Site icon InMarathi

कॉफी विथ करणमधल्या या ६ कॉंट्रोवर्सीज आठवतायत का?

controversy IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोचा नवा सिझन येणार असल्याची, त्या सीझनमध्ये कुठले कुठले सेलिब्रिटीज हजेरी लावणार याविषयीच्या चर्चा ऐन रंगात आलेल्या असताना अचानक करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पुन्हा हा शो टीव्हीवर परत कधीही दिसणार नसल्याची घोषणा केली.

ही बातमी कळल्यावर या शोचे चाहते असलेल्या अनेकांची निराशा झाली होती. मात्र इतक्यातच करण जोहरने पुन्हा हा शो टीव्हीवर दिसणार नसला तरी ‘डिझनी प्लस हॉटस्टार’ वर दिसणार असल्याचं सांगितलं आहे.

 

 

आपली खासगी आयुष्यं, गुपितं, लिंक अप्स- ब्रेक अप्स अशा सगळ्या गोष्टींविषयी कधी सेलिब्रिटीज या शोवर बिनधास्त बोललेत तर कधी त्यांनी यावर काहीही बोलणं टाळल्यावरही करण जोहरच्या ‘लायोमीटर’ पासून त्यांची सुटका झाली नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलेला हा शो या शो मध्ये बोलल्या गेलेल्या अनेक गोष्टींमुळे वादग्रस्तही ठरला. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर, पूर्वाशश्रमीच्या प्रियकर-प्रेयसींवर वादग्रस्त विधानं करायला कलाकार कचरले नाहीत.

या शोचा सातवा सिझन लवकरच येणार असल्याचं समजतंय. या निमित्ताने या कार्मक्रमातल्या आजवर घडलेल्या कॉंट्रोव्हर्सीजपैकी काही कॉंट्रोव्हर्सीजना नव्याने उजाळा देऊ.

१. करीना – प्रियांकामधली तूतूमैमै :

 

 

करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्री एकमेकींच्या प्रतिस्पर्धी आहेत ही बाब नवी नाही. ‘कॉफी विथ करण’ च्या एपिसोड्समधूनही त्यांच्यातली टशन दिसून आलेली आहे.

‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या सिझनमध्ये जेव्हा करीना कपूर सैफ अली खानसोबत आली होती तेव्हा “तिचा ऍक्सेंट तिला कुठून मिळालाय?”, असं प्रश्न मी प्रियांकाला विचारेन असं करीना म्हणाली होती.

त्याच सिझनमधल्या पुढच्या एका एपिसोडमध्ये करीनाचा एक्स बॉयफ्रेंड आणि प्रियांकाचा तेव्हाचा प्रियकर असलेल्या शाहीद कपूरसोबत प्रियांका चोप्रा आली होती तेव्हा करणने तिला करीनाने विचारलेला हा प्रश्न सांगितला.

प्रियांकाने त्यावर, “जिथून तिच्या प्रियकराला ऍक्सेंट मिळालाय तिथूनच मलाही मिळायला.”, असं उत्तर दिलं होतं. तिचं हे उत्तर ऐकून हजरजबाबी असलेला करण जोहरही क्षणभर अवाक् झाला होता.

करीना त्यावेळी सैफ अली खानला डेट करत होती ज्याच्याशी पुढे तिने लग्न केलं. हा वाद त्यावेळी बराच चर्चेत होता. पण आपल्यातला जुना वाद विसरून त्या दोघी ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या सिझनमध्ये एकत्र दिसल्या होत्या.

२. कंगनाने केलेलं नेपोटीझमवरचं भाष्य :

 

 

‘कॉफी विथ करण’च्या आधीच्या एका सिझनमध्ये थोड्या वेळापुरती कंगना राणावत दिसली होती पण ५व्या सिझनमध्ये ती सैफ अली खानसोबत आली असताना तिने त्यावेळी केलेली वादग्रस्त विधानं बराच काळ चर्चेत होती. करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यातलं वैर जगजाहीर आहे.

या शोच्या पाचव्या सिझनमध्ये ती येण्यापूर्वी तिच्या इंग्रजीची शोवर खिल्ली उडवली गेली होती. पाचव्या सिझनमध्ये ती आली तेव्हा तिने करणवर तो नेपोटीझमचा ‘फ्लॅग बेअरर’ असल्याचा आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली होती. इंडस्ट्रीत करणने तिला अकारणच ऍटिट्यूड दिल्याचंही तिने म्हटलं होतं.

सगळ्यांनी माझ्या इंग्रजीची मस्करी केल्याचा मी फायदाच करून घेतला असून माझी इंग्रजी बोलण्याची कौशल्यं मी सुधारली आहेत असंही ती त्यावेळी म्हणाली होती.

