आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती वो बारिश का पानी !!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
असे म्हंटले जाते की आयुष्यात जे दिवस निघून जातात ते कधीच परत येत नाहीत. आपण लहानपणी लहान असतो तेव्हा वाटत राहते की यार आपण मोठे कधी होणार? आई सारखे ,बाबासारखे, ऑफिस ला कधी जाणार? आणि एकदा का आपण मोठे झालो की मग रुख रुख वाटत राहते, हुरहूर लागून राहते की यार “इस बडोवाली जिंदगी मे बचपन वाली वों बात नही” उगाच च मोठे झालो आपण. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा! असे तुकाराम महाराज म्हणून गेलेत ते काही उगाचच नाही.
९०च्या दशकातील बालपण जगलेल्या लोकांना हे खूप खर्या अर्थाने जाणवत असेल की आपण जे आयुष्य जगलो ते आताच्या मुलांना माहीतच नाही. ९० चा काळ म्हणजे गोल्डन डेज. त्या काळच्या बालपणामध्ये आतासारखी जबाबदारी नव्हती, की सकाळी उठून, आवरून भले मोठे ओझे पाटीवर घेऊन दारात बस,रिक्षा यांची वाट पाहत ताटकळत बसण्याची सक्ती ही नव्हती. त्या काळ च्या बालपणा मध्ये होता शुद्ध निरागसपणा.
९० हे ते दशक होते ज्यामध्ये फक्त प्रेम, आपलेपणा आणि खोडकरपणा होता. भांडण झाले तरी ते मित्र आणि प्रियजनांच्या भल्यासाठी असे. अधून मधून काही ना काही कुरबुरी सुरू असल्या तरी त्या मध्ये स्वार्थ नसे. शेजारचे घर म्हणजे २४ तास कधीही धुमाकूळ घालण्याची, भूक लागल्यानंतर जेवायला काय असेल ते वाढा असे म्हणायची हक्काची जागा.
९० चे ते दशक खूप गोड होते. लाईट गेली तर त्यात ही एक वेगळी च मजा असायची. लाईट जाण्याची ही त्या काळी गंमत वाटायची. उणीवांचेही आनंदात रूपांतर करण्याचे साधन त्यावेळी उपलब्ध असे.
दुःखाची भावना कधीच नव्हती, त्या काळी लाईट जाणे म्हणजे पर्वणी असे, कारण लाइट गेल्यानंतर सगळं घर एकत्र बसून बोलत असे, गप्पा गोष्टी होत असत, कुणाला काही अडी अडचणी असतील तर तिथल्या तिथे त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात असे.
एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरातील रिती भाती, प्रथा परंपरा यांना मान असे. घरातील वडील धार्या व्यक्ती त्यांच्या गाठीशी असलेला अनुभव त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांना कथन करीत असत.
घरातील आजी आजोबा त्यांच्या नातवंडाना रामायण महाभारत या महाकाव्यातील गोष्टी सांगत. नाती जपणे, आपले मन निकोप ठेवणे, नात्यांमधील भावनेचा ओलावा टिकवून ठेवण्याचे संस्कार त्या काळी बालपणीच मिळत असत.चंद्र तार्यांना ना गोष्टी सांगता सांगता ते कधी आपल्या जिवाभावाचे मैतर होऊन जात कळत ही नसे.
आज लाइट असो व नसो माणसे मात्र एकमेकांपसून प्रचंड दूर गेली आहेत. चला तर आजच्या या लेखात आपण जाणार आहोत अशाच एका सुंदर आठवणींच्या शब्दसफरीवर, ज्यात लाइट गेल्यानंतर केलेली गम्मत जम्मत यांच्या आठवणीत न्हाऊन तुम्ही तुमचे बालपण परत एकदा जगण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकाल.
अचानक लाइट गेल्यानंतर अभ्यासाला मिळालेली अकस्मात सुट्टी :-
खूप मागे लागून, ओरडून आई बाबा जेव्हा आपल्याला अभ्यासाला बसवत आणि मधेच अचानक लाइट जात असे तेव्हा अनपेक्षित आनंदाने आपले बालपण मोहरून जाई. वह्या पुस्तके पटापट बंद करून अंगणात पळायची आपल्याला झालेली घाई ही त्या वेळ ची सगळ्यात निरागस गोष्ट असे.
अंधारात पकडा पकडी , लपा छपी खेळण्यात येणारी मजा :-
उजेड नाहीसा झाल्यानंतर सवंगड्यांना जमवून लपा छपी, खेळणे, पकडा पकडी खेळणे, यांसारख्या खेळांमुळे कितीही खडतर वाट असली तरी त्या मधून मार्ग काढावा च लागतो असा विचार लहानपणीच मनावर बिंबवल्या गेला.
गच्चीवर झोपण्यासाठी धडपड :-
लहानपणी लाइट गेल्यानंतर संपूर्ण अंधारात गच्चीवरती झोपण्याची मजा काही निराळीच असे. दूर आकाशात असलेले चंद्र तारे अलगद ओंजळीत यावेत आणि जीवश्च कंठश्च मित्रा किंवा मैत्रिणीशी हळू हळू गप्पा माराव्यात इतका सुंदर माहोल तयार होत असे.
रात्री च्या अंधारात शेजर्याच्या घराची कडी वाजवणे आणि चित्रा विचित्र आवाज काढणे.
घरातील लाइट गेल्यावर शेजारच्या घराची कडी वाजवलेली नाही असा एक ही व्यक्ति शोधून सुद्धा सापडणार नाही. लहानपणी आपल्या मधले छुपे साहसी जागे होऊन बरेचदा असे साहस आपण करत असू आणि मग खरे समजल्यानंतर आई किंवा बाबांचा धपाटा ही मोठ्या दिमाखाने पाठीवर मिरवत असू.
पेपर किंवा हात पंख्याने कोण किती जास्त वेळ हवा घेऊ शकतो.
लाइट गेल्यानंतर खरी मजा येत असे जेव्हा आपली आजी किंवा आजोबा आपल्याला हाताने वारा घालायला सांगत असत.मग आपल्या भाऊ किंवा बहिणीशी कोण किती जास्त वेळ वारा घालू शकतो यावरून आपण वाद घालत असू , इथूनच खर तर आपल्यात स्पर्धेत टिकून राहण्याची महत्वाकांशा रूजली असावी.
आठवणी वारुळातील मुंग्यांसारख्या असतात एका मुंगी पाठोपाठ जशा अनेक मुंग्या वारुळातून निघतात तशाच आठवणी सुद्धा एका पाठोपाठ एक येतात आणि मन भरून येते.
सगळ्या गोष्टी आठवताना आयुष्य कमी पडते. ९० च्या दशकातील सर्व लोक माझ्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत असतील. तुमच्याही काही आठवणी असतील तर नक्की शेअर करा.
आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी लोडशेडिंग सुरु झाले आहे त्यामुळे अनेकजण अंधारात काढत आहेत फोनवर वेळ घालवण्यापेक्षा या गोष्टी नक्की करा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.