Site icon InMarathi

OTT प्लॅटफॉर्म एवढा बक्कळ पैसा कसा कमावतात, जाणून घ्या त्यामागचं अर्थकारण

ott platform money IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साधारण चार पाच वर्षांपूर्वींपर्यंत ओटीटी हा शब्द, ही संकल्पना सामान्यांना माहितही नव्हती. मात्र कोविड काळात संपूर्ण जग घरात बंदीस्त असताना मनोरंजनासाठी या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला, नव्हे या काळातलं मनोरंजनाचं हे एकमेव साधन होतं.

याच काळात सामान्यांच्या तोंडीही ओटीटी हा शब्द रुळला. काय आहे ही ओटीटी भानगड? तर याचा फूल फॉर्म आहे, ओव्हर द टॉप! तांत्रिक भाषेत सांगायचं तर आधुनिक काळात आपण दोन पर्यायांच्या मदतीनं मनोरंजन निवडतो. एक म्हणजे लिन बॅक आणि दुसरं लीन फॉरवर्ड.

ओटीटी हे लिन फॉरवर्ड प्रकारातलं मनोरंजन आहे, कसं? तर आपण थिएटरमधे नाटक सिनेमा बघत असतो तेंव्हा खुर्चीत रेलून बसलेलो असतो मात्र हाच कंटेट जेंव्हा आपण मोबाईलमधे बघतो तेंव्हा समोर झुकून पहात असतो. हातात मोबाईल आणि मान झुकवून बघण्याचं हे माध्यम आहे.

 

 

आज अनेक ॲप्स आहेत ज्यावर तुम्ही आम्ही सिनेमा, नाटक, स्टॅण्ड अप कॉमेडी शोज, गाणी, प्रवासयात्रा, थरारक शोज असं सर्वकाही बघत असतो. टेलिव्हिजनला पर्याय म्हणून गेल्या दोन चार वर्षात हे माध्यम झपाट्यानं वाढलं आहे.

घरात साधारणपणे एकच टेलिव्हिजन असतो. यावर बहुतेकदा डेलीसोप चालू असतात, तरूण वर्गाला किचन पॉलिटिक्स असणार्‍या या बटबटीत मालिका बघण्यात काहीही रस नसतो. त्यांच्या वयाला साजेसा कंटेट टेलिव्हिजन प्राईम टाईममधे प्रसारीत करेल इतकं भारतीय टेलिव्हिजन धाडसी आणि रिस्क घेणारं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याशिवाय या बटबटीत मालिका न आवडणारा कॉस्मोपॉलिटिन वर्गही टेलिव्हिजनकडे पाठ फीरवलेला वर्ग आहे. या प्रेक्षकांना स्टोरी टेलिंग कंटेट बघण्यात स्वारस्य असतं. दळण दळल्यासारख्या दैनंदिन मालिका न पहाणार्‍या या वर्गासाठी ओटीटी प्लॅटफ़ॉर्म ही लॉटरी होती.

आठ दहा भागांच्या किंवा बरेचदा अगदी चार पाच भागांच्या मालिकांचे दोन चार सिझन हा प्रेक्षकवर्ग आवडीनं बघू लागला.

नेटफ्लिक्सने सिक्रेड गेम्समद्वारे बॉलिवुड सुपरस्टार सैफ अली खानला आणलं आणि इथली मेकिंगची गणितंही बदलली. आज अनेक बडे स्टार्स आणि निर्मिती संस्था इथे आपल्या मालिका आणायला उत्सुक असतात.

 

 

यामुळे झालं काय की एक हायब्रीड प्रेक्षकवर्गही तयार झाला. जो सवयीने दैनंदिन मालिकाही पहातो आणि खर्‍या मनोरंजनासाठी, कंटेटसाठी वेबसिरीजही पहातो.

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सैफ़ अली खान पासून माधुरी दीक्षित, विकी कौशल अशा बड्या स्टार्सना घेऊन हे शो बनवणं आर्थिकदृष्ट्या कसं शक्य होतं? या ओटीटी प्लॅटफ़ॉर्मची कमाई नेमकी कशातून होते?

ओटीटीच्या अर्थकारणाची तीन मॉडेल्स आहेत –

• SVOD –

 

 

तुम्हाला माहितच आहे की यातली बहुतेक सर्व ॲप ही तुम्हाला सबस्क्राईब म्हणजे पैसे भरून घ्यावी लागतात. तर ही सबस्क्रिप्शन्स हा एक कमाईचा मार्ग आहे. अगदी ९९ रुपयांपासून दोन अडीच हजारांपर्यंत ही सबस्क्रिप्शन्स असतात. नेटफ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत.

