Site icon InMarathi

इंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील!

narendra-modi-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण अश्या देशात राहतो जिथे प्रत्येकाविषयी सोयीने मते बनवली जातात. आपण कसे राहतो, कसे वागतो, काय खातो, कसे खातो या सर्वांवर आपल्या विषयी आजूबाजूची माणसे स्वतःची मते बनवतात. कंपन्याच्या बाबतीतही तेच, कंपन्या तर एखादा व्यक्ती कश्या प्रकारे राहतो, कसा वागतो आणि कश्या प्रकारचे कपडे परिधान करतो.

एकूणच त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे यावरून त्याच्या विषयी आपली मते तयार करतात आणि नंतर नोकऱ्या देतात. त्याचप्रकारे आजकाल भाषा देखील खूप महत्वाची झाली आहे. त्यातच इंग्रजी भाषेला तर जणू अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

एखाद्याला फक्त इंग्रजी येत नाही यावरून कंपन्या त्याला नाकारतात.

इंग्रजी ही भाषा व्यावसायिक तत्वावर महत्वाची आहे हे मान्य, परंतु एखाद्याला इंग्रजी येत नाही यावरून त्याची गुणवत्ता ठरवणे हा कुठला न्याय?

 

11plus.co.uk

खेळाडूंचं उदाहरण घ्या. काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांना इंग्रजी समजत सुद्धा नाही, परंतु त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेली खेळण्याची प्रतिभा कमी होत नाही. फक्त भाषेच्या आधारावर एखाद्याची गुणवत्ता ठरवणे चुकीचे आहे.

राजकारणाचं क्षेत्र घ्या, तिथेही तुम्हाला हीच स्थिती दिसले, कित्येक राजकीय नेत्यांना इंग्रजी येत नाही, परंतु त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुण अजिबात कमी होत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अश्या ८ प्रसिद्ध व्यक्तींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे इंग्रजीवर काडीमात्रही प्रभुत्व नाही. परंतु तरीही त्यांनी आपापल्या क्षेत्रात स्वत:ची कधीही न पुसली जाणारी ओळख निर्माण केली आहे.

 

 नरेंद्र मोदी

 

twitter.com

हे ऐकून तुम्ही थोडे विचारात पडले असाल की ‘अरे नरेंद्र मोदींना तर इंग्रजी बोलता येते’. हो ते बोलतात, पण तितके खास नाही. आपल्याला माहीतच आहे की ते जेथून आलेले आहेत तेथे इंग्रजी फार कमी बोलली जाते. ते एका चहा विक्रेत्यापासून कष्ट करत या पदाला पोचले आहेत. इंग्रजी येत नाही म्हणून आपल्या स्वप्नांना तिलांजली दिली नाही. आज इंग्रजीचा आधार न घेता ते यशस्वी झाले आहेत. आजही मोदी आंतरराष्ट्रीय भेटींच्या वेळी इंग्रजीच्या आधी हिंदीला प्राधान्य देतात आणि संवाद साधण्यासाठी देखील हिंदीचीच निवड करतात.

 

२. वाल्दीमिर पुतीन

 

independent.co.uk

एक असा शक्तिशाली नेता, ज्यांनी जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवली आहे. वाल्दीमिर पुतीन यांना देखील इंग्रजी अस्खलिखितपणे येत नाही. काही चूक झाल्यास त्यांच्या बरोबर असलेला दुभाष्या ती दुरुस्त करतो.

मोदी आणि वाल्दीमीर पुतीन यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग, स्पेनचे पंतप्रधान मारीअनो राजोय, असे अनेक प्रसिद्द राजकारणी आहेत जे इंग्रजी भाषेचा आधार न घेता एवढ्या मोठ्या पदांवर पोहचले आहेत.

 

३. कपिल देव

 

mid-day.com

कपिल देव म्हणजे भारताचे क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करणारा कॅप्टन!  ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाही, परंतु त्यांनाही इंग्रजी अस्खलिखितपणे बोलता येत नाही, पण तरीही आज संपूर्ण जग त्यांना ओळखते.

