Site icon InMarathi

चुंबन घेण्याची इच्छा का होते याचं उत्तर आहे आपल्याच पूर्वजांच्या सवयींमध्ये…

kiss im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो माणूस हा एकमेव प्राणी आहे जो आपल्या कोणत्याही भावना शब्दांतून व्यक्त करू शकतो. पण काही काही भावना अशाही आहेत ज्या व्यक्त करताना शब्दाचा नाही तर स्पर्शाचा आधार घ्यावा लागतो.

स्पर्श हे एक असे माध्यम आहे ज्यातून तुम्ही शब्दांच्याही पलीकडले असे काही व्यक्त करू शकता. आपुलकी, माया, प्रेम, स्नेह, राग, किळस,घृणा, भीती अशा सार्‍या भावना तुम्ही शब्दातून व्यक्त करू शकता. त्यातही जेव्हा आपण मिठी किंवा चुंबनाचा विचार करतो किंवा कृती करतो तेव्हा आपण आनदी होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता चुंबन म्हटले की मंडळी, मनात फुलपाखर उडायला लागतात. आपण सातव्या आसमानात असतो. एखाद्याला भेटल्यावर आपण हात हातात घेतो, किंवा क्वचित गळाभेट घेतो हे आदर किंवा जवळीक दाखवण्याचे रिवाज आहेत, पण चुंबन घेताना समोरची व्यक्ती तुमच्या फारच जवळची असेल तरच तुम्ही ती कृती करता.

 

 

चुंबन म्हणजे काय असते हे सांगण्याची गरज नाही खरेतर. तुम्ही तेवढे जाणकार नक्कीच आहात. पण आपण चुंबन का घेतो यामागेही काही कारणे आहेत. काय आहेत ती कारणे? हे जाणून घ्यायला आवडेल ना? चला तर जाणून घेऊया.

मित्रांनो स्पर्श ही भावनाच अशी आहे की तुम्ही तुमची कोणतीही मनस्थिती त्याद्वारे समोरच्याला सांगू शकता. किंवा स्पर्शाद्वारे समोरच्याचे मन जाणून घेऊ शकता. आपल्याला एखाद्याविषयी वाटणारे आकर्षण, प्रेम, माया , वात्सल्य व्यक्त करण्यासाठी चुंबन हा उत्तम मार्ग आहे.

आपण एखाद्याला कोणत्या परिस्थितीत किस करतो त्यावर त्यातील आवेग आणि भावना अवलंबून असतात. कधी सेक्सची पहिली पायरी म्हणून किस केले जाते, कधी फक्त प्रेम दर्शवण्यासाठी केले जाते, कधी शुभेच्छा देण्यासाठी तर कधी निरोप घेताना सुद्धा चुंबन दिले घेतले जाते.

 

 

आईने बाळाचे घेतलेले चुंबन हा वात्सल्य दर्शवण्याचा प्रकार असतो. मोठ्या माणसांनी लहानांच्या कपाळाचे घेतलेले चुंबन हे आपुलकी दर्शवणारे असते.

चुंबन घेणे नक्की कधी पासून अस्तित्वात आले हे सांगता यायचे नाही चुंबनामुळे दोन माणसं इतकी जवळ येतात, की त्यांना एकमेकांच्या फेरोमोन्सचाही अंदाज येतो, फेरोमोन्स (Pheromones) ही अशी रसायनं असतात, की जी शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे गंध देतात.

माणसातही त्यांचा काही प्रमाणात उपयोग होतो. या शरीर गंधाचा अंदाज चुंबन घेताना होतो ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जवळ जायचे की नाही हे देखील ठरवता येते आणि याचा उपयोग नाते संबंध दृढ करण्यासाठी होतो.

मानवी वर्तनावरील एक उत्कृष्ट पुस्तक ‘मॅनवॉचिंग’ चे लेखक डेस्मंड मॉरिस सूचित करतात की 90 टक्के संस्कृतींमध्ये चुंबन स्वीकार्य प्रथा आहे.

जे चुंबन घेत नाहीत ते अजूनही एकमेकांना नाक घासण्यासारख्या कृतीतून स्पर्श करतात. चुंबन मेंदूतील संप्रेरके, डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन यांना देखील उत्तेजित करते. ज्यामुळे आपल्याला रीलॅक्स वाटते.

 

 

असे असले तरी आपल्या पूर्वजांनी केलेल्या काही खास गोष्टी किंवा काही खास कारणे आहेत ज्यामुळे आपल्या जीवनात एक महत्वाची स्पर्श भावना म्हणून चुंबनाला महत्व आहे.

जेव्हा समाज निर्मिती झाली आणि तो समाज एकसंध रहावा , दोन व्यक्तींमधले परस्पर आकर्षण टिकून रहावे यासाठी काही नियम तयार केले गेले त्याचवेळी चुंबन क्रियेचा जन्म झाला असावा.

काही जणांच्या मतानुसार चुंबन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही शिकण्याची गरज नाही. आपण भूक लागल्यावर जेवतो तसेच चुंबनही आपोआप घेतो.

फिलेमॅटोलॉजी अभ्यासकांच्या एका मत प्रवाहानुसार माणसाच्या आदिम काळात जेव्हा कोणतीच संस्कृती अस्तित्वात नव्हती त्या काळात एखादी पक्षिण जशी चोचीने आपल्या पिलाना भरवते तशीच आई आपल्या बाळाला स्वत:च्या तोंडाने भरवत असे. एखादा पदार्थ आधी स्वत: चावून त्याला बाळ खाऊ शकेल अशा फॉर्म मध्ये ती तो बाळाला भरवत असे, यातूनच चुंबनाची सुरवात झाली असावी.

आईचं दूध किंवा बाटलीतून दूध पिणाऱ्या मुलाच्या ओठांच्या हालचाली पाहिल्यात, तर त्या चुंबनाप्रमाणेच असल्याचं लक्षात येईल. हा सुरुवातीचा अनुभवच बाळांच्या डोक्यात अशा नसांशी (Nerves) जोडला जातो, की ज्या चुंबनासंदर्भात मनात सकारात्मक भाव तयार करतात.

 

 

माणसाचे ओठ हा शरीराचा सर्वांत खुला असलेला असा भाग आहे, त्यात संवेदनशील नसांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे ओठांना (Lips) थोडाही स्पर्श झाला, तरी मेंदूला लगेच संदेश पाठवला जातो.

मानवी शरीरातली संप्रेरकं (Hormones) आणि न्यूरोट्रान्समीटर्स (Neurotransmitters) काम करू लागतात. विचार आणि भावना यांच्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. आणि त्यामुळे मेंदू उत्तेजित होवून सकारात्मक भावना तयार करतो.

आपल्याकडील काही वैदिक ग्रंथांमध्ये देखील चुंबन क्रियेचा मानस शास्त्रीय परिणाम आणि त्याचे फायदे यांचा उल्लेख केला गेला आहे.

मित्रांनो कारणे काहीही असोत पण चुंबनामुळे माणसाला आनंद आणि उत्साह मिळतो हे मात्र खरे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version