कुतूब मिनारच्या जागी खरंच हिंदू मंदिर होतं का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
धार्मिक स्थळांवरून भोंगे उतरवण्याचा वाद जरा कुठे थंड होतोय तोच एका नव्या वादाला पेव फुटलं आहे. ‘युनायटेड हिंदू फ्रंट’ या हिंदुत्त्ववादी संघटनेने ‘कुतुब मिनार’ हे खरंतर हिंदू मंदिर असून या मंदिराचं खरं नाव ‘विष्णू स्तंभ’ असल्याचा दावा केला आहे. ‘कुतुब मिनार’चं नाव बदलून ‘विष्णू स्तंभ’ केलं जावं आणि यापूर्वी तोडलेल्या २७ मंदिरांची पुनर्बांधणी केली जाऊन हिंदूना तिथे पूजा, बाकीचे विधी करता यावेत अशा मागण्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.
‘युनायटेड हिंदू फ्रंट’चे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि दिल्ली शिवसेनेचे माजी प्रमुख असलेले जयभगवान गोयल यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी ‘कुतुब मिनार’ येथे हनुमान चालीसादेखील वाचणार होते. पण तत्पूर्वी गोयल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. हा वाद चांगलाच पेट घेण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
खरोखरच हिंदू मंदिर पाडून कुतुब मिनारची स्थापना करण्यात आली होती का याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘कुतुब मिनार’च्या जागी मुळात हिंदू मंदिरच होतं याचे दाखले देणारे काही तपशील पाहू.
भारतातील सगळ्यात उंच असलेल्या ‘कुतुब मिनार’चं बांधकाम १२व्या आणि १३व्या शतकात केलं गेलं होतं. १२९३ साली मुस्लिम शासक कुतुबुद्दीन ऐबक ने या बांधकामाची सुरुवात केली होती. कुतुबुद्दीनने ‘कुतुब मिनार’चा पाया घातला आणि त्याचा पहिला मजला उभारला. त्यानंतर कुतुबुद्दीनचा उत्तराधिकारी आणि मुलगा असलेल्या इल्तुमिशने कुतुब मिनारचे आणखी तीन माजले बांधले.
१३६८ साली फिरोज शाह तुघलक याने कुतुब मिनारचा पाचवा आणि शेवटचा मजला बांधला. असं जरी असलं तरी ‘कुतुब मिनार’ ची निर्मिती करण्यापूर्वी इथे एक हिंदू मंदिर अस्तित्त्वात होतं. ते पाडून ‘कुतुब मिनार’ उभारला गेला याची साक्ष पटवून देणारे काही दाखले समोर आल्याचा दावा केला जात आहे.
या मंदिराची नावं ‘विष्णू स्तंभ’, ‘ध्रुव स्तंभ’ आणि ‘विष्णू ध्वज’ अशी होती. याच्या मनोऱ्याकडे वरून पाहीलं तर तो आपल्याला २४ पाकळ्यांच्या पूर्ण उमललेल्या कमळासारखा दिसतो. यातली प्रत्येक पाकळी २४ तासांच्या घड्याळाच्या एकेका तासाचं प्रतिनिधित्त्व करते. मनोऱ्याच्या प्रत्येक मजल्याच्या वरपासून ते तळापर्यंत उभ्या रेषा काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे मनोऱ्याच्या वरून पाहीलं तर आपल्याला त्याचा आकार एखाद्या कमळासारखा दिसतो.
हिंदू संस्कृतीमध्येच २४ पाकळ्यांच्या कमळाच्या फुलाची संकल्पना आहे. जिथे कमळं उमलतच नाहीत अशा भागांतून आलेल्या मुसलमान राजांना कमळाचं वैशिष्ट्य समजूच शकत नाही.
कुतुब मिनारातून हिंदू प्रतिमा असलेले दगड काढून टाकून ते आता संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं त्यावरून स्पष्टपणे लक्षात येतं.
कुतुब मिनारच्या आवारामध्ये आणि बऱ्याच खांबांवर संस्कृत शिलालेखांचे काही अवशेष आजही आढळून येतात. आजूबाजूला बरीच मंदिरं असली तरी पुरेशी जागा बाकी उरली असेल आणि कुतुबुद्दीनने तिथे येऊन कुतुब मिनार उभारायला सुरुवात केली असेल असा जर आपला समज झाला असेल तर तो केवळ भ्रम ठरेल. कारण, या वास्तुशिल्पाची एकूण रचना, त्याची शैली पाहूनच ती हिंदू असल्याचं लक्षात येतं. मशिदीच्या मिनाराचा पृष्ठभाग सपाट असतो. खालच्या लोकांना उंचावरून अझान देता यावा या हेतूने अशी रचना केली गेली असेल असं म्हणणाऱ्यांच्या मुद्द्यात त्यामुळे तितकंसं तथ्य वाटत नाही.
इस्लामच्या धर्मशास्त्रानुसार मनोऱ्याचं प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असायला हवं. पण याच्या मनोऱ्याचं प्रवेशद्वार मात्र उत्तर दिशेला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी कमळं आहेत ज्यावरूनही ही हिंदूच वास्तू असल्याचं लक्षात येतं. दगडी कमळं हे मध्ययुगीन हिंदू स्थापत्याचं एक महत्त्वपूर्ण अंग होतं. मुस्लिमांनी केलेल्या बांधकामांमध्ये अशा प्रकारच्या फुलांचा वापर केला जात नाही.
