Site icon InMarathi

संजय दत्तला पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या ऑफिसरवर रोहित शेट्टी काढतोय बायोपिक!

rakesh maria im 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याकडं अनेक हिरो आणि हिरोईन्सने पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका केलेलं सिनेमे आले आहेत. या लिस्ट्समध्ये रोहित शेट्टीच्या पोलिसांवरच्या सगळ्या सिनेमांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ऍक्शन आणि कॉमेडी सिनेमे करणाऱ्या रोहित शेट्टीने सिंघम काढला आणि तो जबरदस्त चालला. त्यात त्यानं ऍक्शन आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टी घातल्या होत्याच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अशाच मिश्रणाचे त्याचे पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका असलेले पुढचे २-३ सिनेमे आले. शिवाय आणखी एक येणार आहे. मात्र त्यानं नुकतीच एक घोषणा केली की मुंबईच्या माजी कमिशनरांवर तो सिनेमा बनवणार आहे. ते म्हणजे राकेश मारिया.

 

 

आपल्याला हे नाव माहीत आहेच. १९९३ च्या साखळी बॉम्बब्लास्ट प्रकरणात इन्वेस्टीगेशन, २००३ च्या बॉम्बब्लास्ट प्रकरणाचा छडा, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत सापडलेल्या एकमेव अजमल कसाब याची चौकशी, या प्रकरणाचा छडा आणि कसाबला फाशी अशा अनेक महत्त्वाच्या केसेस मारिया यांनी हाताळल्या आहेत.

२६/११ च्या हल्ल्यावर जो सिनेमा आला होता, त्यातली राकेश मारिया यांची भूमिका नाना पाटेकरांनी साकारली होती. मात्र आता त्यांच्यावर येणार आहे तो बायोपिक असणार आहे. त्यामुळं ज्यांना राकेश मारिया यांच्याविषयी फार माहिती नाही त्यांच्यासाठी थोडी माहिती…

 

india today

 

राकेश मारिया कोण आहेत आणि त्यांनी काय काय केलं आहे?

राकेश मारिया यांचे वडील बॉलिवूड सिनेमांमध्ये लहानमोठे रोल्स करत होते. सर्वसाधारणपणे आई वडील करतात, तेच शक्यतो मुलांनीही करायचं अशी पद्धत भारतात रूढ आहे. त्यात बॉलिवूड आलं की काही विचारायलाच नको. मात्र राकेश मारिया यांनी वेगळी वाट निवडली.

वडिलांचा बॉलिवूडशी संबंध असूनही, राकेश मारिया यांनी करिअर म्हणून भारतीय पोलीस सेवेची निवड केली. त्यांनी त्यांच्या लेट मी से इट नाऊ या पुस्तकात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे.

त्या पुस्तकानुसार राकेश लहान असताना एकदा त्याच्या वडिलांनी एका गुन्ह्यात अडकलेल्या सहकाऱ्यासाठी जामीन मिळवून दिला. पण एके दिवशी तो सहकारी पळून गेल्यानंतर राकेश मारियांच्या वडिलांना पोलिसांसमोर हजर व्हावे लागले. मात्र हा प्रकार बराच काळ चालला.

 

 

त्यांना बराच वेळ पोलिसांसमोर बसून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. वडिलांसोबतच्या अशा वागण्यामुळं राकेश मारिया यांनी लहान असतानाच पोलीस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये थर्ड इयरला असताना राकेश मारिया यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

डिग्रीनंतर वर्षभर मेहनत करूनही मनासारखी तयारी होत नसल्यानं राकेश यांनी मुंबई सोडून दिल्लीला जाऊन तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणं त्यांनी तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली.

मुलाखतीपूर्वी उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या पदांचा चॉईस द्यायचा असतो. मात्र राकेश यांनी रकान्यात पाचही ठिकाणी आयपीएस हेच एक पद लिहिलं. एवढी त्यांना पोलीस ऑफिसर बनण्याची इच्छा होती.

संजय दत्त प्रकरण :

राकेश मारिया यांनी पोलीस उपायुक्त (वाहतूक) असताना संजय दत्तला थेट एअरपोर्टवरूनच १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट केसमध्ये अटक केली होती. राकेश मारिया यांची २०१४ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर २०१५ मध्ये त्यांची होमगार्डच्या महासंचालकपदी बढती झाली होती.

त्यांनी ३६ वर्षे मुंबई पोलिसांची सेवा केली आणि २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले. ९३ च्या बॉम्बब्लास्ट केसच्या आरोपींची चौकशी करताना संजय दत्तचं नाव समोर आलं होतं. त्याला एअरपोर्टवरूनच मारिया यांनी अटक केली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये जाईपर्यंत त्याच्याशी कोणी एक शब्दही बोलायचा नाही असा पोलिसांना आदेश होता. तसेच त्यांनी संजय दत्तच्या कोणत्याच विनवणीला थारा दिला नाही.

 

सर्व स्टार्सची मुलं सारखी नसतात, या ८ जणांनी स्वीकारली आहे वेगळी वाट…

संजय दत्तचा फोन-कॉल या मोठ्या चित्रपटासाठी मारक ठरला!

पोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला तसेच आपल्यावरील आरोप खोटे आहेत हे सांगत होता मात्र राकेश मारिया यांनी असा काही आपला खाक्या दाखवला आणि आपला संजू बाबा धडाधड बोलून मोकळा झाला. २६/११ चा जिवंत सापडलेला एकमेव आरोपी अजमल कसाब याची चौकशीसुद्धा मारिया यांनी केली होती.

आपल्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत राकेश मारिया यांना काय वाटतं?

९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाची उकल करणे, ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबई अंडरवर्ल्डला निर्भयपणे सामोरे जाणे, एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची चौकशी करणे आणि २६/११ च्या हल्ल्यादरम्यान शहरासाठी खंबीरपणे उभे राहणे या गोष्टीला तोड नाही.

धैर्य आणि शौर्य याला राकेश मारिया हे एक समानार्थी नाव आहे! या वास्तविक जीवनातील सुपरकॉपचा प्रवास पडद्यावर आणताना अभिमान वाटतो! असं रोहित शेट्टी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला आहे.

 

 

त्यावर राकेश मारिया म्हणतात, की रोहितसारखा उत्तम दिग्दर्शक असताना हा प्रवास पुन्हा जगायला मजा येईल. मात्र नॉस्टॅलजियापेक्षा कठीण आव्हानांना सामोरे जाणाऱ्या आणि सगळ्या अडचणींविरुद्ध काम करणाऱ्या मुंबई पोलिसांचं असामान्य कार्य लोकांसमोर मांडण्याची ही एक मौल्यवान संधी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version