नवोदित काश्मिरी क्रिकेटपटूंसाठी आयकॉन बनलेला हा पठ्या “भारताचा ब्रेट ली” होणार का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्हाला आयपीएलमध्ये रस असेल, तर गेल्या काही दिवसात तुम्ही एक नाव अगदी अतिवेगाने अनेकदा ऐकलं असेल. ते नाव म्हणजे भारताचा उभरता वेगवान गोलंदाज उमरान मलिक. तुफान वेगाने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज फारच प्रसिद्ध झाला आहे. त्याची वेगवान गोलंदाजी ही एक पर्वणी असल्याचं म्हटलं जातंय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
एवढंच नाही, तर ‘हैदराबादची मॅच म्हणजे सगळ्यात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज कोण हे आधीच ठरलेलं असतं’, ‘प्रत्येक सामन्यात एक लाखाची कमाई निश्चित आहे’ अशाप्रकारची वाक्यं सुद्धा त्याच्या बाबतीत अगदी सहज ऐकायला मिळू लागली. हा वेगवान गोलंदाज अल्पावधीतच सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
–
CSK विरुद्ध गोलंदाजी करताना ऋषी धवनने ‘फेस शील्ड’ का घातले होते?
अर्जुन रणतुंगा म्हणतोय, “IPL जाऊद्या आधी ‘आपल्या’ देशासाठी उभे रहा”
–
त्याची प्रसिद्धी इतकी वाढली आहे, की भारताला ब्रेट ली मिळाला आहे का अशी चर्चा सुद्धा क्रिकेट चाहत्यांनी सुरु केली आहे. त्याचा भन्नाट वेग बघून भारताला ब्रेट ली मिळाला आहे, असं म्हणायला सुरुवात झाली आहे. त्याचा इथवरचा प्रवास जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तुम्ही सुद्धा असाल, यात शंकाच नाही. चला तर मग उमरान मलिकबद्दल थोडंसं जाणून घेऊया.
मागच्या वर्षीच आला चर्चेत…
यंदाच्या मेगा ऑक्शन आधी सनरायझर्स हैदराबादने अब्दुल समद आणि उमरान मलिक या दोन भारतीय गोलंदाजांना रिटेन करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यातलं उमरान मलिक हे नाव सगळ्यांसाठीच आश्चर्याचं नव्हतं, हे मात्र खरं. मागच्या वर्षी १५२ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकत त्याने क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ज्ञांना हे नाव लक्षात ठेवण्यास भाग पाडलं होतं.
२०२१ च्या आयपीएलमधील हा सर्वात वेगवान चेंडू ठरला होता. ऐन तारुण्यात असलेला उमरान मलिक भारताचा नाव रोशन करू शकतो आणि येत्या काळात एक मोठा खेळाडू ठरू शकतो ही चर्चा तेव्हापासूनच रंगू लागली होती.
यंदाच्या मोसमात त्याने गोलंदाजीची धार अधिकच तिखट केल्याचं दिसून येतंय. तुफान वेगाने टिच्चून मारा करत यशस्वी वाटचालीकडे एकेक पाऊल टाकायला सुरुवात केली आहे.
जम्मू काश्मीरमधील भाजीवाल्याचा मुलगा
जम्मू काश्मीर राज्यातील एक फळ आणि भाजीविक्रेता अब्दुल राशिद मागच्या वर्षापासून सतत फोनवर व्यस्त आहे. आता तुम्ही म्हणाल, व्यावसायिक आहे म्हटल्यावर हे तर होणारच. मात्र हा भाजीविक्रेता सतत फोनवर असण्याचं कारण निराळंच आहे. गेल्या वर्षी चर्चेत आलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचं अभिनंदन करण्यासाठी ही फोनाफोनी सुरु आहे.
आयुष्यातील दुसराच आयपीएल सामना खेळत असताना, १५० किमी प्रतितासाहून अधिक वेगाने चेंडू टाकल्यावर चर्चा तर होणारच ना! हा पठ्ठ्या आता डेल स्टेनच्या हाताखाली तयार होतोय म्हणजे तोफ धडाडत राहणार असं म्हणायला काहीच हरकत नाही.
वेगवान गोलंदाजीचं रहस्य
मलिकचे वडील अब्दुल राशिद यांनी त्याच्या जबरदस्त वेगाचं रहस्य सांगितलं आहे. त्याने लहानपणापासून घेतलेली मेहनत हे याचं फार मोठं कारण असल्याचं ते म्हणतात. त्याच्याकडे हा वेग गोलंदाजीची कला आणि शैली नैसर्गिक आहे. त्याने ही गोलंदाजी घोटवून किंवा फार वेगळी मेहनत घेऊन आत्मसात केलेली नाही असं त्यांचं मत आहे.
नैसर्गिक शैलीला मेहनतीची जोड लाभल्याने आज तो एक उत्तम वेगवान गोलंदाज झाला आहे. आज लेदर बॉल क्रिकेटचा भारतीय ब्रेट ली बनू पाहणारा हा पठ्ठ्या कधी काळी टेनिस बॉलच्या साहाय्याने सराव करायचा, हे सांगायला सुद्धा त्याचे वडील विसरत नाहीत.
दिवसरात्र मेहनत
उमरान मलिक आज प्रसिद्धीच्या झोतावर असला, तरी त्याची ही वेगवान गोलंदाजी त्याला सहज आणि अशाच वेगाने मिळालेली नाही. त्याने यासाठी फार मेहनत घेतली आहे. दिवस झोपण्याचा तर प्रश्नच येत नसे, मात्र रात्री सुद्धा त्याने शांत झोप घेतल्याचं कधी पाहिलं गेलं नाही. त्याने दिवस रात्र मेहनत करून आपली गोलंदाजी अधिकाधिक धारदार आणि उत्तम होईल यासाठी प्रयत्न केले आहेत. ऊन-पाऊस यांनी घाबरून न जाता, त्यांचा सामना करत त्याने अहोरात्र मेहनत घेतली. आज त्याचं फळ मलिकला मिळालं आहे.
आई वडिलांची साथ
लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहणारा उमरान शाळेतून आल्यावर मैदानाकडे धाव घ्यायचा. क्रिकेट खेळणं हेच त्याच्यासाठी सर्वस्व होतं. मुलगा अभ्यास सोडून क्रिकेट खेळतोय हे बघत असूनही, आईने किंवा वडिलांनाही त्याला कधीच विरोध केला नाही.
उलट त्याला सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम केलं. त्याची ही आवड त्याने जोपासावी एवढीच त्या दोघांची इच्छा होती. त्याला क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज होती, त्या या गोष्टी त्याला मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. उमरानची मेहनत आणि त्याला सातत्याने मिळालेलं प्रोत्साहन यामुळे आज तो इथवर पोचला आहे.
ब्रेट ली होणं ही काही सोपी गोष्ट नाही. ‘उमरान मलिक गोलंदाजीत सातत्य राखणार का?’ ‘वेग असाच राहणार का?’, ‘त्याची कारकीर्द बहरणार का?’, या अनिता अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येणारा काळ नक्कीच देईल. मात्र त्याच्या या मेहनतीची आणि त्याने मिळवलेल्या यशाची प्रशंसा व्हायला हवीच. त्याने भारताचा ब्रेट ली व्हावं, याहीपेक्षा त्याने ‘उमरान मलिक’ व्हावं अशी इच्छा बाळगायलाही हरकत नाही. भारताच्या या तरुणाला त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.