Site icon InMarathi

पेट्रोलचे वाढते दर बघता बेस्ट ऍव्हरेज देणाऱ्या ८ बाईक्स!

bike im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी..सध्या पेट्रोलचे दर किती गगनाला भिडले आहेत हे काही नवीन सांगायला नको. गमतीत म्हणायचं झालं तर गाडी विकत घेणं सोपं आणि गाडी दररोज चालवणं अवघड झालंय!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मग या अश्यामध्ये बाईक विकत घ्यायचा तुम्ही विचार करत असाल तर साहजिकचं चांगले मायलेज (एव्हरेज) देणारी आणि बजेटमध्ये असणारी हे दोन निकष ठेवूनच आपण सर्च मारतो.

प्रामुख्याने जेव्हा बाईक खरेदी करायचा विचार येतो, तेव्हा बरेच लोक त्यांचं बजेट सेट करतात आणि त्यातच शोधत बसतात पण असे न करता बजेटसोबतचं मायलेजचा सुद्धा विचार केला तर हे पेट्रोलचे दर नंतरच्या काळात त्रासदायक ठरणार नाहीत.

तुमचा चार लोकांना विचारत बसण्याचा आणि इंटरनेटवर सर्च करत बसण्याचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही आलो आहोत..चला तर मग पाहुयात टॉप ८ मस्त आणि स्वस्त बाईक्स..

१. बजाज सीटी 100 (Bajaj CT 100)

 

 

भारतातील सर्वात लोकप्रिय बाइक्सपैकी एक म्हणजे बजाज सीटी 100 ही लो मेंटेनन्स बाईक आहे. प्रत्येक भारतीयाला परवडेल आणि आवडेल अशी ही बाईक दोन मॉडेल्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्यात आता BS-VI इंधन-इंजेक्टेड इंजिनदेखील समाविष्ट आहे.

तुम्ही या बाईकमधून 8.34Nm टॉर्कसह 7.8bhp च्या पीक पॉवरचा आनंद घेऊ शकता.

मेंटेनन्स खर्च: 3 वर्षासाठी 4049 रु
मायलेज: 75kmpl
इंजिन : 102cc
किंमत: 40,794 रु

२. टिव्हीएस रेडिओन (TVS Radeon)

 

 

TVS च्या सर्वात लोकप्रिय प्रवासी वाहनांपैकी एक म्हणजे टिव्हीएस रेडिओन. ही बाईक भारतात 3 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या विश्वसनीय इंजिनमुळे तिला अत्यंत कमी देखभालीची आवश्यकता आहे.

यात 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8.08bhp पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

मेंटेनन्स खर्च: एका वर्षासाठी 1900 रु
मायलेज: 56kmpl
इंजिन : 109.7cc
किंमत: 58,992 रु

३.बजाज प्लॅटिना 100 (Bajaj Platina 100)

 

 

बजाजच्या सर्वात विश्वासार्ह एंट्री-लेव्हल बाईक्सपैकी एक म्हणजे प्लॅटिना 100. ही भारतातील लो मेंटेनन्स सर्वोत्तम बाइक्सपैकी एक आहे.

त्रास-मुक्त प्रवासी वाहन म्हणून हिची जाहिरात केली गेली. प्लॅटिना 100 ही BS-VI सुसज्ज इंजिनसह येते, जे 8.34Nm टॉर्कसह 7.8bhp पर्यंत पॉवर जनरेट करू शकते. 13 लीटर्सची टाकी यामध्ये आहे.

2007 मध्ये Platina 100 ने NDTV Profit Bike Award आणि India-100cc “बाइक ऑफ द इयर” पुरस्कार जिंकला होता.

मेंटेनन्स खर्च: तीन वर्षांसाठी 3800 रु
मायलेज: 78kmpl
इंजिन : 102cc
किंमत: 47,264 रु

४. हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splender Plus)

भारतातील टॉप 10 लो मेंटेनन्स बाईकच्या यादीत अव्वल स्थान मिळवून स्प्लेंडर प्लस भारतात 6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

ही बाईक Hero च्या पेटंट XSense तंत्रज्ञानासह कार्बोरेटेडच्या मोटरसह येते. तुम्ही बाइकसह 7.8bhp च्या पीक पॉवरचा आणि 8.05Nm टॉर्कचा आनंद घेऊ शकता.