• AVOD –

 

 

काही ॲपवर काही शो मोफत असतात किंवा काही ॲप पूर्णपणे मोफत असतात. इथे तुम्ही एक पैसाही न देता शोज बघू शकता. उदाहरणार्थ युट्युब, एमएक्स प्लेयर. इथे गाण्यांपासून चित्रपटापर्यंत सर्वकाही फ्री आहे. मात्र तुम्ही केवळ स्ट्रिमिंग करु शकता, डाऊनलोड करण्याची सोय या मोफत सेवेत नसते.

म्हणजे तुम्ही डाटाचे पैसे भरत असता. युट्यूब यात कशी कमाई करतं? तर कार्यक्रमात मधे मधे येणार्‍या जाहिरातीच्या माध्यमातून. अशाच प्रकारे अनेक ॲपवर तुम्ही मधे मधे येणार्‍या जाहिराती पहात असता त्या तुम्हाला तो शो मोफत बघण्याची किंमत असते.

युट्यूब हा जगभरात मोठ्या प्रमाणात बघितला जाणारा ओटीटी प्लॅटफ़ॉर्म आहे. यांची कमाई जाहिरतींच्या माध्यमातून होते. याशिवाय यूट्यूब प्रीमियमद्वारे सबस्क्रिप्शनमधूनही युट्यूब चिक्कार कमाई करतं.

• Hybrid –

 

 

दोन्ही प्रकारांनी काही ॲप कमाई करत असतात. साधारणपणे निर्मिती संस्था आपला कंटेट या प्लॅटफॉर्मना विकतात आणि मग सबस्क्रिप्शनमधून हे प्लॅटफॉर्म कमाई करतात.

काहीवेळेस मात्र हे प्लॅटफ़ॉर्म गुंतवणूक करुन एखाद्या शोची निर्मितीही करतात. हॉटस्टार, डिज्नी, झी फ़ाईव्ह ही याची उदारहणं आहेत.

• TVOD –

याला कंटेट ऑन डिमांड असंही म्हणलं जातं. कधी कधी एखादा चित्रपट भाडं भरूनही बघता येतो. समजा तुम्हाला युट्यूबवर एखादा चित्रपट पहायचा आहे जो प्राईम वर्गवारीत आहे.

मात्र त्यासाठी तुम्हाला संपूर्ण युट्यूबची प्राईम सबस्क्रिप्शन घ्यायची इच्छा नाही. अशा वेळेस तुम्ही पाच पंचवीस रुपये भरून केवळ तो एक चित्रपट भाड्यानं घेऊ शकता.

बुक माय शो या प्लॅटफॉर्मवरसुद्धा आजकाल तुम्हाला असेच चित्रपट पैसे देऊन भाड्यावर घेता येतात किंवा आणखीन जास्त पैसे खर्च करून तुम्ही तो सिनेमा विकतसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तो सिनेमा कधीही कुठेही बघता येऊ शकतो.

 

 

खरंतर ही सगळी गणितं आणखीन क्लिष्ट आहेत, कारण प्रत्येक प्लॅटफॉर्मचे रूल्स वेगळे असतात, त्यांची कॉंट्रॅक्ट वेगळी असतात, तरी या लेखातून एकंदरच ओटीटी क्षेत्र कसं काम करतं ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

घरोघरी जाऊन डीव्हीडी पोचवणाऱ्या नेटफ्लिक्सने आज जी जगभर स्वतःची ओळख निर्माण केली आहे त्यामुळेच या ओटीटी किंवा डिजिटल क्षेत्रात क्रांति झाली आणि हळू हळू या गोष्टी लोकांच्या अंगवळणी पडू लागल्या.

सध्या ओटीटीची स्पर्धा थेट सिनेमगृहाशी होत असली तरी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं आणि मोबाइलच्या छोट्याशा स्क्रीनवर सिनेमा पाहणं यात खूप फरक आहे. त्यामुळे कितीही नाही म्हंटलं तरी ओटीटी हे एक नवीन पावरफुल माध्यम जरी असलं तरी त्याची थेट स्पर्धा सिनेमगृहाशी करता येणं हे अशक्यच आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version