Site icon InMarathi

माणसाने कपडे वापरण्याची सुरुवात कधीपासून केली? उवांवरून लागलाय शोध

stone age im 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खरेदी हा माणसाचा आवडता छंद! त्यातही कपड्यांबद्दल आपण जास्तच चुझी असतो. नवनवीन फॅशन तसेच अद्ययावत कपडे खरेदी करणे आणि नवनवे ट्रेंडिंग कपडे घालणे आपल्याला आवडते.

लोकर, धागे, रेशीम, मणी अशा शक्य असेल त्या गोष्टींनी आपण कपड्यांची सजावट करतो. जास्तीत जास्त आधुनिक दिसण्याचा प्रयत्न करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण तुम्हाला हे माहिती आहे का, की आपले पूर्वज देखील कपड्यांच्या बाबतीत असेच चुझी होते. वेगवेगळ्या प्राण्यांची कातडी, झाडांच्या साली, पाने असे साहित्य वापरुन आपल्या आदिम काळातील पूर्वजांनी घालण्यासाठी कपडे तयार केले असावेत.

आता सहज कल्पना करा, की हे असे कपडे घालून ते कसे दिसत असावेत? ही कल्पना करताना तुम्हाला एक प्रश्न नक्की पडेल की त्यांनी कपडे वापरण्यास नक्की कधी सुरवात केली असावी?

 

 

मित्रांनो, या बद्दल निरनिराळी मते आहेत. तसेच वेगवेगळ्या प्राण्यांची कातडी, झाडांच्या साली, पाने या गोष्टी नाशवंत असल्याने त्यांचे कालांतराने विघटन होत गेले त्यामुळे आपल्या पूर्वजांनी कपडे वापरायला कधी सुरवात केली हे शोधणे तसे अवघड होते.

गुहेत राहणाऱ्या मानवाने आपले शरीर झाकण्यासाठी आणि संरक्षणासाठी फरचा वापर करण्यास सुरुवात केली होती. पाषाण युगातील मानव कोणत्या प्रकारचे कपडे वापरत होते, याबाबतचे पुरातत्व पुरावे अतिशय दुर्मिळ आहेत.

फर, चामडे आणि इतर कार्बनिक पदार्थ दीर्घकाळ जतन करता येऊ शकत नव्हते. विशेषत: दहा हजार वर्षांपूर्वी ही बाब अशक्य होती. यातील नवलाची गोष्ट तर पुढेच आहे.

आपले पूर्वज कपडे घालत होते की नाही हे शास्त्रज्ञांनी शोधले आहे कपड्यामध्ये होणार्‍या उवांच्या सापडलेल्या डीएनए वरुन! विश्वास नाही ना बसत? चला तर मग पाहूया या रंजक संशोधनाबद्दल!

संशोधकांच्या माहितीनुसार, मोरक्को येथील एका गुहेत ६२ विशिष्ट प्रकारची उपकरणे आढळली आहेत. या उपकरणांचा वापर प्राण्यापासून चामडे मिळवणे, वेगळे करणे आणि त्यांचा दीर्घकाळापर्यंत वापर करण्यासाठी केला जात होता.

 

 

पुरात्व नोंदीप्रमाणे ही बाब कपड्यांच्या इतिहासातील सुरुवातीचा टप्पा असू शकतो. ही उपकरणे ९० हजार ते एक लाख २० हजार वर्षांपूर्वीची आहेत.

या संशोधक गटातील एक संशोधक एमिली युको हॅलेट यांनी सांगितले की, ”मी प्राचीन मानवी आहारबाबतची माहिती गोळा करण्यासाठी या जागेचा अभ्यास करत होते. त्यामुळे अशी वेगळी उपकरणे समोर येतील अशी अपेक्षा अजिबातच नव्हती.

गुहेत प्राण्यांची १२ हजार हाडे आढळली. त्यांचे निरिक्षण करत असताना या हाडांचा आकार वेगळा असल्याचे दिसून आले. या हाडांना कृत्रिमरित्या आकार दिला असल्याचे दिसून आले. खाण्यासाठी अथवा एखाद्या प्राण्याचे मांस भक्षण केल्यानंतर उरणारी ही हाडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हे संशोधन ‘आयसायन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. या गुहेत आढळलेल्या हाडांवर काही खूणा सापडल्या आहेत.

या हाडांचा वापर गुहेत राहणाऱ्या मानवाकडून ‘रानटी मांजर, कोल्हा आदी वन्य प्राण्यांचे चामडे कमावण्यासाठी’ याचा वापर होत असावा असे हाडांवरील या खूणांच्या आधारे अंदाज वर्तवला जात आहे.

