आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ असलेले एलॉन मस्क पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘ट्विटर’ कंपनी विकत घेतली. एका शेअरमागे ५४.२० डॉलर दराने आपल्याला कंपनी विकत घ्यायची असल्याचा प्रस्ताव मस्क यांनी मांडला होता.
ट्विटरने याला संमती दिली आणि ट्विटर एलॉन मस्क यांच्या मालकीचं होणार हे निश्चित झालं. ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यात ४४ अब्ज डॉलर्सचा करार झाला. आपण ही कंपनी विकत घेतली असल्याची माहिती मस्क यांनी सोशल मीडियावरून दिली. २०१७ साली मस्क यांनीं सहजच केलेलं ट्विट यानिमित्ताने चर्चेत आलं होतं.
तेव्हापासूनच ट्विटर विकत घ्यायचा एलॉन मस्क यांचा मानस होता की काय असा अंदाज बांधला गेला. एलॉन मस्क यांची ट्विट्स नेहमीच चर्चेत असतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटरने कायमस्वरूपी घाललेली बंदी आपण मागे घेणार असल्याचं वक्तव्य एलॉन मस्क यांनी नुकतंच केलंय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर कायमस्वरूपी बंदी येण्यापूर्वी ते कायमच वादग्रस्त ट्विट्स करायचे. नेमक्या कुठल्या कारणांमुळे ट्विटरने त्यांच्या अकाउंटवर कायमस्वरूपी बंदी घातली होती? आणि मस्क यांचं याविषयी काय म्हणणं आहे? जाणून घेऊ.
ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर कायमस्वरूपी बंदी आणण्यामागची कारणं :
२०२१ साली जानेवारीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर कायमस्वरूपी बंदी आणली गेली. प्रक्षोभक ट्विट्स करू नका अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ट्विटरने दिल्यानंतरही ट्रम्प यांनी प्रक्षोभक ट्विट्स करणं सुरूच ठेवलं.
ट्रम्प यांनी केलेल्या दोन ट्विट्सनंतर काहीच मिनिटांत त्यांच्या ट्विटर अकाउंटवर बंदी आणली गेली. एका ट्विटमध्ये त्यांनी हिंसा करणाऱ्या आपल्या समर्थकांना क्रांतिकारी म्हटलं होतं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये २० जानेवारी २०२१ ला बायडेन यांच्या शपथ विधीला आपण जाणार नसल्याचं म्हटलं होतं.
ट्रम्प यांच्या ट्विट्समुळे हिंसेचा उद्रेक होईल या भीतीपोटी ट्विटरने त्यांच्या अकाउंटवर कायमस्वरूपी बंदी आणली. लोकांना हे ट्विट्स उकसवू शकतात. हे ट्विट्स ट्विटरच्या ‘सिव्हिक इंटिग्रिटी पॉलिसी’चं उल्लंघन करणारे असल्याचं ट्विटरने म्हटलं होतं.
—
- इलॉन मस्क म्हणतोय त्याप्रमाणे खरंच कोका कोलामध्ये कोकेन होतं का?
- अमेरिकन राष्ट्रपतींच्या विमानाची ‘सुरक्षा वैशिष्टे’ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
—
आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण पूर्वसूचना देऊनही ट्रम्प यांनी प्रक्षोभक ट्विट्स करणं सुरूच ठेवलं आणि अगदी मोठ्यातल्या मोठ्या नेत्याचं अकाउंटही आमच्या नियमांच्या वर नाही असं आम्ही पूर्वीच सांगितलं होतं असं ट्विटरने म्हटलं होतं.
‘बोलण्याचं स्वातंत्र्य’ या नावाखाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कुणावर बंदी आणत नव्हते. पण या घटनेनंतर त्यांच्यावर सगळीकडून बराच दबाव आणला गेला.
अमेरिकतेल्या बऱ्याच बड्या मंडळींनी ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली जावी अशी मागणी केली होती. या मंडळींमध्ये मिशेल ओबामा यांचाही समावेश होता.
