Site icon InMarathi

भाजपाच्या बाजूने असो वा विरोधात, राजकारणातील चाणक्याची ही भविष्यवाणी बघायलाच हवी!

bjp predictions im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०१४ पर्यंत भारतीय राजकारणात प्रशांत किशोर हे नाव परिचयाचे नव्हते. २०१४ साली भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, सगळीकडे एकच चर्चा होती ती म्हणजे मोदी सत्तेत येण्यामागे नेमका कोणाचा हात आहे? आणि अखेर ते नाव समोर आले ते म्हणजे प्रशांत किशोर.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मोदी सत्तेत आले मात्र त्यानंतर मोदी आणि प्रशांत किशोर यांच्यात बिनसलं आणि ते वेगळे झाले, मागच्याच वर्षी झालेल्या बंगालच्या निवडणुकांमध्ये त्यांनी ममता दीदींच्या पक्षाला निवडणून आणले, भाजपचा मोठया प्रमाणावर पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की ते काँग्रेस सोबत जाणार, मात्र ती डाळ काही शिजली नाही.

 

 

आजपर्यंत पद्याआड राहून उमेदवारांना जिंकून आणणारे प्रशांत किशोर आता सक्रिय राजकारणात शिरणार असल्याची चर्चा सध्या होत आहे, मूळचे ते बिहारचे असल्याने तिथून ते राजकारणाचा श्रीगणेशा करणार असल्याचे बोलले जात आहे.

२०२४ च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, आज भाजपाला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या बैठका देखील होताना दिसून येत आहे, मात्र ज्या भाजपला एकेकाळी देशात फारशी सत्ता नसताना ज्यांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले ते प्रशांत किशोर भाजपबद्दल  नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात…

 

NewsClick

 

एक्सप्रेस इ अड्डाशी बोलताना ते असं म्हणाले की,’ देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस जवळजवळ ५० ते ६० वर्ष सत्तेत होती, आज भाजप आहे त्यामुळे तुम्ही विरोध करा अथवा साथ द्या पुढील २० ते ३० वर्ष भाजप सत्तेत राहणार’. 

ते पुढे बोलताना काँग्रेसच्या सुर्वणकाळाबद्दल आणि काँग्रेसची उतरती कळा याबद्दल आपले मत व्यक्त केले ते असं म्हणाले की, १९७७ चा अपवाद सोडला तर १९५० ते १९०० पर्यंत काँग्रेस केंद्रात होती, त्यावेळी देखील आता आहे तशीच परिस्थिती होती. तुम्ही साथ द्या अथवा नका देऊ काँग्रेसचं सत्तेत होती, देशातील कोणताच पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांना रोखणारा नव्हता.

 

 

ते पुढे म्हणाले, १९९० च्या नंतर काँग्रेसला उतरती कळा लागली आणि २००० साली जेव्हा काँग्रेसची धुरा सोनिया गांधींकडे आली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी विरोधक म्ह्णून उभी राहले होते. जेव्हा विरोधी पक्ष विभागलेला असतो किंवा एकत्र येणाच्या प्रक्रियेत असतो तेव्हा सत्तेत असलेल्या पक्षाचा कालावधी मोठा असू शकतो.

 

Outlook India

 

भाजपाविरोधात विरोधी पक्ष असावा आणि विरोधी पक्षाचा उदय होईल असं वाटल्याने बदल होणार नाही. जर योग्य कृती केल्यास २ वर्षात एक मजबूत विरोधी पक्ष तयार होईल. आणि जर असे केले नाही तर अनेक वर्ष भाजपाला सामाना करू शकेल असा पर्याय तयार होणार नाही.

आज प्रशांत किशोर हे नाणं खणखणीत वाजतं आहे, उत्तर प्रदेशचा एक पराभव सोडला तर बाकी ठिकाणी त्यांनी यशाची गुढी उभारली आहे.मोदींशी मतभेद झाल्यांनतर अनेकवेळा त्यांनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या बिहारमध्ये ते आता काय परिवर्तन करतील हे काही दिवसात कळलेच.

२०२४ साठी मोदी शाह की योगी अशी चर्चा आहेच. आज एकीकडे मोदींचे जगात नाव होत आहे आणि दुसरीकडे देशात त्यांना हरवण्यासाठी सगळेच कंबर कसत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version