Site icon InMarathi

कंपनी असावी तर अशी; कर्मचाऱ्यांचे लग्न जुळवणार आणि थेट पगारवाढ देखील करणार

vicky im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयटी हे तसं नावाजलेलं, प्रचंड मेहनतीबरोबर चिक्कार पैसे मिळवून देणारं क्षेत्र. पण आयटी कंपन्यांची परिस्थिती सध्या काहीशी अवघड झाली आहे. सगळ्याच आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण केल्या काही काळापासून वाढलं आहे.

अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सोडून जाण्यामागे नेमकी काय कारणं आहेत हे आपल्याला ठाऊक नसलं तरी सगळ्याच आयटी कंपन्या आपले कर्मचारी कंपनीत टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळी धोरणं आखत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

इंफोसीससारख्या बड्या कंपनीची अवस्थाही अशीच झाल्याचं मध्यंतरी आपल्यासमोर आलं होतं. आपले कर्मचारी कंपनी सोडून जाऊ नयेत म्हणून कंपनी सोडलेल्या किंवा सोडण्याचा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीची प्रतिस्पर्धी असलेल्या कुठल्याही कंपनीत पुढचे सहा महिने नोकरी करता येणार नाही असा नवा विचित्र नियम इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांवर लादला.

 

the economic times

ही तर सरळसरळ सक्तीच झाली. पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये अशा प्रकारे होणारी घट रोखण्यासाठी आयटी कंपन्या आपली शक्कल लढवून काही हटके योजना आखत आहेत.

तामिळ नाडूमधील मदुराई मध्ये हेडक्वार्टर असलेल्या ‘श्री मूकाम्बिका इन्फोसोल्युशन्स’ या आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चक्क मॅचमेकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कर्मचाऱ्यांनी लग्नं केली तर त्यांच्या पगारात वाढ होईल. कंपनीने नेमका काय विचार करून हे धोरण आखलं असेल? काय आहे ही योजना? याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

राज्यातल्या बऱ्याच कंपन्यांनी चेन्नई हे शहर निवडलेलं असताना ‘श्री मूकाम्बिका इन्फोसोल्युशन्स’ चं हेडक्वार्टर मात्र मदुराईत आहे. तरीदेखील कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यात आणि त्यांना कंपनीत टिकवून ठेवण्यात ही कंपनी यशस्वी ठरली आहे.

 

 

ही कंपनी सध्यस्थितीत जवळपास १०० करोड रुपयांचा महसूल मिळवत असून सुमारे साडेसातशे कर्मचारी इथे नोकरीवर आहेत. ही कंपनी वर्षातून दोनदा ६ ते ८ टक्क्यांनी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘श्री मूकाम्बिका इन्फोसोल्युशन्स’ ही ‘प्रायव्हेट टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रोव्हाईडर’ कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘विशेष मूल्यांकन योजना’ राबवते. पण त्याचबरोबरीने ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपला जोडीदार शोधायलाही मदत करते. या दोन्हींमधला नेमका सहसंबंध काय असा प्रश्न हे वाचून आपल्याला पडू शकतो.

या कंपनीचे बरेच कर्मचारी गावांमधून येतात आणि त्यांना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळू शकत नाही. कर्मचाऱ्यांची हीच चिंता कंपनीने लक्षात घेतली आणि काय केलं म्हणजे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही लाभ होईल असा विचार केला. कंपनीने कर्मचाऱ्यांना मॅचमेकिंगची सुविधा पुरवायला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी लग्नं केली की ही कंपनी त्यांच्या पगारात विशेष वाढ करते.

 

 

सिवकासी मध्ये २००६ साली स्थापन झालेल्या या कंपनीचं २०१० सालापासून मदुराईत हेडक्वार्टर आहे. एमपी सेल्वागणेश हे या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. SMI कंपनीच्या कर्मचारी धोरणात पहिल्या दिवसापासूनच कर्मचाऱ्यांच्या लग्नानंतर त्यांच्या पगारात विशेष वाढ करणे ही सोय आहे, असं संस्थापक आणि सीईओ एमपी सेल्वागणेश यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला सांगितलं. मात्र, कर्मचाऱ्यांचं लग्न होण्यासाठी मदत व्हावी म्हणून मोफत स्वरूपात मॅचमेकिंगची सुविधा पुरवायला कंपनीने नंतर सुरुवात केली.

 

जोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात? प्रेमाच्या नात्याचं दर्शन घडवणारं या मुलीचं उत्तर!

नोकरी सांभाळूनही बिझनेस करता येऊ शकतो! ५ मस्त स्टार्टअप ऑप्शन्स..

सक्ती करून आपले हेतू साध्य करायला गेलं तर त्यात फायद्यापेक्षा कधीकधी नुकसान होण्याची किंवा तसं जरी झालं नाही तरी कंपनीचं नाव खराब होण्याची शक्यता असू शकते हे आपल्याला इन्फोसिस सारख्या कंपनीवरून लक्षात आलं होतं. वरच्या उदाहरणात मात्र कंपनीने याच्या नेमकं उलट केलं.

कंपनीचे वरिष्ठ आपल्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या खासगी आयुष्याच्या दृष्टीनेही कसा फायदा होऊ शकेल हा विचार हुशारीने करू शकले आणि कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध केवळ कामापुरताच न राहता कर्मचाऱ्यांना कामापलीकडेही कंपनीची मदत होत आलेली आहे. शिवाय, पगारही वाढत राहिला. त्यामुळे, आपले कर्मचारी टिकवायचे असतील तर आयटी कंपन्यांनी आता आधीपेक्षा अधिक शांतपणे आणि वेगळ्या प्रकारे विचार करणं गरजेचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version