३. दीपिकाने रणबीरवर केलेली शेरेबाजी :

 

 

दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर दोघींनीही एकेकाळी रणबीर कपूरला डेट केलं होतं. दीपिका-रणबीरची रिलेशनशीप आणि ब्रेकअप दोन्हींची चांगलीच चर्चा झाली होती. २०१० साली जेव्हा या दोघी कॉफी विथ करणच्या शोवर आल्या होत्या तेव्हा रणबीरने आपल्याला फसवलं असल्याचं दीपिकाने म्हटलं होतं.

आपल्या ‘बॉयफ्रेंड स्किल्स’वर काम करण्याची त्याला गरज आहे असंही ती म्हणाली होती. त्याने कुठल्या वस्तूची जाहिरात करावी असा प्रश्न करण जोहरने तिला विचारला तेव्हा तिने त्याने कंडोमची जाहिरात करावी असं म्हटलं होतं.

तिच्या या विधानामुळे रणबीरचे आईवडील असलेले अभिनेते-अभिनेत्री ऋषी कपूर आणि नीतू सिंग चांगलेच चिडले असल्याचं वृत्त समोर आलं होतं.

४. रणवीर सिंगचं अश्लील विधान :

 

 

दीपिकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला रणवीर सिंग एकेकाळी अनुष्का शर्मा या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता हे अनेकांना विसरायला झालं असेल. २०१० साली शोच्या एका एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा आले होते.

त्यांच्या रिलेशनशिपची कबुली त्यांनी शोवर दिली नव्हती. पण त्यांच्या वागण्यातून यांच्यात काहीतरी सुरू असेल असा अंदाज अनेकांनी बांधला होता.

रणवीरने त्यावेळी अनुष्का शर्माला एक अत्यंत अश्लील प्रश्न विचारला होता जे ऐकून अनुष्का स्तब्ध झाली आणि “माझ्याशी अशा प्रकारे बोलू नकोस.”, असं त्याला म्हणाली.

त्यावेळी याविषयी चर्चा झाली नव्ह्ती. पण २०१९ मध्ये अचानक या कॉंट्रोव्हर्सीने लक्ष वेधून घेतलं होतं.

५. आलीया भट्टचं सामान्य ज्ञान :

 

 

शोच्या एका सिझनमध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधले कलाकार शोवर आलेले असताना रॅपिड फायरदरम्यान करन जोहरने आलीया भट्टला “भारताचे राष्ट्रपती कोण?” असा प्रश्न विचारला होता. आलियाने त्यावेळी त्यावर प्रणव मुखर्जींऐवजी पृथ्वीराज चौहान असं उत्तर दिलं होतं.

आलीयाच्या  या उत्तरानंतर नेटिझन्सनी इंटरनेटवर मिम्सचा पाऊस पाडला होता. आपली झालेली ही मस्करी आलीया भट्टने खिलाडू वृत्तीने घेतली आणि त्यानंतर ‘एआयबी’वर तिच्या सामान्य ज्ञानाचा एक मजेशीर व्हिडियो आला होता.

६. हार्दिक पंड्या आणि केएल राहुलने केलेली अश्लील वक्तव्यं :

 

 

हार्दिक पंड्या आणि केएल राहुल कॉफी विथ करणवर आले होते तो एपिसोड चांगलाच वादग्रस्त ठरला होता. हा एपिसोड हॉटस्टारवरूनदेखील काढून टाकण्यात आलेला आहे.

हार्दिकने आणि केएल राहुलने मुलींना कसं पटवलं होतं ते शोवर हार्दिकने उघड केलं होतं. या एपिसोडनंतर त्या दोघांवर तीव्र टीका झाली आणि बीसीसीआयनेदेखील त्यांना पुढच्या काही मॅचेसमध्ये खेळू दिलं नाही. त्यानंतर त्या दोघांनी सगळ्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली.

कॉफी विथ करणच्या जुन्या एपिसोड्समध्ये आपल्याला अशा आणखीही कॉंट्रोव्हर्सीज आढळतील. लवकरच हॉटस्टारवर या शोचा नवा सिझन येणार आहे हे कळल्यावर कुठले नवे-जुने कलाकार शोवर येतील हे पाहण्याची चाहत्यांची उत्कंठा वाढलेली असेल.

तेव्हा नवी गुपितं, नव्या जोड्या-ब्रेक अप्स, नवे प्रतिस्पर्धी, नवे वाद, कलाकारांच्या खासगी आयुष्यातले इतर मजेशीर किस्से या सगळ्याविषयीच्या खमंग चर्चांसाठी सज्ज होऊया.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version