शाहूंच्या करवीरनगरीतील ‘विधवा महिलांसाठी’ गावाने घेतला एक ऐतिहासिक निर्णय!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रथा, परंपरांचं पालन करणं ही काही वाईट गोष्ट नाही. अनेक रूढी-परंपरा आपली संस्कृती टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. मात्र सगळ्याच प्रथा आणि परंपरा या काही समाजासाठी पूरक आणि उत्तमच असतात, असं अजिबातच म्हणता येत नाही. जुनं ते सोनं असं कितीही म्हणायचं ठरवलं, तरी जुन्यातील जे वाईट आहे ते सोडून नव्याची कास धरणं सुद्धा अनेकवेळा फायदेशीरच असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
भारतातील विधवा आणि विधवांना मिळणारी वागणूक, हे जुन्या गोष्टी का सोडून द्याव्यात हे सांगणारं उत्तम उदाहरण आहे, असं म्हटलं तरी ते अनेकजण मान्य करतील. पूर्वी असणारी सतीची पद्धत आज कायम राहिली नसली, तरी आजही विधवांना सगळीकडेच फारशी चांगली आणि माणुसकीची वागणूक मिळतेच असं नाही.
सौभाग्याची लक्षणं असणाऱ्या बांगड्या, मंगळसूत्र, टिकली असे अलंकार विधवा स्त्रीने वापरू नयेत, असं अनेक ठिकाणी आजही सांगितलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर नगरी म्हणजे खुद्द शाहूंची नगरी! इथे मात्र एक ‘विधवा महिलांसंबंधी’ एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नेमका काय आहे तो निर्णय आणि त्यामुळे काय सकारात्मक बदल होणार आहे.
कोविड काळातील त्या घटनेमुळे
कोविडच्या पहिल्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जवळच्या व्यक्तींचा मृत्यू लोकांना पाहावा लागला. शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील हेदेखील याला अपवाद नव्हते.
त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याचा या काळात हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या पत्नीकडे पाटील यांना बघवलं नाही. हातातील बांगड्या फोडणं, गळ्यातील मंगळसूत्र काढणं, कपाळावरील कुंकू पुसणं या गोष्टी त्यांना जबरदस्तीने करायला लावल्या.
ही घटना असहनीय ठरली. सुरगोंडा पाटील यांनी जणूकाही त्याचवेळी मनाशी एक निश्चय केला होता. विधवांना मनाविरुद्ध या अशा गोष्टी करायला लागू नयेत, यासाठी काहीतरी करण्याचा.
पंचायतीत मांडला ठराव
विधवा स्त्रियांनी मंगळसूत्र काढून टाकणं, कुंकू पुसणं, त्यांच्या हातातील बांगड्या फोडणं अशा जुन्या काळापासून चालत आलेल्या प्रथा बंद करण्यात याव्यात असा प्रस्तावच पंचायतीत मांडण्यात आला. एवढंच नाही, तर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
गावातील प्रत्येकाचं या निर्णयासाठी समर्थन मागण्यात आलं. पतीच्या मृत्यूनंतरही स्त्रियांना सन्मानाने जगता यायला हवं, यासाठी हा सगळं खटाटोप करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात महात्मा फुले सेवा मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रमोद जिंदादे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचं सरपंच सुरगोंडा पाटील सगळ्यांना सांगतात. प्रमोदजींच्या पुढाकारामुळेच हे सत्यात आलं आहे.
असा प्रस्ताव पंचायतीत मांडला गेला असल्याने अभिमान वाटतोय अशा भावना सुद्धा पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. ४ मे रोजी पंचायतीत पारित झालेला हा ठराव, इतर ग्रामपंचातींसाठी एका उत्तम निर्णयाचं उदाहरण ठरलं आहे. इतर ग्रामपंचायतींनी सुद्धा यातून प्रेरणा घ्यावी असं म्हटलं जात आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथीचं हे वर्ष आहे.
महिलांच्या आयुष्यात सुधारणा व्हावी यासाठी शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणात समाजसुधारणा केली. हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे त्यांच्यासाठी जणू एक मानवंदना ठरली आहे.
कोविड काळातील विधवांसाठी
कोविड काळात आणि कोरोनाच्या आजारामुळे जीव गमावणाऱ्या पुरुषांच्या पत्नीसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोविड काळात वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी, प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
विधवांसाठी त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी सुद्धा हाच योग्य काळ असल्याचं आमच्यग लक्षात आलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, असंही सुरगोंडा पाटील यांनी गर्वाने सांगितलं आहे.
–
कोण म्हणतं लग्नानंतर करिअर करता येत नाही? वाचा या जोडप्याच्या जिद्दीची गोष्ट
जोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात? प्रेमाच्या नात्याचं दर्शन घडवणारं या मुलीचं उत्तर!
–
या महिलांवर घालण्यात आलेला बहिष्कार संपवा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. विशेषतः तारुण्यातच विधवा झालेल्या महिलांना हलाखीचं आणि बहिष्कृत जीवन जगावं लागू नये, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
हेरवाड गावाने घेतलेला हा निर्णय, विधवांच्या आयुष्यातील परिवर्तनासाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे हे निश्चित! त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, सगळ्याच गावांनी असा ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि भविष्यातील विधवा महिलांचं जीवन सन्मानपूर्ण करावं, अशी माफक अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.