इंग्रजी येत नसल्याकारणाने अनेकांनी त्यांची थट्टा केली, त्याला चिडवले परंतु, त्याचा राग न मानता ते पुढे जात राहिले आणि त्यांनी यशाचे शिखर काबीज केलेच.

 

४. लिओनेल मेस्सी

 

goal.com

जगातील सर्वात नावाजलेल्या फुटबॉल खेळाडूंपैकी मेस्सी एक आहे. मेस्सीला स्पष्ट इंग्रजी बोलत येत नाही, परंतु त्यामुळे त्याच्या खेळावर काही परिणाम होत नाही. तो आज लोकांच्या हृदयावर राज्य करतो. इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याच्या प्रसिद्धीमध्ये काहीही फरक पडलेला नाही.

डब्लूडब्लूई (WWE) पासून क्रिकेटपर्यंत, फुटबॉल पासून मार्शल आर्ट्सपर्यंत सगळ्याच खेळांमध्ये असे कितीतरी खेळाडू आहेत, ज्यांनी इंग्रजी येत नाही म्हणून लाजेने खेळणे थांबवले नाही.

 

५. कपिल शर्मा

 

firstpost.com

हास्य जगतावर राज्य करणारा भारताचा विनोदी कलाकार कपिल शर्मा याने देखील मान्य केले आहे की, त्याचे इंग्रजी खराब आहे. त्याच्या ह्या गोष्टीवर स्वत:च्याच कार्यक्रमामध्ये खूपवेळा त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. पण त्याने ही थट्टा खेळीमेळीने घेतली आणि त्याला नावे ठेवणाऱ्यांना दाखवून दिले की इंग्रजी येत नाही म्हणजे तुम्ही ‘निरुपयोगी’ आहात असे मुळीच नाही.

 

६. कैलाश खेर

 

lassiwithlavina.com

ज्या माणसाच्या आवाजाने मन तृप्त होते, अश्या कैलाश खेरचे इंग्रजी सुद्धा काही खास नाही आहे. त्याला इंग्रजी जास्त समजत नाही आणि बोलताही येत नाही, परंतु  त्याच्या मते इंग्रजीची गरज काय? तो ज्या भाषेत गाणी गातो ती भाषा त्याला नीट येते यातच तो समाधान मानतो.

इतकेच काय कंगना रानौत (सध्या ती चांगली इंग्रजी बोलते), धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि काही आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले कलाकार सुद्धा नीट इंग्रजी बोलत नाहीत. त्यांनी देखील सिद्ध केले आहे की इंग्रजीमुळे माणसाच्या गुणवत्तेत काही फरक पडत नाही.

 

७. दलाई लामा

 

bookstellyouwhy.com

हा जगामध्ये सर्वात ज्ञानी आणि आध्यात्मिक नेता म्हणून ओळखले जाणारे दलाई लामा सुद्धा तोडकेमोडके इंग्रजी बोलतात आणि खूपवेळा त्यांचे मुद्दे त्यांच्या अनुयायांसमोर आणि प्रचारकांसमोर मांडण्यासाठी दुभाष्याच्या वापर करतात.

 

८. पोप

 

slate.com

अगदी रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख असलेले पोप यांनासुद्धा इंग्रजी नीट समजत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही. पण यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये आणि आध्यात्मिकतेमध्ये काहीच कमीपणा येत नाही.

वरील उदाहरणांवरून हे लक्षात येते की, कोणाचीही गुणवत्ता त्याच्या भाषेवरून ठरवता येत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की इंग्रजी भाषा (किंवा इतर भाषा) फक्त संभाषण साधण्यासाठी असते त्यापेक्षा अधिक तिचे महत्त्व नाही.

जर एखादा इंग्रजी बोलू शकत असेल, परंतु दुसऱ्याला इंग्रजी बोलता येत नसेल तरीही त्या दोघांना गुणवत्तेच्या एकाच तराजूत तोललं गेलं पाहिजे. कारण अश्या अनेक घटना साक्षीदार आहेत ज्यात अजिबात इंग्रजी बोलता न येणाऱ्या व्यक्तींनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींना मागे टाकले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version