मनोऱ्याला असलेल्या विटांचा लाल रंगही हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जातो. सय्यद अहमद खान या कट्टर मुस्मिम विद्वानाने ही हिंदू वास्तू असल्याचं मान्य केलं होतं. तिथल्या जवळच्या न गंजलेल्या खांबांवर ब्राह्मी लिपीतील संस्कृत शिलालेख दिसतात. त्यावरून ‘विष्णुपाद गिरी’ नावाच्या टेकडीवर विष्णूची उच्च माणकं उभारली गेली होती हे लक्षात येतं.
महम्मद गोरी आणि कुतुबुद्दीनने तिथल्या मुख्य मंदिरावर पहुडलेली विष्णूची प्रतिमा उध्वस्त केली होती. या वास्तूच्या सातव्या मजल्यावर खरोखरच हातात वेद पकडलेल्या चतुर्भुज ब्रह्माचा पुतळा होता. ब्रह्माच्या वर सोन्याच्या घंटीचे आकृतिबंध असलेलं पांढरं संगमरवरी छत होतं. ब्रह्माचा तिरस्कार करणाऱ्या प्रस्थापित मुस्लिमांनी हे सगळं आणि शिवाय खाली पहुडलेली विष्णूची प्रतिमाही उद्ध्वस्त केली.
—
अवघ्या ७२ तासात तब्बल ४००० निष्पाप बळी घेणारी भारतातील दंगल…
महाराष्ट्रातील या गावात भोंगे चार वर्षांपूर्वीच उतरवले गेलेत…
—
विष्णू मंदिराच्या संरक्षणार्थ ‘गरुड ध्वज’ नावाचा लोखंडी खांब होता. एका बाजूला २७ नक्षत्रांच्या मंदिरांचा लंबवर्तुळाकार झाला होता. मोठमोठ्या लाल दगडाच्या या सुशोभित मार्गातून आत केलं की ही जी पवित्र वास्तू होती तिला ‘नक्षत्रालय’ असं म्हटलं जायचं. त्याच्या दरवाजाला ‘आलय-द्वार’ असं म्हटलं जायचं. या पारंपरिक हिंदू मंदिराच्या भव्य दरवाजाचं नाव बदलून ‘सुलतान अल्लाउद्दीन’ असं नाव दिलं गेलं. अल्लाउद्दीनने मात्र असा कुठलाही दावा केलेला नाही. कुठूनही कुठे न जाणारा हिंदूंच्या भगव्या रंगाचा शोभिवंत दरवाजा अल्लाउद्दीन का उभारेल असा प्रश्न पडतो.
अझान देणाऱ्या मौझ्झिनांचा हा मनोरा असल्याचं काही मुस्लिमांचं म्हणणं होतं. पण ३६५ पायऱ्यांचा हा मनोरा दिवसातून ५ वेळा चढून उतरणं केवळ अशक्य आहे. बाजूलाच असलेल्या ‘कुवत-उल-इस्लाम’ चं प्रवेशद्वार गुजराती देवळांच्या शोभिवंत प्रवेशद्वारांपेक्षा काही वेगळं नाही. मंदिरांचा परीघ बरोबर २४ पट, कंस आणि त्रिकोणांचा आहे. यावरून त्यावेळी त्या आवारात २४ या आकड्याला सामाजिकदृष्ट्या महत्त्व होतं हे आपल्या लक्षात येतं.
उजेड आत येऊ देण्यासाठी इथे २७ छिद्रं आहेत. आधी नमूद केलेल्या २७ नक्षत्रांच्या मंदिरांशी त्यांचा सहसंबंध असू शकेल ही शक्यता नाकारता येत नाही. आग्र्याच्या किल्ल्यात ज्याप्रकारच्या लोखंडी पट्ट्या वापरल्या गेल्या आहेत तशाच प्रकारच्या लोखंडी पट्ट्या या मिनाराच्या बांधकामातही वापरल्या गेल्या आहेत. भल्यामोठ्या इमारतींचे दगड एकत्रित बांधून ठेवण्यासाठीचा हा हिंदूंचाच मार्ग आहे. त्यावरूनही हे मुळात हिंदू मंदिर असेल असा अंदाज बांधता येऊ शकतो.
अर्थात हे केवळ काही तज्ञांनी केलेले तर्कवितर्क आहेत जे सध्या सातत्याने समोर येत आहेत. याचवेळी यापुर्वी केलेल्या संशोधनाचा एक निष्कर्ष असेही सांगतो, की कुतुब मिनारच्या जागी हिंदू मंदिर सापडल्याच्या खुणा नाहीत.
धार्मिक द्वेषापोटी आणखी अशा किती मूळ वास्तू पाडून नव्या वास्तू उभारल्या गेल्या असतील ते माहीत नाही.
सध्याचा कुतुब मिनारचं नाव बदलण्याचा वाद नेमका किती काळ चालेल, हे नाव बदललं जाईल की नाही हे आपल्याला कळेलच. पण या अशा निमित्तांमुळे समोर येणारी नवी माहिती आपल्याला पूर्वी घडलेल्या अनेक घटनांविषयी किती अर्धवट माहिती असते याचीच जाणीव वेळोवेळी करून देत आलेली आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.