मेंटेनन्स खर्च: दोन वर्षांसाठी 1414 रु
मायलेज: 65kmpl ते 81kmpl
इंजिन : 97.2cc
किंमत: 54,800 रु

५. होंडा सीडी 110 ड्रीम (Honda CD 110 Dream)

 

 

ही बाईक म्हणजे होंडाच्या पोर्टफोलिओमधून उपलब्ध असलेली सर्वात परवडणारी बाईक आहे. या बाईकमध्ये लांब सीट, ट्यूबलेस टायर्स, लॉक करण्यायोग्य युटिलिटी बॉक्स आणि इलेक्ट्रिक सेल्फ-स्टार्टची सुविधा यांसारखे अनेक फिचर्स आहेत.

कमी देखभाल आणि परवडणारी किंमत हे या बाईकचे वैशिष्ट्य आहे. होंडा सीडी 110 ड्रीमचे इंजिन 8.31bhp पॉवर आणि 9.09Nm टॉर्क जनरेट करते.

मेंटेनन्स खर्च: दोन वर्षांसाठी 5315 रु.
मायलेज: 65kmpl
इंजिन : 109.19cc
किंमत: 50,810 रु

६.यामाहा सॅलुटो आरएक्स (Yamaha Saluto RX)

 

 

Saluto RX ही Yamaha ची एंट्री-लेव्हल बाईक आहे जी BlueCore तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. भारतातील या कमी देखभालीच्या बाईकमध्ये कर्व्ही हेडलॅम्प युनिट, स्पीडोमीटर, अपफ्रंट टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ड्युअल ऍब्जॉर्बर्सदेखील आहेत.

ही बाईक 7.4bhp पॉवर आणि 8.5Nm टॉर्क जनरेट करणारे सिंगल-सिलेंडर इंजिनने परिपूर्ण आहे.

मेंटेनन्स खर्च: एक वर्षासाठी 3582 रु
मायलेज: 70kmpl ते 82kmpl
इंजिन :110cc
किंमत: 49,521रु

७. होंडा एसपी 125 (Honda SP 125)

 

 

SP 125 ही Honda ची BS-VI रेटिंग अपग्रेड मिळवणारी पहिली बाईक आहे. या बाईकमध्ये एलईडी हेड आणि टेल लॅम्प उपलब्ध आहेत.

पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, सर्व्हिस रिमाइंडरसह गीअर पोझिशन इंडिकेटर आणि रिअल-टाइम इंधन कार्यक्षमता यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

होंडा एसपी 125 ही 118kg बाईक सिंगल-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे, जी 10.6bhp पॉवर आणि 10.9Nm टॉर्क जनरेट करते.

मेंटेनन्स खर्च: दोन वर्षांसाठी 4910 रु
मायलेज: 60kmpl
इंजिन : 124cc
किंमत: 73,452 रु

८. बजाज पल्सर 125 (Bajaj Pulsar 125)

 

 

पल्सर 125 हे निर्विवादपणे या लिस्टमधील एक सर्वोत्तम प्रवासी बाईक आहे. अलीकडे, बजाजच्या या मॉडेलला BS-VI अपग्रेड प्राप्त झाले आहे आणि ते ड्रम ब्रेक आणि डिस्क ब्रेक या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

पल्सर 125 सिंगल-सिलेंडर इंजिनसह सुसज्ज आहे जे 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. या मॉडेलला फ्युएल टँकचे कव्हरिंग देखील मिळते ज्यामुळे त्या बाईकला मस्क्यूलर लुक येतो.

पल्सर 125 ने 2020 साठी ड्रूमचा “न्यू कम्युटर बाइक ऑफ द इयर” पुरस्कार जिंकला होता.

मेंटेनन्स खर्च: तीन वर्षांसाठी 3950 रु
मायलेज: 55kmpl
इंजिन विस्थापन: 124.4cc
किंमत: 74,118 रु

या आहेत भारतातील टॉप 8 लो मेंटेनन्स बाइक्स आहेत ज्या रायडर्सना उत्कृष्ट मायलेज योग्य अशी किंमतही सांगता, पण मंडळी हे लक्षात घ्या की ही काही परिपूर्ण यादी नाही.

या गाड्यांच्या यादीतून तुम्हाला मायलेज आणि किंमतीचा साधारण अंदाज आला असेल तर नक्की जवळच्या शो रूमला भेट देऊन आपली बाईक नक्की करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version