Site icon InMarathi

अडवाणींना राष्ट्रपती पद नाकारण्यामागचं साधं कारण न कळणाऱ्यांसाठी..

modi-advani-inmarathi (1)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रस्तुत लेखातील विचारांवर काही हरकती असतील आणि त्यावर दीर्घ लिखाण करू शकत असाल तर आमच्या फेसबुक पेजवर मेसेजमध्ये जरूर पाठवा. सभ्य शब्दांत व्यक्त झालेल्या अभ्यासू मतांना नक्की प्रसिद्धी देण्यात येईल.
फेसबुक पेजची लिंक : फेसबुक

धन्यवाद!
टीम इनमराठी
===

श्री लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती पदासाठी नाकारण्यात आलेली उमेदवारी या विषयावर लिहायचे नाही असं ठरवलं होतं.

 

 

कारण राजकारणाची सामान्य समज असलेल्या व्यक्तीला देखील यामागची कारणं समजायला हवीत इतका सोपा हा विषय आहे.

परंतु याबाबत काही व्यक्तींनी हेतूपुर्वक गैरसमज पसरवणारे लिखाण केल्यामुळे हा लेखनप्रपंच.

जगात घडणारी कुठलीही कृती प्रेरणा असल्याशिवाय घडत नाही. राजकीय जीवनात प्रवेश करताना देखील, “मी, मला, माझे” हे घटक प्रेरणा देत असतात.

अडवाणींच्या इतक्या वर्षाच्या तपश्चर्येला हेच फळ नरेंद्र मोदींनी दिले का?

हा प्रमुख आक्षेप मला बऱ्याच ठिकाणी आढळला.

इथे हा विचार करताना ज्या काळात अडवाणी वाजपेयी जोडीने भारतीय जनता पक्षाची कमान हाती घेतली तेव्हा त्यांच्या मागे जनसंघाची पुण्याई उभी होती हे लक्षात ठेवले पाहिजे.

ज्या काळात हे दोघं पक्षासाठी झटत होते त्याचवेळी पक्षाचे इतर हजारो कार्यकर्ते देखील हेच कष्ट उपसत होते. परंतु ज्याप्रमाणे अडवाणी वाजपेयी यांचे कष्ट नोंदले गेले त्याप्रमाणे त्या हजारो कार्यकर्त्यांची नामावली कुणाला माहिती आहे काय?

अर्थात ती माहिती असण्याची आवश्यकता देखील नाही. कारण पक्षाचे सेनापती पद या दोघांकडे असताना त्यांचीच नावं पुढे येणार हे साहजिकच आहे.

 

deccan-chronicle.com

कुठल्याही पक्षातील सामान्य कार्यकर्ता पक्षाचे कार्य करताना वैयक्तिक स्वार्थ लक्षात ठेवतोच ठेवतो. वॉर्ड अध्यक्ष, नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान इ पदं त्यालाही खुणावत असतात.

त्यामुळे तो आपल्या पक्षाची ताकद वाढवून या पदांना गवसणी घालण्याची स्वप्नं बघत असतो आणि यात चुकीचे काही नाही.

त्यामुळे अडवाणी असोत वा आणखी कुणी, ते निस्वार्थपणे काम करत राहिले हा विचार बाळगण्यात अर्थ नाही.

यानंतर मुद्दा येतो तो त्यांना बाजुला ठेवण्याचा.

इथे सर्वात महत्वाची लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे पक्षातंर्गत चालणारे लॉबिंग. लोकशाही व्यवस्थेत पक्ष निवडणुका लढवतात आणि त्यासाठी उमेदवार निवडले जातात.

निवडून आलेले उमेदवार आपला नेता निवडतात आणि ती व्यक्ती मुख्यमंत्री, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आदी पदं भुषवते. लोकशाही मार्गाने चालणारी ही अत्यंत सहज प्रक्रिया आहे.

परंतु जर मला माझ्या कल्पनेतील पुणे, महाराष्ट्र, भारत घडवायचा असेल तर त्यासाठी माझ्या जवळ महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान इ पदं हवीत.

