत नाही. दुसऱ्या बाजूला ब्राह्मण खुनी असतात, दहशतवादी असतात असा विचार पुढे येतोय.
दहशतवादी नपुंसक कसा असेल, आणि नपुंसक दहशतवादीकसा असेल? म्हणजे यात काहीच लॉजिक नाही हे आपल्या लक्षात येईल.
ब्राह्मण समाज म्हणे कर्मकांड असं आजही अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात ब्राह्मण समाजाचं यात या क्षणी काय योगदान आहे? ब्राह्मण समाजाने पौरोहित्याची कामं साईड बिझनेस म्हणून करावीत असा मतप्रवाह वाढतो आहे आणि याची सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात ब्राह्मणेतर समाज आता धार्मिक कार्यात पुरोहित म्हणून येत आहे.
घरात आई वडील किंवा घरातला हाताशी आलेला लग्नं न झालेला मुलगा मेला की होणारे संस्कार सोपस्कार मोठे असतात.
मेलेल्याला सरळ तिरडीवर घालायचा, मसणात न्यायाचा. चुपचाप कुठलाही विधी न करता त्याला अग्नी द्यायचा किंवा त्या इलेक्ट्रिक चेंबरमध्ये लोटून द्यायचा एवढा कोडगेपणा अजून समाजामध्ये आलेला नाही. त्यासाठी ब्राह्मणच नव्हे तर इतर जातींमधील समाजही पुढे येत आहे. त्यामुळे आतापौरिहित्यात ब्राह्मणांची मक्तेदारी नाही राहिलेली.
दहावा दिवस, त्यादिवशी कावळा पिंड, बारावा दिवस, या गोष्टींना ग्रामीण भागात खूप मान आहे. आत्मा, मुक्ती, पितर या गोष्टी आजही लोकांना मानसिक त्रास देतात.
जसा जन्माला आला तसा मेला तो. या कल्पनेला आजही थारा नाहीये. शिवाय विज्ञानवादी मानसिकता असलेल्या घरात निगेटिव्ह भुणभुण करणाऱ्या लोकांना लोकांना शांत बसवणं आहेच. या अशुभ गोष्टी असतील वा लग्नासारखं शुभकार्य, ब्राह्मणेतर समाजाचा सहभाग अजून वाढायला हवा.
एरवी साडेतीन टक्के समाजाची एवढी भीती वागळेंना काय वाटते? हा न सुटलेला प्रश्न आहे.
शिवाय या लोकांना ब्राह्मण म्हटलं की साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, विनोबा भावे, सेनापती बापट, गोपाळ कृष्ण गोखले, आचार्य अत्रे, नरहर कुरुंदकर किंवा अलीकडचे बाबा आमटे, नरेंद्र दाभोलकर अथवा इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत किंवा मृणाल गोरे हे आठवतच नाहीत. यांना ब्राह्मण म्हटलं की थेट नथुराम गोडसे आठवतो.
माझी ब्राह्मण समुदायाला नम्र विनंती आहे. अरे ला कारे करणं सोडू नका. पण समग्र टीका समजून घ्या. उघड ब्राह्मणद्वेष प्रामुख्याने दोन बाजूंनी होतोय. एक जण पुस्तक लिहून बोंबलतोय की ब्राह्मण नपुंसक असतात. त्यांना काहीच करता येत नाही. दुसऱ्या बाजूला ब्राह्मण खुनी असतात, दहशतवादी असतात असा विचार पुढे येतोय.
दहशतवादी नपुंसक कसा असेल, आणि नपुंसक दहशतवादी कसा असेल? म्हणजे यात काहीच लॉजिक नाही हे आपल्या लक्षात येईल.
सुंदर मुलीवर जळतात, प्रसिद्ध अभिनेत्यावर किंवा खेळाडूवर जळतात, नेत्यावर तर बारा बारा वर्ष जळतात, प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जळफळाटाला तोंड द्यावं लागतं. काहींचा कोळसा होतो, काही कोकाटत बसतात.
यांना प्रत्युत्तर द्यायचं पण लोक जळतात म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. एखादी व्यक्ती, जमात वा विचारसरणी द्वेष करून संपत नसते. म्हणूनच आपण कोणाचाही द्वेष करणं चुकीचंच आहे.
द्वेष करून संपवायचा प्रयत्न केला की ती नव्याने उफाळून येते आणि आपले झगमगते उन्मेष घडवत राहते. उदाहरणे अनेक आहेत. वानगीदाखल थोडीफार. महात्मा गांधी, ज्यू समाज आणि इस्रायल, भारतातलं गांधी घराणं आणि ताजं उदाहरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.