विवेक अग्निहोत्री आता थेट wikipedia वर का भडकले आहेत?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
११ मार्चला प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बराच काळ धुमाकूळ घातला. ज्याच्या त्याच्या तोंडी केवळ चित्रपटाचंच नाव होतं इतकी या चित्रपटाची हवा झाली.
विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९९० साली आपल्याच राज्यातून पलायन करावं लागलेल्या काश्मिरी पंडितांच्या आयुष्यावर बेतलेला होता. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचं विदारक चित्रण या चित्रपटातून आपल्यासमोर आलं.
या भयानक परिस्थितीचे बळी ठरलेल्या पहिल्या पिढीतल्या काश्मिरी पंडितांच्या व्हिडियो मुलाखतींवरून हा चित्रपट तयार केला गेलेला आहे. हा चित्रपट पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. माणुसकी म्हणजे काय, धार्मिक द्वेष किती गलिच्छ स्वरूप घेऊ शकतो असे अनेक प्रश्न पाडून या चित्रपटाने आपल्याला अंतर्मुख केलं.
बडी स्टारकास्ट नसताना, कुठलंही बडं बॅनर पाठीशी नसतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची दमदार कमाई केली आहे. एकीकडे प्रेक्षकांचं प्रचंड कौतुक वाट्याला येत असताना दुसरीकडे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडला. पण चित्रपटाबद्दल इतक्या बऱ्यावाईट चर्चा होऊनदेखील हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.
–
काश्मीर फाईल्समधून घराघरात पोहोचलेला हा अभिनेता एकेकाळी पाण्यात बिस्कीट बुडवून खायचा
१९९० साली ज्या पंडितांनी काश्मीर सोडलं नाही, त्यांच्यासमोर उभं ठाकलं भयंकर संकट
–
या चित्रपटाला नापसंती दर्शवणारे समीक्षक, राजकारणी आणि ट्रोलर्स आतापर्यंत समोर आले होते. विवेक अग्निहोत्रींनी या सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र विकिपीडियाने या चित्रपटाचं वर्णन संपादित केल्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या प्रतिक्रियेनंतर विकिपीडियाने चित्रपटाच्या वर्णनामध्ये पुन्हा बदल केला. काय आहे हा सगळा प्रकार? जाणून घेऊ.
हा चित्रपट धार्मिक द्वेष निर्माण करणारा असून तो काल्पनिक आहे असा वाद या चित्रपटाभोवती निर्माण झाला होता. पण विकिपीडियानदेखील चित्रपटाचं वर्णन संपादित करून हा चित्रपट काल्पनिक, चुकीचा आणि कटाच्या सिद्धांताशी संबंधित असल्याचं म्हटलं.
आपल्या चित्रपटाचं विकिपीडियाने दिलेलं हे वर्णन वाचून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले असून त्यांनी ट्विटरवर विकिपीडियाचा खरमरीत समाचार घेतला आहे.
विकिपीडियाने केलेल्या चित्रपटाच्या वर्णनाचा स्क्रिनशॉट जोडत त्यांनी “प्रिय विकिपीडिया, तुम्ही यात ‘इस्लामोफोबिया… प्रोपागॅंडा… संघी… बायगॉट… इत्यादी’ जोडायला विसरलात. धर्मनिरपेक्ष असल्याची तुमची ओळख पटवण्यात तुम्ही अपयशी ठरताय. घाई करा. आणखी संपादित करा.”, असं ट्विट केलं आहे.
Dear @Wikipedia,
You forgot to add ‘Islamophobia… propaganda… sanghi… bigot… etc’.
You are failing your Secular credentials. Hurry, edit more. pic.twitter.com/c0KyfCc1Co
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 1, 2022
विवेक अग्निहोत्रींनचा हा राग बघून आता विकिपीडियानेदेखील काहीशी माघार घेऊन ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या आपल्या वर्णनात पुन्हा बदल केला आहे. आताच्या वर्णनात विकिपीडियाने आधी लिहिलेला ‘कटाच्या सिद्धांशी संबंधित’ हा भाग काढून टाकला आहे.
चित्रपटाचं विकिपीडियावरचं वर्णन आता “तो १९९० साली झालेल्या निर्गमनाचं चित्रण ‘नरसंहार’ या व्यापकपणे चुकीच्या समजल्या जाणाऱ्या कल्पनेच्या अर्थाने करतो.”असं आहे.
बऱ्याच राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री केला गेला होता. खुद्द पंतप्रधान मोदींनी चित्रपटाची प्रशंसा केली होती. आपल्याच हिंदू बांधवांच्या नशिबी आलेलं हे भीषण वास्तव आपल्याला माहीत नव्हतं या भावनेने प्रेक्षक हळहळले होते.
अनुपम खेर यांचा या चित्रपटातला अभिनय चांगलाच वाखाणला गेला. या चित्रपटाच्या निमित्ताने दर्शन कुमारसारखा प्रचंड संघर्ष करून पुढे आलेला अभिनेता घराघरात पोहोचला. पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी हे मराठी कलाकार या चित्रपटाचा भाग होते ही बाब मराठी प्रेक्षकांना सुखावणारी आणि त्यांची मान अभिमानाने उंचावणारी होती.
‘यु कॅन लव्ह इट, हेट इट, बट यु कान्ट इग्नोअर इट’ असंच ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या संदर्भात म्हणता येईल. चित्रपट सर्वार्थाने चर्चेत राहणं म्हणजे काय याचं काश्मीर फाईल्स दीर्घकाळ उदाहरण ठरेल यात शंकाच नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.