कोल्हे, लांडगे, रानमांजर यांसारख्या वन्य प्राण्यांचे अवशेषही त्या हाडांवर आढळून आले आहेत.

 

 

संशोधकांनी सांगितले की, अशाप्रकारच्या खूणा, पॅटर्न याआधी कधीही दिसले नाहीत. पुरात्व तज्ज्ञांकडूनही याचा शोध घेतला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

एका दशकापूर्वीचा करण्यात आलेला आणखी एक अभ्यास या कल्पनेला पुष्टी देतो की आदिमानवाने वापरलेले कपडे हे कल्पनेपेक्षा खूप आधी प्रचलित होते.

डोक्याच्या उवांपेक्षा वेगळे DNA असलेले कपड्यातील उवांचे १७,००० वर्षे जुने अवशेष, या गृहितकामागे आहे. आता,१० वर्षांनंतर, नवीन अभ्यासाने अंदाजे कालावधीची पुष्टी केली आहे जेव्हा मानवाने कपडे तयार केले आणि परिधान केले असे मानले जात होते.

हॅलेट पुढे असेही म्हणाल्या की , प्रारंभिक मानवांचे कपडे आणि गुहेत सापडलेले टूलकिट हे पॅकेजचे भाग आहेत, ज्यामुळे मानवाला कपडे तयार करण्यामध्ये अनुकूल यश मिळू शकले.

कपड्याच्या उवा डोक्याच्या उवांपासुन कमीतकमी ८३,000 आणि शक्यतो १७0,000 वर्षांपूर्वी वेगळ्या झाल्या असाव्यात. हा अंदाज लावण्यासाठी आम्ही ‘बायेसियन कोलेसंट मॉडेलिंग दृष्टिकोन’ वापरला.

एमिली युको हॅलेट, या संशोधन गटातील पोस्टडॉक्टरल शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार कातडे किंवा फर मानवाने पहिल्यांदा परिधान करण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच्या त्या कपड्यांचे इतके प्राचीन अवशेष सापडण्याची शक्यता नाही.

मात्र मानवी उवा तसेच कपड्यांवरील उवा यांच्या डीएनए अभ्यासातून हे समोर आले आहे, की त्यांच्या यजमानांच्या बरोबरीने त्या विकसित झाल्या आहेत आणि मानवी उत्क्रांतीच्या पैलूंवर प्रकाश टाकू शकतात ज्यात थेट डेटा नाही.

फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील जीवशास्त्रज्ञ, डेव्हिड रीड यांच्या मते, मानवी पोशाखात राहणाऱ्या उवा हा एक वेगळा वंश आहे जो आपल्या टाळूवर राहणाऱ्या उवांपासून विकसित झाला आहे.

या कपड्यांवर सापडणार्‍या उवा पहिल्यांदा केव्हा दिसल्या याचा शोध घेण्यासाठी डीएनए अनुक्रम वापरून, अनुवांशिकदृष्ट्या त्या केसातील उवांपासुन कधी वेगळ्या झाल्या आणि त्यांचा नवीन वंश कधी विकसित झाला याचा अभ्यास शास्त्रज्ञ करू शकतात आणि अंदाज ही लावू शकतात की मानवाने पहिल्यांदा कपडे कधी घालायला सुरुवात केली.

 

 

एक दशकापूर्वी रीडने कपड्यांवरील उवांचा अनुवांशीक अभ्यास केला होता ज्यात त्याने त्यांच्या वंशाचा पुरातन काळापासून शोध घेतला होता आणि सुचवले होते, की आफ्रिकेतील एच. सेपियन्स १७0,000 वर्षांपूर्वीपर्यंत कपडे घालत असावेत, आणि ही तारीख सापडलेल्या तथ्यांशी सुसंगत आहे. कारण शरीरातील उवा किंवा कपड्याच्या उवा मानवांमध्ये कपडे येईपर्यंत जवळजवळ नक्कीच अस्तित्वात नव्हत्या.

तेव्हा मित्रांनो, या संशोधनामुळे आपले पूर्वज कपडे वापरत होते की नाही किंवा त्यांनी कपडे कधी वापरायला सुरुवात केली याचा आता अंदाज लावता येईल. ‘सुतावरून स्वर्ग गाठणे’ हा वाक्प्रचार या संशोधनाबाबतीत खरा ठरतो ना? तुमचे मत आम्हाला कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version