आपल्या वैयक्तिक अकाउंटवर बंदी आणली गेल्यानंतर ट्रम्प यांनी राष्ट्रपतींच्या ऑफिशियल अकाउंटवरून एक ट्विट केलं जे ट्विट नंतर ट्विटरने काही सेकंदात डिलीट केलं. ट्रम्प यांनी इतर काही अकाउंट्सवरूनही ट्विट्स केली जीदेखील ट्विटरने लगेचच डिलीट केली होती.
एलॉन मस्क यांचं यासंदर्भातील म्हणणं :
‘फायनान्शियल टाइम्स’ने आयोजित केलेल्या कारच्या भविष्याबाबतच्या एका परिषदेत व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे बोलत असताना ट्रम्प यांच्यावर बंदी आणण्याचा ट्विटरचा निर्णय नैतिकदृष्ट्या वाईट आणि अत्यंत मूर्खपणाचा होता असं एलॉन मस्क म्हणाले.
ट्विटर अकाउंटवर कायमस्वरूपी बंदी आणली जाण्याच्या घटना दुर्मिळ असाव्यात आणि केवळ स्कॅम्स आणि ऑटोमॅटेड बॉट्सच्या अकाउंट्सपुरत्याच त्या मर्यादित असाव्यात असंही ते म्हणाले.
ते म्हणाले, “मला वाटतं हे चुकीचं आहे कारण यामुळे देशातली अनेक लोक दुखावले गेले आहेत आणि यामुळे अखेरीस ट्रम्प यांचा आवाज काही थांबवता आलेला नाही. त्यामुळे सगळे जण चर्चा करू शकतील अशी बैठक घेण्यापेक्षा हे फारच वाईट आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी कायमस्वरूपी असलेली बंदी मागे हटवणं हे यावरचं उत्तर आहे असं मला वाटतं.”
आपल्याप्रमाणेच ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ असलेले जॅक डोरसे यांचीही कायमस्वरूपी बंदी आणण्याला नापसंती असल्याचं मस्क यांनी सांगितलं. मस्क यांच्या ट्विटला दुजोरा देत जॅक यांनी म्हटलं, “साधारणपणे कायमस्वरूपी बंदी आणणं हे आपलं अपयश असतं आणि त्याचा काही उपयोग होत नाही.”
‘युनिव्हर्सिटी ऑफ नॉट्रे डॅम’मधील ‘टेक्नॉलॉजी एथिक्स’चे प्राध्यापक असलेल्या क्रिस्टन मार्टिन यांनी यावर म्हटलंय, “ट्रम्प यांच्यावर बंदी आणल्यामुळे बरेच जण नाराज झाले असल्याबद्दल जर मस्क यांना काळजी वाटत असेल तर ट्रम्प यांच्यावर बंदी आणली नाही तर त्याहूनही अधिक लोक नाराज होतील हे मस्क यांनी लक्षात घेतलं पाहीजे. हिंसा भडकवणाऱ्या आणि तिरस्कारयुक्त भाषणं सुरू ठेवणाऱ्या एका छोट्या समूहाच्या मताबद्दलच मस्क यांना काळजी असल्याचं दिसतंय.”
आपलं अकाउंट परत आणलं गेलं तरी ट्विटरवर येण्याचा आपला विचार नाही. त्याऐवजी माझ्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉमवर मी लक्ष केंद्रित करेन असं गेल्या महिन्यात ट्रम्प ‘फॉक्स न्यूज’शी बोलताना म्हणाले.
एलॉन यांना ट्विटर कंपनी विकत घेता यावी. ते त्यात सुधारणा करतील. ते एक चांगले मनुष्य आहेत. अशीही पुस्ती ट्रम्प यांनी जोडली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घातलेली बंदी हटवण्याविषयी एलॉन मस्क नेमका काय निर्णय घेतील याकडे सगळ्याचे डोळे लागले आहेत.
ही बंदी खरंच हटवली गेली तर ट्रम्प आपल्या म्हणण्यावरच ठाम राहतील की पुन्हा ट्विटरवर येण्याचा निर्णय घेऊन पुन्हा खळबळजनकी ट्विट्स करायला सुरुवात करतील हे येणारा काळच ठरवेल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.