त्यासाठी मला पाठिंबा देणारे नगरसेवक आमदार खासदार हवेत. ते नगरसेवक, आमदार, खासदार बनण्यासाठी मला मानणाऱ्या व्यक्तींनाच उमेदवारी मिळायला हवी ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे.

ती उमेदवारी देताना स्वपक्षातील इतर गटांचे खच्चीकरण करणे व आपल्या गटातील कार्यकर्त्यांना बळ देणे ही सर्व पक्षात चालणारी बाब आहे. (काँग्रेस संपण्यात या खच्चीकरणाच्या राजकारणाचा मोठा हात आहे.)

वरील बाबी लक्षात घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल की, भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली सुरू केल्यावर अडवाणींनी त्याला उघड विरोध केला.

पुढील घटनांची सुरुवात झाली ती इथे.

अडवाणी गटावर मात करुन मोदींनी उमेदवारी मिळवली. स्वतःचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणले, पंतप्रधान झाले व पक्षांतर्गत विरोधकांचे खच्चीकरण करायला सुरुवात केली.

यात शत्रुघ्न सिन्हा, मुरली जोशी, यशवंत सिन्हा अशी बरीच ज्येष्ठ मंडळी होती. मोदींना हे करणे भाग होते आणि आहे – कारण पक्षातंर्गत आघाडी भक्कम नसेल तर त्यांना काम करणे अशक्य होऊन बसेल.

राहिला विषय राष्ट्रपती उमेदवारीचा तर, भारतीय राष्ट्रपती पद हे सर्वोच्च पद आहे आणि त्याची एक गरीमा आहे.

राष्ट्रपतींकडे सर्वोच्च अधिकार आहेत अशा महत्वाच्या पदावर आपल्याला ज्येष्ठ आणि वरचढ असणारी व्यक्ती स्वतःच आणून बसवणे कुठलाही शहाणा राजकारणी करणार नाही.

 

archive.indianexpress.com | IE Photo

टोमणे मारणे ही लज्जास्पद बाब सोडली तरी संसदेने बहुमताने केलेला ठराव नाकारणे, इथपासून ते सरकार बरखास्त करणे इथपर्यंत अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत.

अशी परिस्थिती उद्भवली तर राष्ट्रपतींवर महाभियोग चालवावा लागणे ही देशाच्या इतिहासातील अत्यंत शरमेची गोष्ट असेल.

हे सगळं टाळण्यासाठी आपल्या गटाचा राष्ट्रपती असणे हा सोपा व सोयीस्कर पर्याय आहे जो इंदीराजींनी किंवा मोदींनी निवडला.

आता अडवाणींचे खच्चीकरण ज्या प्रकारे झाले तो प्रकार वयामुळे आलेली मर्यादा, याआधी उपभोगलेल्या संधी तसेच पक्षाचे भवितव्य लक्षात घेऊन सन्मानजनकरीत्या दिलेली निवृत्ती आहे.

भाजपाच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांना मानाची खुर्ची आहे. त्यांचा उल्लेख पंतप्रधान “माझे नेते” असाच करतात, नव्हे कुठल्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना हा सन्मान मिळायलाच हवा.

 

india.com

याच्या उलट सिताराम केसरी यांच्या हातून काँग्रेसची सुत्रं हाती घेण्यासाठी कुणाच्या इशाऱ्यावरून त्यांना चपलांनी मारहाण झाली होती हे आपल्याला माहिती आहे.

ती घटना किती निंदनीय आहे याचे वर्णन अपुरे आहे.

ता.क. : कुठल्याही क्षेत्रात वावरताना निवृत्त कधी व्हायचे हे योग्य वेळी लक्षात घेतले नाहीतर सक्तीची निवृत्ती नशीबी येते.

===
प्रस्तुत लेखातील विचारांवर काही हरकती असतील आणि त्यावर दीर्घ लिखाण करू शकत असाल तर आमच्या फेसबुक पेजवर मेसेजमध्ये जरूर पाठवा. सभ्य शब्दांत व्यक्त झालेल्या अभ्यासू मतांना नक्की प्रसिद्धी देण्यात येईल.
फेसबुक पेजची लिंक : फेसबुक

धन्यवाद!
टीम इनमराठी

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version