आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
क्रिकेट हा खेळ ‘जंटलमन्स गेम’ या नावाने ओळखला जातो. ‘हल्लीच्या काळात या खेळात किती जंटलमन उरलेत?’ हा प्रश्न जरी अनेक क्रिकेट चाहत्यांना पडत असला, तरी एक काळ असा होता ज्याकाळी खरोखरच हा खेळ खऱ्या अर्थाने ही ओळख जपत असे.
भारतातील अशाच जंटलमनपैकी एक म्हणजे राहुल द्रविड. एक खेळाडू म्हणून, एक कर्णधार म्हणून तो जितका गुणी आणि शांत स्वभावाचा होता, तितकाच उत्तम तो मैदानाबाहेर आणि एक माणूस म्हणूनही होता.
त्याचं व्यक्तिमत्व सद्गृहस्थ म्हणजेच जंटलमन ही ओळख सांगण्यासाठी योग्य होतं. कुठलेही वादविवाद, उलटसुलट चर्चा यात राहुल द्रविडचं नाव कधी ऐकायला मिळालं नाही.
शाहरुख खानचा फेमस डायलॉग, ‘राहुल, नाम तो सुना ही होगा’ फक्त आणि फक्त द्रविडच्या कर्तृत्वाला शोभून दिसेल असाच होता, असं म्हणायला हवं.
याच राहुल द्रविडचं नाव एका मोठ्या चर्चेच्या विषयात मात्र सापडलं होतं. राहुल आणि रवीना ही नावं अगदी सर्रासपणे एकत्र चर्चेत असायची. आज त्याच विषयी आम्ही तुम्हाला काही गमतीजमती सांगणार आहोत.
अक्षय आणि रवीनाचा रोमान्स
मोहरा, खिलाडीयों के खिलाडी, अशा सिनेमांमधून अक्षय आणि रवीनाचा रोमान्स पाहायला मिळाला. या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स जितका चर्चेत होता, तितकीच चर्चा त्यांच्या ऑफस्क्रीन रोमान्सची सुद्धा झाली.
चित्रपट निर्माता अनिल थडानी याच्याशी रवीनाचं लग्न होण्याआधी अक्षय आणि रवीनाची जोडी फारच चर्चेत असायची. त्यांनी गुप्तपणे साखरपुडाही उरकल्याचं बोललं जात असे. मात्र, त्यानंतर त्यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चाही रंगल्या.
रवीनाने अक्षयला रेखा आणि सुस्मिता सेन यांच्यासह नकोशा स्थितीत रंगेहाथ पकडल्याचं सुद्धा रवीनाने अनेकदा सांगितलं असल्याचं म्हटलं जातं.
…आणि जंटलमन राहुल द्रविड
अक्षयशी बेकअप झाल्यानंतर सुद्धा रवीना मात्र बराचकाळ चर्चेत होती. अनेक बड्या नावांसह तिचं नाव जोडलं गेलं. या यादीत बॉलिवूडची मंडळी मोठ्या प्रमाणावर होती हे वेगळं सांगायला नको.
याच यादीत भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि अनेकांचा लाडका क्रिकेटपटू राहुल द्रविड याचं नावंही होतं. ही गोष्ट अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली.
२००२ साली एकीकडे सचिन-सेहवाग या एस फॅक्टरची क्रिकेट जगतात चर्चा असताना, राहुल-रवीना या आर फॅक्टरच्या अफेयरच्या सुद्धा रंजक चर्चा रंगल्या होत्या. जेवणासोबतच नाही, तर प्रत्येकवेळी तोंडी लावणं म्हणून हा विषय चघळला जात होता.
चर्चांना उधाण पण…
अविवाहित असलेल्या राहुल द्रविडसह रवीनाचं नाव जोडलं तर गेलं. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा अगदी प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा रंगल्या. मात्र, या नात्यामागचं नेमकं सत्य वेगळंच होतं. हे सत्य कालांतराने रवीनाने स्वतःच उघड केलं.
द्रविड आणि तिचं नातं ही निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट करतांना, रवीनाने नेमकं काय काय सांगितलं आहे, हे जाणून घेणं मजेशीर ठरेल.
या नात्यामागे एक असं सत्य आहे, जे जाणून घेतल्यावर तुमची हसून हसून पुरेवाट होईल. ‘रवीना आणि द्रविड एकमेकांना कधी भेटलेच नव्हते’ हे सत्य असल्याचं नंतर चर्चेत आलं. आता अशा दोन व्यक्तींचं अफेयर सुरु असल्याचं म्हटलं जात होतं, जे एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. तेसुद्धा सोशल मीडियाचा प्रभाव नसलेल्या काळात बरं का मंडळी!
एकीकडे ते दोघं लग्न करणार असल्याचं बोललं जात असताना, द्रविडशी ओळखच नसल्याचं रवीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अर्थात, ते दोघे कधीच भेटले नाहीत, हे गोष्ट मात्र तिने मान्य केली नाही.
मित्रमैत्रिणींच्या रामरगाड्यात वेगवेगळ्या पार्टीज आणि समारंभ यांना उपस्थित राहणारी रवीना अशाच काही समारंभांमध्ये द्रविडला भेटली असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. ही भेट अगदीच औपचारिक असून, आमच्यात कधीही मैत्री सुद्धा नव्हती हे मात्र तिने वेळोवेळी स्पष्ट केलं होतं.
या चर्चांमागचं खरं कारण…
—
- सचिनच्या झंझावातामुळे प्रत्येकवेळी झाकोळला गेलेला क्रिकेटमधला खरा ‘जंटलमन’!
- जेव्हा लक्ष्मणच्या ‘बाथरूम सिंगिंग’मुळे अख्ख्या भारतीय संघाला घाम फुटला होता…
—
याविषयी बोलताना रवीनाने असंही म्हटलं होतं, की हे सगळं नेमकं कधी आणि कसं सुरु झालं ते तिला ठाऊक नाही. ती कुणालाही डेट करत नव्हती आणि द्रविडही लग्नाच्या वयाचा झालेला, चांगली प्रसिद्धी मिळवलेला तरुण होता; म्हणून या सगळ्या अफवांची सुरुवात झाली असावी, असा अंदाजही तिने अनेकदा व्यक्त केला आहे.
केवळ द्रविडच नाही, तर अशा इतरही काहींशी तिचं नाव जोडलं गेल्याचं तिने वेळोवेळी म्हटलं आहे. एका संगीतकाराने तिला फोन करून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितलं होतं.
या चर्चांविषयी तिची माफी सुद्धा मागितली होती. हा प्रकार ज्या संगीतकाराच्या बाबतीत घडला, त्या वक्तीची आणि रवीनाची सुद्धा वैयक्तिक ओळख अजिबात नव्हती.
हे असंच काहीसं कारण द्रविड आणि रवीनाच्या नात्याच्या चर्चांविषयी सुद्धा घडलं असावं, असंच मत त्यानंतर तिने व्यक्त केलं आहे.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
—
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.