मासिक पाळीच्या वेळी महिलांना सुट्टी मिळाली तर…?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
” जन्म बाईचा, बाईचा, खूप घाईचा.. ” खरंच आज एकविसाव्या शतकातील बायका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मग ते काम बौध्दिक असो की शारीरिक त्या कुठेच मागे नाहीत. पण हे सगळं करताना त्यांना एका गोष्टीला सामोरं जावं लागतं ते म्हणजे मासिक पाळी.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पूर्वी चौदा ते पंधराव्या वर्षी सुरू होणारी पाळी अलीकडे दहा ते बारा वर्षांपासूनच सुरू होते. हा प्रवास एकदा सुरू झाला ते थेट रजोनिवृत्ती म्हणजे मोनोपॉज पर्यंत. म्हणजे महिलांना साधारण दर अठ्ठावीस दिवसांनी ती भेटायला येते. हे चक्र जरी सर्व महिलांसाठी समान असलं तरी हा अनुभव प्रत्येकी साठी वेगळा असतो.
काही जणींना पाळीच्या दिवसांत फारसा त्रास होत नाही पण काही जणींना मात्र अशा दिवसांत ओटी पोटात प्रचंड दुखणे, डोकेदुखी, शरीर जड होणे, मळमळणे अशा अनेक समस्या जाणवतात.
शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे चीड चीड होणे, अति भूक लागणे किंवा अजिबातच भूक न लागणे अशा गोष्टी सुद्धा होत असतात. त्यामुळे अशा अवस्थेत काम करणे थोड का होईना पण कठीण होतच.
एका सर्वेक्षणानुसार जगभरात २५ दशलक्ष महिलांना मासिक पाळी दरम्यान एंडोमेट्रियोसिस किंवा प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर (PMDD) चा त्रास होतो. पायात पेटके येणे, पाठदुखी , मायग्रेन अशा समस्या जाणवतात.तर बऱ्याच महिलांमध्ये जीवघेणी पोटदुखी, मळमळ, चक्कर येणे असे प्रकार दिसून येतात.
मोनोपॉज दरम्यान अचानक वजन वाढणे, पाय किंवा अंगदुखी, ताप अशा प्रकारचे त्रास जाणवतात. परंतु आपल्या समाजामध्ये अजूनही मासिक पाळी बद्दल बोलणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे महिलांना होणारा त्रास हा लॉकर रूम किंवा लेडीज बाथरूमच्या बाहेर जात नाही. पिरियड मध्ये कामाच्या ठिकाणी होणारा त्रास म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारचा. तरीही बहुतेक स्त्रिया पाळी पुढे ढकलण्याचा आणि कामावर जाण्याचा प्रयत्न करतात.
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड लॉ स्कूलमधील वरिष्ठ व्याख्याता गॅब्रिएल गोल्डिंग म्हणतात, कारण ते त्यांच्या वरिष्ठांकडे मासिक पाळीची लक्षणे उघड करण्यास उत्सुक नसतात, कारण त्यांना कमकुवत समजून नोकरी करण्यास असमर्थ समजले जाण्याची भीती वाटते. परंतु आता अनेक महिला पुढे येऊन आपल्या समस्यांचे निराकरण करत आहेत.
काही देशांमध्ये पाळीच्या संदर्भातील वस्तू म्हणजेच सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पन अशा वस्तूंवरील कर माफ करण्यात आला आहे. तसेच आजकाल ‘पिरियड लिव्ह ‘ ही नवीन संकल्पना कॉर्पोरेट क्षेत्रात राबवली जात आहे. अनेक आयटी कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत हक्काची सुट्टी देत आहेत.
–
अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?
स्त्रियांच्या अंतर्वस्त्राबाबतची एक अशी गोष्ट, जी खुद्द स्त्रियांनाही माहित नसते
–
गेल्या वर्षी अनेक ऑस्ट्रेलियन कंपन्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा आवश्यक होती त्यांच्यासाठी सशुल्क मासिक रजा सुरू केली. सुरवातीला ह्या धोरणावर टीका होत असताना, त्या कंपन्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. कंपनीच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे अनेक कंपन्यांनी मान्य केले आहे.
सिडनी-येथील अंडरवेअर कंपनी, मोदीबोडीने गेल्या वर्षी मे महिन्यात सशुल्क कालावधीची रजा सुरू केली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षातून १० दिवसांची परवानगी होती. या कंपनीने सुद्धा म्हंटले आहे की या धोरणामुळे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास वाढला आहे तसेच उत्पादकता वाढली आहे.
भारतात सुद्धा अन्न वितरण करणाऱ्या झोमॅटोने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना वर्षाला १० दिवसांची पिरियड लिव्ह जाहीर केली आहे. त्यामुळे भारतात मासिक पाळीचे आरोग्य आणि लैंगिक समानता याविषयी मोठी चर्चा सुरू झाली. तसेच अनेक स्टार्टअप आणि लहान मोठ्या कंपन्यांनी सुद्धा हा मुद्दा लक्षात घेऊन मासिक पाळीच्या काळात एक किंवा दोन दिवस सुट्टी घेण्याची परवानगी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
उत्तर प्रदेशच्या महिला शिक्षकांनी जुलै २०२१ मध्ये एक मोहीम सुरू केली, ज्यामध्ये शिक्षकांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात काही दिवस पगाराच्या सुट्ट्या म्हणून देण्याची मागणी करण्यात आली.काही शाळांमध्ये स्वच्छ शौचालये नसल्याने महिला शिक्षक आणि विद्यार्थिनींना अनेक गोष्टींना अडचणींना सामोरे जावे लागते.
पिरियड लिव्ह मुळे महिलांना सुट्टी मिळाल्याने त्यांना या दिवसांत विश्रांती घेता येते. त्यामुळे महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहून त्यांची उत्पादन क्षमता वाढते हे नक्की. पूर्वी मासिक पाळीच्या काळात महिलांना घरगुती कामांतून सक्तीची विश्रांती देण्याची प्रथा होती. आता मिळणारी पिरियड लिव्ह हा देखील असाच एक भाग म्हणता येईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.