' विद्यार्थी नेता ते खासदार; यूपीच्या या बाहुबली नेत्याला जेलमध्ये असताना खुद्द पंतप्रधान पत्र लिहायचे – InMarathi

विद्यार्थी नेता ते खासदार; यूपीच्या या बाहुबली नेत्याला जेलमध्ये असताना खुद्द पंतप्रधान पत्र लिहायचे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जे जसे महाराष्ट्राचे फायरब्रॅंड नेते होते तशीच ओळख आज राज ठाकरेंची आहे. सध्या गाजत असलेले भोंगा-हनुमान चालीसा प्रकरण असो किंवा आधीही झालेले मनसेची अनेक आंदोलनं असो राज ठाकरेंचा निर्भीडपणा आपल्याला परिचित आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कधीही कोणालाही न घाबरता हजारोंच्या सभेत कोणालाही आव्हान द्यायचे ही राज यांची शैली. गेल्या काळात औरंगाबादमध्ये वातावरण अनुकूल नसताना आणि काही संघटनांकडून सभा उधळवून लावण्याची धमकी असतानाही धुमधडाक्यात सभा घेऊन वातावरण तापावणारे राज ठाकरेचं होते.

 

raj thackrey 3 IM

 

“मशिदींवरचे भोंगे खाली उतरवा नाहीतर..”असे ठणकावून सांगणारेही राज ठाकरेचं होते. पण मंडळी इतरांना धमकी देणाऱ्या आणि अल्टिमेटम देणाऱ्या या ‘राज ठाकरेंनाच एका नेत्याने धमकावले आहे’.कोण आहे हा नेता? आणि राज ठाकरेंना नेमकी काय दिलीये धमकी? चला पाहुयात…

राज ठाकरे चूहा है…!

राज ठाकरेंनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आणि राजकारण तापलं. विविध पक्षांतून आणि नेत्यांकडून वेगवेगळया प्रतिक्रिया येत असतानाच यूपीमधील एका भाजप खासदाराने राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नसल्याची धमकी दिलीये. त्यांचे नाव आहे बृजभूषण सिंह.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झालेत. राज ठाकरेंनी आधी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली व या मागणीवर ते ठाम आहे.

 

bruj im 1

 

यूपीमधील राजकारण चांगलच पेटताना सध्या दिसून येतंय.नुकताच तिथे राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यामध्ये ‘राज ठाकरे माफी मांगो, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा देण्यात आल्या. “राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या भूमिकेविरोधी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांच्यावर टीका करतोय”, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय.

बृजभूषण सिंह नेमके आहेत कोण?

सन १९७९ मध्ये बृजभूषण शरण सिंह यांनी प्रथमच विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मतांनी विजय मिळवला. तेव्हापासून ते पूर्वांचलच्या जिल्ह्यांमध्ये युवा नेते म्हणून प्रसिद्ध होऊ लागले.

विद्यार्थी राजकारणातून त्यांनी १९८७ मध्ये पहिल्यांदा ऊस समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आणि विजयी झाले. १९८८ मध्ये ते भाजपच्या संपर्कात आले आणि त्यांनी स्वतःची हिंदूत्ववादी नेत्याची प्रतिमा बनवली.त्याचवेळी दुसरीकडे रामजन्मभूमी आंदोलनालाही वेग आला होता.

 

bruj im

भाजपाच्या बाजूने असो वा विरोधात, राजकारणातील चाणक्याची ही भविष्यवाणी बघायलाच हवी!

राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्हे कशी मिळतात?

अयोध्येचे महंत रामचंद्र परमहंस, नृत्य गोपाल दास, हनुमान गढीचे स्वामी धरम दास यांच्यासह सर्व संतांचे आशीर्वाद घेऊन ते मंदिर चळवळीत सक्रिय झाले.

इथे त्यांना लालकृष्ण अडवाणींसारख्या दिग्गज नेत्यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. १९९३ साली याच अयोध्या राम मंदिर प्रकरणात वादग्रस्त वास्तू पाडण्यात आलेल्या आरोपींमध्ये खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यासह ४० आरोपी होते.

पुढे वैयक्तिक नाराजीमुळे भाजप सोडून त्यांनी सपामध्ये प्रवेश केला आणि कैसरगंज मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.मात्र कालांतराने मतभेदांमुळे ते पुन्हा भाजपमध्ये आले.

५ जूनला बृजभूषण सिंह vs राज ठाकरे ?

परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र आता त्यांच्या मागील सर्व वक्तव्यांचा निषेध म्हणून बृजभूषण सिंहांनी अयोध्येतील राज ठाकरेंच्या संभाव्य दौऱ्याला विरोध केलाय.

उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या ठाकरेंनी माफी मागावी’ अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे राज ठाकरेंचा दौरा वादात अडकण्याची चिन्ह दिसतायेत.

 

ayodhya final im

 

एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी एक बैठक पार पडली.त्या बैठकीत खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.

ठाकरेंनी माफी मागितली नाही तर अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलीये. त्यामुळे आता राज ठाकरेंना त्यांनी आधी केलेली परप्रांतीयविरोधी वक्तव्य भोवणार अशी चिन्हे दिसतायेत आणि येत्या ५ जूनला काय होणार याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?