Site icon InMarathi

बॉलीवूडच्या या घराण्यातील मुलगी व्हावी आपली सून; होती इच्छा इंदिरा गांधींची पण…

ritu im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड म्हटलं की भलेभले बसल्याजागीच विरघळतात. आजकाल प्रत्येक जण बॉलिवूडच्या हिरो-हिरॉइन्सना फॉलो करतो. आता तर नवीन फॅड निघालं आहे. या बॉलिवूडमधल्या लोकांची लग्नं झाल्यावर ते लोक तर फोटो, व्हिडिओ आणि स्टोऱ्या टाकतातच. पण त्यांच्यासोबत त्यांची फॅन मंडळीही हे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. का कुणास ठाऊक! पण करतात हे मात्र खरं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता लग्नाचा विषय निघाला म्हणून आठवलं. बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्यातलं एक कोणीतरी बॉलिवूडशी निगडित आहेत; पण त्यांचा पार्टनर मात्र बॉलिवूडशी दुरूनही संबंध ठेऊन नाही. नावं घ्यायची झाली तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, झहीर खान आणि सागरिका घाटगे, वरुण धवन आणि नताशा दलाल. अशी आणखीनही कित्येक उदाहरणं आहेत.

 

 

सध्या एवढीच आठवली म्हणून ती सांगितली. याबरोबरच अभिनेत्रींनी राजकारणी घराण्यात लग्न केल्याचीही उदाहरणं आहेत. जेनेलिया डिसुझानं रितेश देशमुखसोबत लग्न केलं. नवनीत कौर यांनी रवी राणा यांच्याशी लग्न केलं.

यावरून आपल्याला दिसून येतं की भारतभरात अभिनेते आणि अभिनेत्रींची किती क्रेझ आहे ते. मात्र ही क्रेझ फार पूर्वीपासून आहे. कारण एकेकाळी इंदिरा गांधींनासुद्धा बॉलिवूडच्या कपूर घराण्यातली मुलगी आपली सून व्हावी असं वाटत होतं. पण मग ते का फिस्कटलं? चला जाणून घेऊया.

 

 

राज कपूरच्या मुलीशी होणार होतं राजीव गांधींचं लग्न; पण…

भारतात अनेक वर्षांपासून दोन कुटुंबं नावाजलेली आहेत. एक म्हणजे बॉलिवूडचं कपूर घराणं. दुसरं म्हणजे राजकारणातलं गांधी घराणं. या दोन कुटुंबांबाबत रशीद किडवई या ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या ‘लीडर ऍक्टर: बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात ते म्हणतात की देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर हे दोघंएकमेकांचे खूप चांगले मित्र होते.

त्यामुळं इंदिरा गांधींनाही कपूर घराण्याबद्दल खूप आदर होता. त्यांना या मैत्रीचं नात्यात रूपांतर करायचं होतं. त्यासाठी त्यांना राज कपूर यांची मोठी मुलगी रितू आणि राजीव गांधी यांचं लग्न लावून द्यायचं होतं. मात्र त्यांचा हा उद्देश सफल झाला नाही. राजीव गांधी शिकण्यासाठी म्हणून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत गेले. तिथं एका हॉटेलमध्ये त्यांची भेट सोनिया मायनो यांच्याशी झाली.

 

ndtv.com

तिथं या दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघांना एकमेक आवडू लागले. इंदिरा गांधींनी स्वतःचा विचार बाजूला ठेऊन या दोघांच्या नात्याला परवानगी दिली. मात्र त्या वेळी सोनिया यांचे वडील या नात्याच्या विरोधात होते. शेवटी या दोघांनी १९६८ मध्ये लग्न केलं.

ज्यांच्याशी लग्न होणार होतं त्या रितू कपूर कोण?

राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी रितू सर्वात मोठी. त्यांचं त्या वेळी राजीव गांधी यांच्याशी लग्न झालं नाही. त्यांचं लग्न एका इंजिनिअरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमन राजन नंदा यांच्याशी झालं. हे आडनाव तुम्हाला जे वाटतंय तेच आहे. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिच्या सासूबाई म्हणजे रितू कपूर.

 

कसाब ते संजय गांधी – भारतात खळबळ माजविणाऱ्या ८ अजब ‘कॉन्स्पिरसी थिअरी’

असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

एस्कॉर्टस लिमिटेड नावाची त्यांची एक कंपनी आहे. मात्र चित्रपट घराण्यातील रितू नंदा यांचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात न येता व्यावसायिक व्हायचं होतं. काही प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालं नव्हतं. पण त्यांनी विमा क्षेत्रात पाऊल टाकल्या टाकल्या त्यांचं भाग्य उजळलं.

ते इतकं, की त्यांनी एका दिवसात तब्बल १७ हजार विमा पॉलिसी विकण्याचा विक्रम केला. ज्यामुळं त्यांचं नाव डायरेक्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं. त्यांना २०१३ मध्ये कॅन्सरचं निदान झालं. गेली अनेक वर्षं त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र गेल्यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी कॅन्सरमुळं निधन झालं.

रशीद किडवई पुढच्या पिढीचीही एक गमतीदार गोष्ट सांगतात..

त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, राज कपूर यांची नातं करिना कपूरनं राहुल गांधी तिचा क्रश असल्याचं २००२ मध्ये सांगितलं होतं. राहुल गांधींनाही करिना कपूरचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला आवडत होते असंही ते पुस्तकात म्हणतात. मात्र २००९ मध्ये जेव्हा करिनाला याबद्दल एका मुलाखतीत विचारण्यात आलं तेव्हा तिनं या गोष्टीला नकार दिला.

 

 

‘ही खूप जुनी गोष्ट आहे. मी हे बोलले कारण आम्हा दोघांची आडनावं प्रसिद्ध आहेत. मला कधीतरी त्यांना होस्ट करायला आवडेल. त्यांना पंतप्रधान म्हणून बघायला आवडेल, पण मला नक्कीच डेट करायचं नाही’, असं करिना म्हणाली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version